Followers

Monday 6 April 2020

कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपविण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन


मुंबईदि. 6 :-  कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचानिर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्या दृष्टीने संशयित आहे, त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. कोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजेत्यासाठी संशयितांनी पुढे यावे. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावेसंशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित कळवावीअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाहीहे दुर्दैव आहे. पंतप्रधानांनी दारातखिडकीत दिवे लावायला सांगितले असतानाहीमशाली पेटवून लहान मुलेमहिलांना सोबत घेऊन झुंडीने रस्त्यावर उतरणेफटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणेहा बेजबाबदारपणाचा कळस आहे. यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजेअशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील डॉक्टरनर्सेसपोलिससफाई कर्मचारी अशा कोरोनाविरुद्धच्या यंत्रणेतील घटकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे, ही बाब चिंताजनक आहे. हा प्रसार थांबवायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडणे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी घरात थांबणेसंशयित व्यक्तींनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणे हाच प्रभावी मार्ग असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
टाळेबंदीमुळे देशाचीराज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी त्यावर नंतरच्या काळात मात करता येईल. परंतु आता कोरोनाचा लढा हा एकजुटीनंच लढला पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीयसर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीने उतरले आहेत ही बाब बळ देणारी आहे. राज्यातल्यादेशातल्या जनतेची एकजूट व कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धारच आपल्याला या लढाईत यश मिळवून देईलअसा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment