Followers

Saturday 11 April 2020

मा.आमदार कैलास पाटील,नगरध्यक्ष मकरंद राजे, पालकमत्री यांचे खाजगी सचिव बप्पासाहेब थोरात व जिल्हा प्रशासन व इतर सेवाभावी संस्थेच्या वतीने 10 टन ज्वारी धान्य उपलब्ध करून दिली




उस्मानाबाद,दि.11(जिमाका):- उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व गोर गरीब कुटुंबान दररोजच्या अन्नाची सुविधा व्हावी यासाठी आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर व जिल्हा प्रशासन व सेवाभावी संस्था यांच्याकडून 10 टन ज्वारी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये ज्वारी करिता आमदार कैलास पाटील यांच्याकडून रोख रक्कम 50 हजार,नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्याकडून रोख रक्कम 50 हजार,व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी  रोख रक्कम 20 हजार,पालक मंत्रयाचे खाजगी सचिव बप्पासाहेब थोरात 20 हजार दिले  आहेत.
तसेच जिल्हयाचे पालक सचिव श्री.अनिल डिग्गीकर, यांच्या मार्फत सोडियम हायफोक्लोराइट  फवारणीसाठी 120 ड्रम, प्रती ड्रम 40 लीटरचे असून  जिल्हयातील  शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र  व ग्रामपंचायतीना पुरविण्यात येणार आहेत.
          हे सर्व साहित्य महसूल भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे माल उतरुन घेण्यात आला.यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, तहसिलदार गणेश माळी, सहाय्यक नियोजन अधिकारी सोमनाथ रेडडी, नगर परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी बाबासाहेब मनोहरे, पुरवठा नायब तहसिलदार केरूलकर, पालमंत्रयाचे स्वीय सहाय्य्क श्रध्दानंद पाटील,OSD रितापूरे डी.बी. अदिसह महसूलचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment