Followers

Thursday 30 January 2020

जिल्हा वार्षिक योजना 2020-21 मध्ये 47 कोटींची वाढ करून 240 कोटीच्या आराखड्यास मान्यता




औरंगाबाद, दि.30:- जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2020-2021 करिता 193 कोटी 26 लाखाचा लातूर जिल्ह्याच्या  प्रारूप आराखडयात 46 कोटी 74 लाखाची वाढ  वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी करून लातूर जिल्ह्यासाठी 240 कोटीच्या प्रारूप आराखड्याला  मान्यता दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, संसदीय कार्य, पर्यावरण सार्वजनिक बांधकाम व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार विक्रम काळे, आमदार अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनगर, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, प्रियंका बोकील यांच्यासह लातूर जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
         प्रारंभी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर जिल्ह्यासाठी मागील पाच वर्षात मंजुर नियतव्यय व खर्चाची माहिती बैठकीत दिली. तसेच मागील वर्षी 232 कोटीचे तुम्ही मंजूर होते तर यावर्षी 2020-21 मध्ये 103 कोटीची अतिरिक्त मागणी त्यांनी केली. यामध्ये अंगणवाडी बांधकाम, शाळा दुरुस्ती, आरोग्य विभाग, नगर विकास विभातील कामाचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्याने नाविन्यपूर्ण योजनेतून राबविलेल्या विविध योजनेचे सादरीकरण जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले या मध्ये जिल्हा क्रीडा संकुलातील क्रिकेट टर्फ पीच, बाल शिवाजी साहसी उद्यान, लॉन टेनिस कोर्ट बॅडमिंटन हॉल  तसेच सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, मेवायकी पद्धतीने वृक्ष लागवड, गणेश विसर्जन ऐवजी मूर्ती दान करण्याचा क्रम तसेच सार्वजनिक विहीर खोलीकरण व दुरुस्ती करून त्याचा परिसरातील लोकांच्या पाण्यासाठी वापर आदी बाबींची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सादर केली. अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी सर्व जिल्हाधिकारी यांनी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत कार्यशाळा आयोजित करण्याची सूचना केली.
  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी लातूर जिल्ह्यात  नाविन्यपूर्ण अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. यातील बाल शिवाजी साहसी उद्ययान बारामती मध्ये  करू असे सांगितले. तसेच  लातूर जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 चे 193 कोटी 26 लाखाचे नियतव्यय मर्यादेत 46 कोटी 74 लाखाची वाढ करून एकूण 240 कोटींचा आराखडा श्री पवार यांनी मंजूर केला.
प्रारंभी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी लातूर जिल्ह्यासाठी मागील पाच वर्षात मंजुर नियतव्यय व खर्चाची माहिती बैठकीत दिली. तसेच मागील वर्षी 232 कोटीचे तुम्ही मंजूर होते तर यावर्षी 2020-21 मध्ये 103 कोटीची अतिरिक्त मागणी त्यांनी केली. यामध्ये अंगणवाडी बांधकाम, शाळा दुरुस्ती, आरोग्य विभाग, नगर विकास विभातील कामाचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्याने नाविन्यपूर्ण योजनेतून राबविलेल्या विविध योजनेचे सादरीकरण जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले या मध्ये जिल्हा क्रीडा संकुलातील क्रिकेट टर्फ पीच, बाल शिवाजी साहसी उद्यान, लॉन टेनिस कोर्ट बॅडमिंटन हॉल  तसेच सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, मेवायकी पद्धतीने वृक्ष लागवड, गणेश विसर्जन ऐवजी मूर्ती दान करण्याचा क्रम तसेच सार्वजनिक विहीर खोलीकरण व दुरुस्ती करून त्याचा परिसरातील लोकांच्या पाण्यासाठी वापर आदी बाबींची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सादर केली.
अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी सर्व जिल्हाधिकारी यांनी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत कार्यशाळा आयोजित करण्याची सूचना केली.
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी लातूर जिल्ह्यात  नाविन्यपूर्ण अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच लातूर जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 चे 193 कोटी 26 लाखाचे नियतव्यय मर्यादेत 46 कोटी 74 लाखाची वाढ करून एकूण 240 कोटींचा आराखडा श्री पवार यांनी मंजूर केला.

प्रारूप आराखडा मंजूरी बैठकीत आकांक्षित उस्मानाबादसाठी शंभर कोटींची अतिरिक्त मागणी मंजूर





उस्मानाबाद, दि.30 (जिमाका) : उस्मानाबाद जिल्हा आकांक्षित जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याच्या सर्व समस्यांबाबत शासन संवेदनशील आहे. या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विचार करता आणि इथल्या गरजा लक्षात घेता, या जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना व नीती आयोगांतर्गत जिल्ह्याची अतिरिक्त मागणी एकूण रुपये 125.26 कोटींची होती त्यापैकी रुपये 100 कोटींची अतिरिक्त मागणी आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 च्या प्रारूप आराखडा मंजूरी बैठकीत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मान्य केली.
     यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, कैलास घाडगे-पाटील, सुजितसिंह ठाकूर, विक्रम काळे, वित्‍त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, शितल कुंचला हे उपस्थित होते.
     या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 च्या सविस्तर प्रारूप आराखड्याचे सादरीकरण केले. सन 2020-21 या वर्षी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेला नियतव्यय रुपये 286.06 कोटींचा होता तर जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला नियतव्यय रुपये 160.80 कोटींचा होता. यामध्ये यंत्रणेची अतिरिक्त मागणी रुपये 125.26 कोटींची होती आणि यापैकी एकूणच जिल्ह्याच्या विकास कामांचा तसेच जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीचा विचार करता उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी रुपये शंभर कोटींची अतिरिक्त मागणी मंजूर केली आहे.
      ही मागणी मंजूर करताना श्री. पवार यांनी विकास कामे वेळेत पूर्ण करा, कामांच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड नको, कामांची पुनरावृत्ती नको, अशा सूचनाही दिल्या. त्याचप्रमाणे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार सुजितसिंह ठाकूर, विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, कैलास पाटील यांनी जिल्ह्यातील वीज प्रश्न सोडविण्याबाबत अतिशय पोटतिडकीने मागणी केली. यावर मंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलून तातडीने वीज प्रश्नांबाबत उपाययोजना राबविण्याबाबतची  कार्यवाही करू, असेही उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनी आश्वासित केले. याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना कौशल्य विकास अंतर्गत अधिक प्रभावी करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी यांच्याबरोबर झालेल्या करारानुसार टाटा कन्सल्टन्सी कडून रूपये दहा हजार कोटी तर शासनाकडून पावणेदोन कोटी अशा प्रकारे एकत्रित निधी उभा करून प्रयत्न केला जाणार आहे, असेही सांगितले. याशिवाय भारतीय जैन संघटनेकडून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार व त्यासंबंधीची जी कामे सुरू आहेत ती तशीच सुरू राहतील आणि त्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या जेसीबीला लागणाऱ्या इंधनाचा प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्याच्या 315 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी




औरंगाबाद, दिनांक 30 (विमाका) :- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 करीता 255 कोटी नांदेड जिल्हा नियोजन विभागामार्फत प्रारुप आराखड्याच्या सादरीकरणानंतर राज्याचे वित्त आणि‍ नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 315 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याची मागणी मंजूर केली. 155 कोटीची अतिरिक्त मागणी 2020-21 या वर्षासाठी करण्यात आली होती. यातील 60 कोटीचा निधी मंजूर करुन एकूण 315 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी देण्यात आली.  
या आढावा बैठकीसाठी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उस्मानाबादचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार बालाजी कल्याणकर, राजेश पवार, विक्रम काळे, अमर राजूरकर, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, तसेच नांदेड जिल्ह्याचे विविध विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. 
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमाची पॉवर पॉईंट सादरणीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
**

Monday 13 January 2020

महिला सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता समाजात जागृती करणाऱ्या मोहिमा






 शासन या महिलाविषयक महत्वपूर्ण जाणीव जागृती करणाऱ्या मोहीमा म्हणून "महिला सुरक्षा" आणि "डिजिटल साक्षरता"  ह्या दोन मोहिमा डिसेंबर महिन्यात लक्षवेधक ठरल्या. विविध प्रसारमाध्यमातून याचे प्रतिबिंबित उमटलेले दिसून येते. समाज माध्यमात देखील # ‘महिला सुरक्षा’ आणि # ‘ डिजिटल साक्षरता’ या टॅगलाईनने प्रसिध्द झाल्या.  राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने राज्यभरात जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून "महिला सुरक्षा" हा उपक्रम सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवला. तसेच राज्य महिला आयोग आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल साक्षरता ही कार्यशाळा घेण्यात आल्या.
या दोन्ही कार्यशाळेत प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रामुख्याने पत्रकारांची उपस्थिती होती या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांनी सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी, प्रसारमाध्यमांची भूमिका ,पत्रकारांनी वार्तांकन करताना घ्यावयाची काळजी , सायबर सेल ची कार्यपद्धती, पोलीस यंत्रणेचे समन्वय, सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक संस्थेच्या कार्याविषयी महिलांविषयक अन्याय आणि अत्याचार दूर करण्याविषयी विविध विषयावर चर्चा घडवून आणली. महिलावर अन्याय होऊ नये याविषयी काळजी काय घ्यावी, झालेल्या अन्याया विरुध्द कोणती भूमिका घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.  
महिला सुरक्षा कार्यशाळेत त्रिसूत्री फार्म्यूला महत्वपूर्ण ठरला. Fly, Cry  आणि Try म्हणजेच एखाद्या मुलींनी असे लक्षात आले की आपणास या ठिकाणी धोका आहे त्यावेळी प्रथम त्या ठिकाणाहून दूर जाणे. या क्रियेला Fly असा अर्थ अभिप्रेत घेतला आहे. तसेच छेडछाड झालेल्या ठिकाणावरुन सुटका करुन पळ काढला की, मोठ्या आवाजात मदतीसाठी ओरडणे याला Cry . यानंतर झालेल्या प्रसंगाविरुध्द तक्रार देण्यासाठी प्रथम मुलींनी आई, वडील, पालक, शिक्षक यांच्यामार्फत तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवणे. या गोष्टीला Try या संकल्पनेत ग्राह्य धरले आहे. ही त्रिसूत्री विशेषत: शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणी यांच्यासाठी सांगण्यात आली .
एक नागरिक म्हणून महिला अत्याचारग्रस्त कुटुंब, नातेवाईक यांच्या विषयी प्रसारमाध्यमे यांनी आणि वार्ताहर याची नेमकी कोणती भूमिका असावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.  राज्याच्या 36 जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ‘महिला सुरक्षा’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास हजारोंच्या संख्येत नागरिकांचा सहभाग यामध्ये नोंदवला गेला. पत्रकार विद्यार्थी , सामाजिक कार्यकर्ते,महिला आणि बाल कल्याण समिती चे पदाधिकारी,  विविध शासकीय कार्यालयातील महिला तक्रार निवारण समितीचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला होता. दुहेरी संवादातून विविध विषयावर विचारमंथन झाले. सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील काही सूचना पोलीस यंत्रणा, माध्यम प्रतिनिधींना केल्या. हा दुहेरी संवाद घडुन आणण्यामध्ये जिल्हा माहिती कार्यालयाने समन्वयाची भूमिका बजावली.
"डिजिटल साक्षरता" ही कार्यशाळा  राज्य महिला आयोग आणि जिल्ह्यातील विविध  सामाजिक संस्था, महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या. याची संख्या जवळपास 435 आहे. यामध्ये विद्यापीठाच्या विविध विभागाचा  समावेश होता .  या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे महिलांसाठी आपले दैनंदिन बँक व्यवहार, मार्केटिंग, ऑनलाईन खरेदी-विक्री, बचत गटाच्या माध्यमातून स्वयंविकास त्याचप्रमाणे सायबर गुन्हे होऊ नयेत या संदर्भात घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल साक्षरता ही काळाची गरज असून महिलांनी आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य महिला आयोगाने ही एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली होती. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाकडून साधन व्यक्ती द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. राज्यभरात या कार्यशाळेने मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गट सामाजिक संस्थांच्या महिला, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, शेतकरी, गृहिणी सहभागी झाल्या होत्या. विविध महाविद्यालयाच्या आणि सामाजिक काम करणाऱ्या संस्था मार्फत महिलांविषयक कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेचा हेतू मुळात महिलांना तंत्रस्नेही बनवून विकास प्रक्रियेतील सक्षम  घटक बनवणे होता. स्वसंरक्षण, आपला हक्क आणि कर्तव्यांची समान पातळीवर अंमलबजावणी होण्यासाठी या दोन्ही कार्यशाळा उपयुक्त ठरल्या आहेत. महिलांशी संबंधित या कार्यशाळेत जवळपास 4 ते 5 हजाराच्या वर महिला उपस्थित होत्या.  अजूनही काही कार्यशाळेचे आयोजन  राज्यभरात करण्यात आले आहे .
जिल्हा माहिती कार्यालय, पोलिस यंत्रणा, सायबर सेल, महिला व बालकल्याण कार्यालय , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दामिनी पथक यांचे सदस्य यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. पोक्सो कायदा , सायबर गुन्हेगारी, महिला सुरक्षा विषयक विविध कायदे,  डिजिटल साक्षरतेचे महत्व आणि  ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी , बालकावर होणारा अन्यायाविरुद्ध दाद मागणाऱ्या कायद्याची माहिती विषयी जाणीव जागृती करण्यात आली. या उपक्रमाचे विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालय पासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवला. समाजातील महत्त्वाचे घटक म्हणून माध्यम प्रतिनिधी, काही ठिकाणी लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.  यामध्ये बालकांच्या मदतीसाठी 1098 ही हेल्प लाईन तसेच महिलांसाठी 1091 या हेल्पलाईनद्वारे देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती सांगण्यात आली. या कार्यशाळेची फलश्रुती म्हणजे महिलांना नवीन वर्षात तंत्रस्नेही तसेच स्वसंरक्षण प्रदान करणारे विविध घटक, कायदे याविषयी जाणीव जागृती करणारे  ठरले . नवीन वर्षात महिलांचे जीवन सुकर , सन्मानित आणि संरक्षित करणारी मोहीम म्हणून "महिला सुरक्षा "अणि "डिजिटल साक्षरता"  यामध्ये शासनाची महत्वपूर्ण भूमिका ठरली .

     -- मीरा ढास
सहायक संचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय,
लातूर

Thursday 2 January 2020

समाजसुधारक सावित्रीबाई फुले


जयंती विशेष लेख..

सावित्रीबाई जोतीराव फुले म्हणजे ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, भारतातील पहिल्या शिक्षिका, समाज सुधारक आणि कवयित्री अशी त्यांची ओळख दिली जाऊ शकते. त्यांचे कार्य आणि कृर्तृत्व शब्दातीत आहे. 3जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला. खंडोजी नेवसे आणि सत्यवती नेवसे हे त्यांचे वडील-आई .थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या खाद्याला खांदा लावून त्यांनी स्त्री शिक्षण तसेच एकूणच शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतीकारक कामं केलं. समाजसुधारणेच्या कामात जोतीराव फुले यांना मोलाची साथ दिली एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्यात त्या सक्रीय सहभागी झाल्या होत्या. पत्नी ही केवळ अर्धअंगिणी म्हणून ओळखली जाते पण  सावित्रीबाई फुले या पहिल्या खऱ्या सर्वार्थानं अर्धांगिणी होत्या. त्या अधुनिक मराठी काव्य लेखनाच्या अग्रदूतही होत्या.
महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यात 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाडयात मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. त्या शाळेत त्यांनी पहिली शिक्षिका म्हणून कामास सुरुवात केली. कर्मट सामाजिक परंपरांनी ग्रस्त असलेल्या आणि बदलास सहसा राजी नसलेल्या समाजात फुले दाम्पत्यांनी मुलींसाठी शाळा सुरु करुन तसं क्रांतीसाठी पहिलं पाऊल टाकलं होतं. त्यामुळं धर्म- परंपरांमध्ये जखडलेल्या समाजातील अनेकांना ही बाब पचणी पडणारी नव्हती. अनेकांना आपल्या धर्मात, रुढी परंपरांवरील घाला आहे, असंही वाटू लागलं होतं. त्यांचा या शाळेस तीव्र विरोध होता. परंतु कोणताही समाज बदलास, परिवर्तनास सहकार्य करणारे, प्रसंगी सहभाग देणारी  माणसंही काही प्रमाणात असतात. या शाळेच्या उभारणीत जोतीराव फुले यांना अशा मंडळींनी पाठींबा दिला. भिडे या ब्राम्हण ग्रहस्थानं आपली इमारत ( वाडा ) शाळा सुरु करण्यासाठी उपलब्ध करुन दिली. या शाळेस मी स्वत: 2014 मध्ये भेट देवून पाहणी केली आहे. इमारत आता मोडकळीस आलेली आहे. या इमारतीचे जतन व्हावे म्हणून काही मंडळी  प्रयत्न करीत आहेत.
सावित्रीबाई यांचा  जोतीराव फुले यांच्याशी 1840 मध्ये विवाह झाला. महात्मा जोतीराव फुले यांच्या समाजसेवेच्या कार्यात त्यांचा प्रवेश झाला. सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेत एक मिशन म्हणून खर्चि घातलं. महात्मा जोतीराव फुले यांनी 1 मे, 1849 रोजी पुण्यातील उस्मान शेख यांच्या वाडयात प्रोढांसाठी शाळा सुरु केली. त्या शाळेतही सावित्रीबाईंनी अध्यापनाचं कार्य केलं. त्यानंतर 1849 ते 50 या काळात महात्मा जोतीराव फुले यांच्या बरोबर पुणे, सातारा, अहमदनगर या जिल्हयातही शाळांची सुरुवात करण्यात सावित्रीबाईंचा सिहांचा वाटा होता. तिथे काही काळ त्यांनी शिक्षिका म्हणून कामही केलं होतं. स्त्रिंया, अस्पृश्य यांच्या मुलांसाठी शाळा सुरु केल्यानं धर्म मार्तंडांनी महात्मा फुले यांच्या विरोधात राणं पेटवले होते. त्यामुळं परंपरागत विचारांनी बांधलेल्या जोतीराव फुले यांचे वडील गोविंदराव यांनाही या विरोधाचा त्रास सहन करावा लागत होता. जोतीरावांनी अशा भानगडीत पडू नये, आपले पारंपरिक शेतीची कामं करावीत असेच त्यांना वाटे परंतु महात्मा जोतीराव फुले यांचे मन त्यांना सामाजिक बदलाच्या कामापासून स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी त्यांना जे करावयाचे आहे ते कोणत्याही परिस्थितीत करण्याचा चंगच बांधला होता.अंतिमत: जोतीराव ऐकत नाहीत हे पाहून वडिल गोविंदराव यांनी त्यांना घर सोडण्याचा आदेश दिला. त्यानुसार महात्मा फुल्यांसोबत 1849  मध्ये सावित्रीबाई फुले यांनी वंचितांच्या हितासाठी गृहत्याग केला.
सावित्रीबाई यांची स्वत: शिकवणी घेऊन महात्मा फुले यांनी त्यांना साक्षर केलं होतं. हळूहळू त्यांनी स्वत:च्या सततच्या प्रयत्नांनी शिक्षणात प्रचंड गती मिळविली होती. त्या आता शिक्षणात चांगल्याच निपूण झाल्या होत्या. दररोजच्या अध्यापनातून त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत त्यांचे दृष्य स्वरुप दिसू लागले होते. 1852 मध्ये जेव्हां त्यांच्या शाळांची तपासणी  झाली तेव्हां अधिकारी भारावून गेले होते. त्यांचे काम कौतूकास पात्र ठरले होते. त्यामुळे तपासणी अधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांना आदर्श शिक्षिका म्हणून अभिप्राय दिला होता. त्यामुळे 12 फेब्रुवारी 1853 रोजी मेजर क्यंडी यांच्या हस्ते फुले दाम्पत्यांचा विश्रामबाग वाडयात गौरव करण्यात आला. या समारंभात सर्व शाळांचा बक्षिस समारंभ एकत्रितपणे घेण्यात आला.
विधवा स्त्रियांना विवाह करण्याची त्या काळी परवानगी नव्हती. त्यामुळे अतिशय तरुण वयात स्त्रियांना वैधव्याचं , हालाखिचं, कोंडमाऱ्याचं जीवन जगावे लागत असे. त्यांच्या आशा परिस्थितीचा फायदा घरातील पुरुष मंडळींकडून किंवा इतरांकडून घेतला जात असे. त्यातून त्यांनां मुलं होत असतं, त्यांच्या मुलांचा कोणी सांभाळ करण्यास तयार नसे. यातून अशा बालकांची हत्या करण्याचे प्रकार मोठया प्रमाणात घडत असतं. ही अमानुष्य प्रथा बंद व्हावी म्हणून समाजमन तयार करण्याची गरज होती. परंतु धर्म आणि रुढीग्रस्तेने जखडलेल्या समाजात या बाबत बोलणेही पाप समजले जात होते. आशा काळात 1853 मध्ये महात्मा जोतीराव फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या बालहत्या प्रतिबंधक गृहात दाखल होणऱ्या मुलांची सावित्रीबाई फुले अतिशय प्रेमाणे काळजी घेत असतं. सामाजिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांची आणि त्यांच्या मुलांची आई प्रमाणे काळजी  घेण्याचं मोठ कामं सावित्रीबाईनं मोठया धाडसानं सुरु ठेवलं आणि ते शेवट पर्यंत  पूर्णत्वास नेलं. विधवा झालेल्या महिलांचे केस कापले जात असत कारण त्यांना विद्रुप केले तर कोणाचे त्यांच्याकडे लक्ष जाणार नाही, असा एक भ्रामक कयास यामागे होता. पण अशा विधवा महिला अनेक वेळा इच्छा नसतांना  ‘केशवपण ’ करत असतं. तेव्हा ही महिलांना विद्रुप करणारी प्रथा बंद करण्यासाठी महात्मा फुले यांनी पुण्यात केश कापणाऱ्या  ‘ कारागीरांचा ’ संपही घडवून आणला होता. यात सावित्रीबाईंचाही मोठा सहभाग होता.
सावित्रीबाई फुले यांची स्वत:ची अशी ग्रंथसंपदाही होती. त्यात त्यांचा पहिला काव्य संग्रह ‘काव्यफुले ’ हा 1854 मध्ये प्रसिध्द झाला. तर दुसरा काव्यसंग्रह ‘बावनकशी सुबोध रत्नकार’ हा जोतीराव फुले यांच्या महानिर्वाणानंतर म्हणजे 1891 मध्ये प्रसिध्द झाला. याशिवाय सावित्रीबाईंनी मोठया प्रमाणात स्फुट लेखनही केले होते.  ‘ काव्यफुले ’ या कविता संग्राहाचे त्या काळी मोठया प्रमाणत स्वागत झाले. अधुनिक काव्याचे जनक म्हणून समीक्षकांनी त्यांचा गौरव केला होता,असे म्हणता येईल. केशवसुताच्या जन्माआगोदर सावित्रीबाईंचा कव्यसंग्रह प्रसिध्द झाला. केशवसुताचा जन्म 1866 मध्ये झाला होता. मराठी वाङमय इतिहासकारांनी सावित्रीबाईंच्या  ‘काव्यफुले ’ या काव्यसंग्राहाची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही, अशी खंत व्यक्त केली जाते. या दोन्ही काव्यसंग्रहातील कवितांचा आशय खुप उत्तम प्रतिचा आहे. या काव्य संग्रहातून त्यांची निसर्ग, समाज यांच्याकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी स्पष्ट होते. या काव्यसंग्रहातून सावित्रीबाईंची सामाजिक, निसर्ग विषयक , आत्मपर, बोधपर, कवि-काव्य विषयक , प्रार्थनापर, ऐतिहासिक किंवा इतिहासातील पराक्रमी महापुरुषांच्या कार्यावर, सामाजिक गुलामगिरीवर, धार्मिक रुढीवर हल्ला चढवत सामाजिक वैगुण्यांवर नेमकेपणानं बोट ठेवणाऱ्या आहेत.
माहात्मा जोतीराव फुले यांनी 1855 मध्ये पुण्यात रात्र शाळा सुरु केली. दिवसभर काम करणाऱ्या हातांना शिक्षण कसे मिळेल, असा त्यामागे हेतू होता. आणि जगण्यासाठी काम केल्याशिवाय पर्याय नाही हे ओळखूनच महात्मा फुले यांनी रात्र शाळा सुरु केली. शाळा तर सुरु केली पण तेथे कोण शिकवणार असा प्रसंग निर्माण झाला. तेव्हा सावित्रीबाईच पुढे सरसावल्या त्यांनी याही शाळेत शिकवण्याचे काम केले. 25 डिसेंबर 1856 मध्ये जोतीराव फुले यांच्या भाषणावरचे पुस्तकही  सावित्रीबाईंच्या  प्रयत्नातून प्रसिध्द झाले, असे म्हटले तर वावगे ठरु नये. केवळ बालसुधार गृह सुरु करुन म्हात्मा फुले शांत बसले नाहीत. त्यांना विधवांचे पुनर्विवाह करुन द्यावयाचे होते. त्यासठी मदत करावयाची होती. हा विचार त्यांनी सावित्रीबाई यांच्याकडे व्यक्त केला तेव्हा सावित्रीबाई यांनी त्यांना स्फुर्त पाठींबा दिला. मात्र त्यामागे हटणाऱ्यांपैकी नव्हत्या . सावित्रीबाईंनी याही कामी महात्मा जोतीराव फुले यांना सक्रीय पाठींबा दिला. त्यातून 1860 मध्ये या दाम्पत्यांनी विधवा पुनर्विवाहास सहाय्य करण्याच्या कामास प्रारंभ केला. ज्यांना कोणी सहाय्य करण्यास तयार नाही. ज्यांच्यासाठी कोणी पुढे येत नसे अशावेळी महात्मा फुले त्यांचे आश्रयदाते होतं असतं. वंचितांचे  आश्रु पुसण्याचे केवळ नाटक करुन समाजात बदल होत नाहीत. त्यासाठी  ‘कृती ’ ची जोड असावी लागते. हे ओळखूण या दांपत्यानं पुण्यात 1864 मध्ये अनाथ ‘बालक आश्रमा ’ ची स्थापना केली आणि ते तातडीने कार्यान्वितही केले.
अस्पृश्यांच्या समस्यांची यादी त्याकाळी फारमोठी होती. जगण्याच्या साधनांपासून वंचित असलेली किंवा ठेवल्या गेलेल्या या समाजाला जीवनाच्या प्रत्येक टप्यावर ‘याचनाच’करावी  लागेल. इतरांच्या दयेवर आवलंबून असलेल्या अस्पृश्यांना खाण्यापासून- पाण्यापर्यंत इतरांच्या म्हणजेच स्पृश्यांच्या दयेवर अवलंबून राहवे लागे. स्पृश्यांना दया कधी होईल नि कधी कोप होईल हे सांगता येत नसे. त्यामुळे जीवनावश्यक असलेले पाणीही मिळण्यासाठी अस्पृश्यांच्या जीवनाची लाहीलाही होत असे. पुण्यातील अस्पृश्यांच्या पाण्यांची समस्या ध्यानात आल्यावर महात्मा फुले यांनी स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. त्याला सावित्रीबाईंनी पाठींबाच दिला नाही तर या कामी त्यापुढे राहिल्या. पाण्यासाठी महिलांनांच अधिक त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव त्यांना होती.
महात्मा फुले यांनी 1868 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांच्या हयातीत आणि नंतरही सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाचे काम हिरहिरीने केले. स्वत:चा दत्तक घेतलेला मुलगा ‘यशवंत ’ याला उच्च शिक्षित केले. वैद्यकिय क्षेत्रातील शिक्षण घेऊन तो डॉक्टर झाला. त्याचा विवाहही फुले दाम्पत्यांने सत्यशोधक पध्दतीने केला. त्यातही सावित्रीबाई अग्रणी आणि अग्रही होत्या. 1875 ते 1877 या कालखंडात पुणे परिसरात पडलेला दुष्काळ असहाय्य झाला होता. त्यावेळी सावित्रीबाईंनी जनतेला मदत करण्याचे काम हाती घेतले. सावित्रीबाई  फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पुणे परिसरात 52 ठिकाणी  अन्नछत्रे सुरु करुन ती त्यांनी चालवली. या कार्याचे संपूर्ण नेतृत्वच सावित्रीबाईंनी केले होते.          28 नोव्हेंबर 1890 रोजी पती महात्मा जोतीराव फुले यांचं निधन झालं. सावित्रीबाईंचा आधारवड, गुरु, मार्गदाता आणि मित्र असे सर्व काही असणारा आधार महात्मा फुले यांच्या निधनाने नाहीसा झाला. पण्‍ त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी जोतीराव यांचे कार्य पुढेही सुरुच ठेवले. त्यात खंड पडू दिला नाही. शिक्षण , महिलांना उभं करण्याचं काम , आनाथंचं काम, शेतकरी,अस्पृश्यांच्या अडचणीत त्यांना सहाय्य करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या कामाचा उरक बघून सत्यशोधक समाजाच्या कार्यकत्यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. त्यातून महाराष्ट्रात प्रबोधनाची नवी वाट रुळण्यास मदत झाली.
पुण्यात 1897 मध्ये मोठया प्रमाणत नागरिकांचे प्लेग या साथीच्या रोगाने मृत्यू होत होते. ज्यांना प्लेगची लागन झाली आहे. त्यांना आलीप्त ठिकाणी ठेवण्याची मोहीम ब्रिटीश प्रशासन राबवत होते. पण यातही सामाजिक रुढी परंपराचा आडथळा येत होता. त्यातून समस्या गंभीर बनत चालली होती . लोकांना अलिप्त ठिकाणी पाठवण्याच्या कामात सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते काम करीत होते. सावित्रीबाई स्वत: प्रशासनास मदत करत होत्या. त्यातही छोटी मुलं-मुलींना स्वत:च्या हातावर घेऊन त्यांना उपचार मिळावेत म्हणून कशोशिने प्रयत्न करत होत्या. त्यातच त्यांनाही प्लेगची लागण झाली. त्या आजारी पडल्या. अन् त्यात त्यांचा 10 मार्च 1897 रोजी मृत्यू झाला. समाज शिक्षण, सामाजिक परिवर्तन, समाजक्रांतीची जी ज्योत माहात्मा फुल्यांनी पेटवलेली होती. ती ज्योत प्लेगच्या झंझावतात निमली पण सावित्रीबाईनं शिक्षणाची जी ज्ञानज्योत लावली होती त्या ज्योतीचं  आज दीपस्तंभात रुपांतर झालयं. देशातील सर्व समाजातील मुलं-मुली शिक्षण घेऊन सन्मानानं जगण्याचा मार्ग चोखाळत आहेत. हीच त्यांना मिळालेली खरी आदरांजली आहे, असं वाटतं.
---  यशवंत भंडारे,औरंगाबाद
                                                    9860612328