Followers

Thursday 3 November 2022

लातूर जिल्हा शिक्षणाची पंढरी; आता क्रीडा नैपुण्य असलेले खेळाडू निर्माण व्हावेत - पालकमंत्री गिरीश महाजन

 






·        जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा

·        अतिरिक्त 50 रोहित्र खरेदीसाठी निधी देण्याचा निर्णय

·        प्रत्येक गावात स्मशानभूमी, दफनभूमीसाठी धोरण ठरवणार

·        तालुका क्रीडा संकुलांच्या निधीत पाचपट वाढ

·        माता व बाल रुग्णालय इमारतीचे काम तातडीने सुरु करा

लातूर, दि. 3 (जिमाका) : कृषी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि इतर क्षेत्राशी संबंधित विकासकामांना गती देवून जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. लातूर जिल्हा शिक्षणाची पंढरी आहे, आता क्रीडा नैपुण्य असलेले खेळाडू जिल्ह्यात निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण, आरोग्यासह विविध योजनांची जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर कामे विहित कालावधीत व दर्जेदार होण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत श्री. महाजन बोलत होते. खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कौशल्याच्या विकासासाठी तालुका आणि जिल्हा क्रीडा संकुलात चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी तालुका क्रीडा संकुलाच्या निधीत पाचपट वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील क्रीडा संकुलांमध्ये सुविधा निर्मितीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. या कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून उभारण्यात येणाऱ्या खुल्या व्यायामशाळेत (ओपन जिम) दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

स्मशानभूमी, दफनभूमीसाठी धोरण ठरवणार

प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी आणि दफनभूमी असणे आवश्यक असून स्मशानभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमी शेड उभारणीसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध नसलेल्या गावांमध्ये खासगी जमीन खरेदीसाठी राज्यस्तरावर धोरण निश्चित करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतागृहांसाठी निधी

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. यासाठी एकरकमी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. महाजन यांनी दिले. तसेच शाळांच्या संरक्षण भिंती, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, निजामकालीन शाळांचा विकास योजनेचा त्यांनी आढावा घेतला. चाकूर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या इमारतीची शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करून अहवाल सादर करावा. उदगीर तालुक्यातील जळकोट येथील सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह तातडीने सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

50 अतिरिक्त वीज रोहित्र खरेदी करणार

वीज हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून कृषीपंपांना नियमित वीज पुरवठा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. नादुरुस्त वीज रोहित्र त्वरित बदलण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अतिरिक्त 50 वीज रोहीत्रांची खरेदी करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी. आवश्यकता असल्यास आणखी वीज रोहीत्रांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. महाजन यावेळी म्हणाले.

पालकमंत्र्यांनी रोहित्र इंधनासाठी बैठकीतूनच केला फोन !

वीज रोहित्र दुरुस्तीसाठी आवश्यक इंधनाचा जिल्ह्यात 35 के.एल. रोहित्र इंधनाची आवश्यकता असल्याची बाब लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून देताच पालकमंत्र्यांनी त्वरित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून इंधन उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. येत्या तीन-चार दिवसात हे इंधन जिल्ह्याला उपलब्ध करून देण्याची त्यांनी मान्य केले.

लातूर येथे माता व बाल रुग्णालय उभारण्यासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून या रुग्णालयाची इमारत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात उभारण्याची कार्यवाही त्वरित सुरु करावी. तसेच ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रांच्या अपूर्ण इमारती त्वरित पूर्ण कराव्यात. चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या योजनेचा नियोजनपूर्वक वापर करावा, असे पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासोबतच प्रमुख महामार्गांच्या कामांसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे ते यावेळी म्हणाले.

खासदार श्री. शृंगारे यांनी जिल्ह्यातील रस्ते, वीज आणि आरोग्य समस्या मांडून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच खासदार श्री. निंबाळकर यांनी नादुरुस्त रोहित्र, महामार्गाची दुरवस्था, रिक्त पदे आदी समस्या मांडल्या.

आमदार अमित देशमुख यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विस्तारित व्यवस्था उभारणीच्या कामाला गती देण्याची मागणी केली. 

आमदार श्री. पाटील-निलंगेकर यांनी अतिवृष्टी, शंखी गोगलगाय आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच लातूर येथे होत असलेल्या रेल्वे कोच कारखान्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी केली.

आमदार श्री. बनसोडे यांनी उदगीर नगरपालिकेला नागरोत्थान आणि दलित वस्ती सुधार योजनेतून अधिक निधी देण्याची मागणी केली. तसेच जळकोट येथील सामाजिक न्याय भवन वसतिगृह इमारतीचा प्रश्न उपस्थित केला.

आमदार श्री. काळे यांनी सर्व गावांमध्ये स्मशानभूमी शेड आणि दफनभूमी उभारणीचा प्रश्न उपस्थित केला. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी केली.

आमदार श्री. कराड यांनी आरोग्य व पायाभूत सुविधांविषयी समस्या मांडल्या. तसेच याबाबतचे लिखित प्रस्ताव पालकमंत्र्यांना सादर केले.

आमदार श्री. पाटील यांनी वीज बिल आकारणीविषयीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच वसंतराव नाईक तांडा विकास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

आमदार धीरज देशमुख यांनी रेणापूर तालुक्यातील क्रीडा संकुलाचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली. त्याचबरोबर रेणापूर तालुक्यातील पीक नुकसानीची माहिती दिली.

आमदार श्री. पवार यांनी विकास कामांना गती देण्यासाठी आणि प्रभावी अंमलबजावणीतून सुविधा निर्मितीसाठी विविध 264 योजनांचे अभिसरण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच रमाई आवास योजनेच्या प्रस्तावांवर लवकरात लकवर कार्यवाही करण्याची मागणी केली. शाळांच्या इमारती, स्मशानभूमी शेड व दफनभूमीविषयक समस्या त्यांनी यावेळी मांडल्या.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती दिली. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून सन 2022-23 करिता 302 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असून आतापर्यंत 93 कोटी 74 लक्ष रुपये निधी बीडीएस प्रणालीवर प्राप्त झाला आहे. त्यापैकी                 16 कोटी 19 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. मागील दायित्व व 2022-23 मधील असा एकूण 19 कोटी 4 लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 साठी 21 कोटी 90 लक्ष रुपये राखीव ठेवण्यात आला आहे.  अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 124 कोटी रुपयांची तरतूद असून बीडीएस प्रणालीवर 36 कोटी 95 लक्ष निधी प्राप्त झाला आहे. त्यापकी 3 कोटी 71 लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना (ओटीएसपी) अंतर्गत 3 कोटी 17 लक्ष रुपये तरतूद असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.

*****

रोजगार मेळाव्याला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र पहिले राज्य - उपमुख्यमंत्री

Monday 17 October 2022

उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाच्या रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद ; 19 कंपन्यानी घेतल्या 1174 जणांच्या मुलाखती, 498 जणांची प्रथम फेरी निवड कौशल्य विकसित करण्यावर युवकांचा भर असावा : डॉ.सचिन ओम्बासे

उस्मानाबाद,दि.17(जिमाका):- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन विद्यापीठ उप-परीसरात दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले. या रोजगार मेळाव्याचे एकूण 19 कंपनीच्या 1024 जागांसाठी आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळाव्याचे उदघाटन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्‍बासे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गुप्ता, विद्यापीठ उप-परिसर संचालक डी. के. गायकवाड, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी आवताडे, व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, रिजवान कपूर आदी उपस्थितीत होते. प्रमुख पाहुण्यांनी उस्मानाबाद परिसर आणि येथील जमेची बाजू बाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हाधिकारी यांनी मिळेल त्या संधीचे रुपांतर यशा मध्ये करा असे युवकांना सांगितले आणि प्रोत्साहन दिले. संजय गुरव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. द्वितीय सत्रात मेळाव्यास आमदार राणा जगजीतसिंह पाटील, नितीन काळे यांनी भेट देऊन कंपनी प्रतिनिधी आणि विद्यार्थी यांच्याशी चर्चा केली. मान्यवरांच्या हस्ते नियुक्त झालेल्या विद्यार्थ्याला नियुक्ती पत्र देखील देण्यात आले. या रोजगार मेळाव्यात विविध इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी उपलब्ध होते, यांच्या मार्फत मुलाखती साठी येणाऱ्या विद्यार्थी आणि सहभागींना इंडस्ट्रीज मधील आवश्यकता, मुलाखत देण्याबाबत मार्गदर्शन तसेच मार्केट मधील गरजा सांगण्यात आल्या. या रोजगार मेळाव्यात 1024 पदांसाठी 19 कंपनी यात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये एक्सलंट टीचर, सवेरा ऑटो, ऐडलर बायो एनर्जी, गुड वेअर, लक्ष्मी अग्री, एन. आय आय टी फॉर आय सी आय सी आय, पेटीएम, जस्ट डायल, बालाजी अमायींस, समृद्धी गारमेंट, क्रीडीत अक्सेस, पिगिओ व्हीईकल, नव भारत, धुत ट्रान्स्मिशन, डी आर पैकिंग, ऑर्डर टेक, रघुवीर बजाज, टळेनसेतू, एमजीबीएम असोसिएट्स या कंपन्या या रोजगार मेळाव्यात उपस्थित होत्या. मेळाव्यासाठी 742 मुलाखत दारांनी नोंदणी केली आणि 1174 जणांनी मुलाखती दिल्या. यामधील ४९८ जण प्रथम फेरी निवड आणि 294 जणांची अंतिम निवड करण्यात आली. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे 21 मुलाखत दारांना नियुक्ती पत्र देखील देण्यात आले. रोजगार मेळाव्याचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडिया तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयातून केला गेला होता. या मध्ये आय.टी.आय, एम एस सी, अभियांत्रिकी, एम बी ए ई. पर्यंत शिक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यास संधी होती. या रोजगार मेळाव्याची सांगता ही या सर्व रोजगार मेळाव्याच्या व्यवस्थापनात कार्य केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर उस्मानाबाद येथील सर्व विभाग, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच कौशल्य विभाग कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम शिंदे यांनी केले आणि रिजवान कपूर यांनी आभार मानले. रोजगार मेळाव्याच्या नियुक्ती पत्र वाटप सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन बस्सैये तर आभार प्रा. वरून कळसे यांनी मानले. *****

Friday 24 June 2022

हिवताप आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना

 विशेष लेख-                                                                                                     



 हिवताप प्रतिरोध महिना जून 2022 या महिन्यात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हयातील सर्व गावात आणि शहरी भागात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये पाऊस सुरु होतो. पावसाचा जून ते सप्टेंबर हा काळ हिवताप आणि इतर किटकजन्य आजारासाठी पारेषण काळ आहे. या काळामध्ये डबके, नाल्या, खड्डे  इत्यादी ठिकाणी पाणी साचते आणि डासोत्पत्ती होते. पर्यायाने किटकजन्य आजार वाढतात. त्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. तसेच किटकजन्य आजारापासून आपले कसे संरक्षण करावे इत्यादी माहिती या हिवताप प्रतिरोध मोहीम अंतर्गत प्रत्येक वर्षी आरोग्य खात्या मार्फत दिली जाते.

किटकजन्य आजारामध्ये डास या किटकापासून होणाऱ्या आजारामध्ये प्रामुख्याने हिवताप, डेंग्यु, चिकुनगुनीया, हत्तीरोग आदी अजाराचा समावेश होतो. या सर्व आजाराचा प्रसार डासांच्या मादी मार्फत पसरविला जातो.

हिवताप आजाराची लक्षणे : थंडी वाजून ताप येणे, सतत ताप, एक दिवसा आड ताप येणे, नंतर घाम येवून अंग गार पडते, डोके दुःखते, बऱ्याच वेळा उलटया होतात.

हिवतापः- हिवताप आजाराचे निदान कशा प्रकारे केले जाते. हिवतापाच्या निश्चीत निदानासाठी तापाच्या रुग्णांचा रक्त नमुना घेवून तो सुक्ष्म दर्शकाखाली तपासणी आवश्यक असते. त्याकरिता कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य खात्यामार्फत आरोग्य सेवक, सेविका यांच्या मार्फत दैनंदिन ताप रुग्ण सर्वेक्षणात ताप आलेल्या रुग्णांचे रक्त नमुना घेवून आणि आरोग्य संस्थेमध्ये येणाऱ्या ताप रुग्णांचे रक्त नमुने संकलन करुन तपासणी करीता नजीकच्या प्रयोग शाळेत पाठविले जातात आणि प्रयोग शाळेमध्ये तात्काळ निदान केले जाते.

हिवताप आजारावर उपचार : प्रयोग शाळेमध्ये तपासणी अंती आढळून आलेल्या हिवताप दुषीत रुग्णांस जंतूच्या प्रकारानुसार आणि वयोगटानुसार क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळयाचा समूळ उपचार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली देण्यात येतो. व्हायव्हॅक्स हिवताप रुग्णांस 14 दिवस तर फॅल्सीफेरम हिवताप रुग्णांस 3 दिवस संपूर्ण समूळ उपचार देणे अंत्यत आवश्यक आहे.

 

डेंग्यु:

डेंग्यू हा कोणत्या प्रकारचा आजार आहे ?  डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे.

डेंग्यू कसा पसरतो ?  डेंग्यूचा विषाणू एडिस डासाच्या मादीमुळे पसरतो.

डेंग्यूची लक्षणे - तीव्र ताप, डोकेदुखी, उलटी, अंगदुखी आणि डोळयाच्या खोबणीमध्ये दुखणे.

डेंग्यूवरील उपाय - डेंग्यूवर कोणताही ठोस नेमका उपचार नाही. तापासाठी पॅरासिटामोल, भरपूर पाणी पिणे,  विश्रांती आणि लक्षणानुसार उपचार.

 

हत्तीरोगः-

हत्तीरोगोचा प्रसार हा क्युलेक्स मादी डासामार्फत होतो. क्युलेक्स डासाची उत्पत्ती ही घाण पाणी, गटारी, सेप्टीक टॅंक इत्यादी ठिकाणी होते. या आजारामुळे शरीराला कायमचे अपंगत्व येते. 

जिल्हामध्ये रुग्णांचे निदान करण्याकरिता दोन हत्तीरोग रात्र सर्वेक्षण पथक उमरगा आणि मुरुम येथे कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत त्या भागातील गावाचे रात्र सर्वेक्षण करून रक्त नमुने संकलन करून आणि रक्ताची तपासणी करून रोग निदान केले जाते आणि त्यांना वयोगटानुसार उपचार करण्यात येतो.

2019 ते मे 2022 अखेर रक्त नमुने तपासणी आणि दूषीत रुग्णांची माहिती :-

2019 मध्ये हिवतापासाठी एकूण 3 लाख 34 हजार 515 रक्त नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2 हिवताप रुग्ण आढळून आले. 2022 मध्ये 2 लाख 28 हजार 490 रक्त नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एक हिवताप रुग्ण आढळून आलेला आहे. 2021 मध्ये एक लाख 75 हजार 195 रक्त नमुने तपासणी केली. त्यामध्ये एक हिवताप रुग्ण आढळून आलेला आहे. तसेच 2022 मध्ये 86 हजार 418 रक्त नमुने तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकही हिवताप रुग्ण आढळून आलेला नाही.

2019 मध्ये डेंग्यु चिकुनगुनीयासाठी एकूण 383 रक्त जल नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डेग्यु रुग्ण 48 आणि चिकुनगुनीया 48,  2020 मध्ये डेंग्यु चिकुनगुनीयासाठी एकूण 185 रक्त जल नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डेग्यु रुग्ण 18 आणि चिकुनगुनीया 16 रुग्ण, 2021 मध्ये डेंग्यु चिकुनगुनीयासाठी  एकूण 418 रक्त जल नमुने तपासणी करण्यात आली त्यामध्ये डेंग्यु रुग्ण 60 आणि चिकुनगुनीया 20, 2022 मध्ये मे 2022 अखेर डेंग्यु चिकुनगुनीयासाठी एकूण पाच रक्त जल  नमुने तपासणी करण्यात आली त्यामध्ये डेंग्यु रुग्ण निरंक आणि चिकुनगुनीया एक आढळून आलेला आहे.

2019 मध्ये हत्तीरोग तपासणी करीता रात्र सर्वेक्षणाद्वारे उमरगा येथे 2019 मध्ये 17 हजार 106 रक्त नमुने तपासणी मध्ये 3 ( एम एफ दूषीत रुग्ण ) आढळून आले.  2020 मध्ये 6 हजार 782 रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत, 2021 मध्ये 10 हजार 914 रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत, 2022 मध्ये मे 2022 अखेर 6 हजार 272 रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत.

2019 मध्ये हत्तीरोग तपासणी करीता रात्र सर्वेक्षणाद्वारे मुरुम येथे 2019 मध्ये 16 हजार 670 रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत. 2020 मध्ये 10 हजार 467 रक्त नमुने तपासणी एम एफ रुग्ण निरंक आहेत, 2021 मध्ये 10 हजार 966  रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत, 2022 मध्ये मे 2022 अखेर 6 हजार 780 रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत. सर्व दूषीत रुग्णांस समूळ उपचार देण्यात आलेला आहे.

 

• किटकजन्य आजार प्रतिबंधा करिता आपण जनतेस काय अव्हान कराल :

ताप आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात जावून तपासणी करुन औषधोपचार घ्यावा.

परिसर स्वच्छता :-  घराभोवती, परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू साचू देऊ नये. त्या नष्ट कराव्यात. खराब टायर्स पंक्चर्स करावेत. पंक्चर दुकानातील टायर्स त्यात पाणी साठणार नाही, अशा पध्दतीने रचावेत. पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावेत. झाकण नसल्यास जुन्या कपडयाने झाकावेत. पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकत नाहीत. तसेच अंडयाची वाढ होण्यासाठी हवा, प्रकाश मिळू शकत नाही. घरावरील टाक्यांना झाकणे बसवा. शौचालयांच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे.

आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे :-  या दिवशी घरातील सर्व भांडी मोकळी करुन घासून पुसून घ्यावीत. परिसरातील डबकी वाहती करणे, बुजविणे, मोठया डबक्यात गप्पीमासे सोडणे. जे कंटेनर रिकामे करता येणार नाहीत. उदा. सिमेंटचे कंटेनर अशा कंटेनरमध्ये टेमिफॉस या अळीनाशकाचा वापर करावा. तसेच डासांपासून बचाव करणेसाठी अंगभरुन कपडे घालावेत. मच्छरदाणी आणि रासायनिक क्चाईलचा आदींचा वापर करावा.

 

जिल्हा हिवताप अधिकारी

उस्मानाबाद

Tuesday 17 May 2022

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचा पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आढावा

 



महानगरपालिका हद्दवाढीत येणाऱ्या गावांना आणि लगतच्या गावांना पाणी देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी,मनपा आयुक्त, म.जी.प्रा.यांनी समन्वयाने नियोजन करुन आराखडा सादर करावा -पालकमंत्री अमित देशमुख

लातूर, दि.16:- (जिमाका):-  जलजीवन मिशनंतर्गत महानगरपालिका हद्दवाढीत येणारे गावे तसेच धनेगाव डॅम माकणीवरुन पाणी देण्याचे नियोजन करण्याबाबतचे नियोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी एकत्रित समन्वयाने बैठक घेवून नियोजन करुन योजनेचा आराखडा सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

 जलजीववन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

    या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. कायंदे, कार्यकारी अभियंता श्री. शेलार, जलसंपदाचे उपविभागीय अभियंता सुनंदा जगताप, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी. गायकवाड आदी संबंधित विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्री मार्गदर्शन करतांना म्हणाले की, महानगरपालिका हद्द वाढविणार आहे. त्याच्या जवळच्या गावात वेगवेगळ्या योजना आखण्यात यावेत. मराठवाडा ग्रीड अंतर्गत जायकवाडी, माजलगाव, धनेगाव या डॅम इंटरकनेक्टेड करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.  सध्या स्थानिक स्त्रोतामधून पाणी देण्याचे नियोजन करावे , तो पाणीपुरवठा भविष्यात पुरणार नाही, त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड मधून पाणी आणण्याचे नियोजन कामी येईल.

मांजरा नदीच्या काठचे 186 गावाचे तलाव इंटर कनेक्ट करता येतात का  त्या संदर्भातील अभ्यास करावा. अशा सूचनाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या

Monday 9 May 2022

15 कोटीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ

 


 

*नूतन प्रशासकीय इमारतीत उदगीर तालुक्यातील महत्त्वाचे कार्यालय एकाच इमारतीत*

 

§  *तालुक्यातील नागरिकांची प्रशासकीय कामासाठीची सोय होणार*

§  *तालुका प्रशासकीय कामाला गती*

 

लातूर,दि.9 (जिमाका):- * उदगीर तालुक्यातील अनेक प्रशासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असून यामुळे तालुक्यातील नागरिकांची प्रशासकीय कामासाठी ओढाताण होते. ही गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतही तालुक्यातील कार्यालय एकाच इमारतीत आणण्यासाठी शासनाने प्रशासकीय इमारतीस मान्यता दिली असून यासाठी शासनाने 15 कोटीचा रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, माजी नगरध्यक्ष राजेश्वर निटुरे, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी मुळे, कल्याण पाटील, चंद्रकांत टेंगटोल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे , कार्यकारी अभियंता एम. एम. पटेल, समीर शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील आदी पदाधिकारी, नागरिक, संबंधित विभागाचे अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून आपण उदगीरच्या सर्वांगीण विकास करीत आहोत. उदगीर शहराचा होत असलेला विकास, पायाभूत विकासासोबत आपण सांस्कृतिक विकासासाठी प्रयत्न करीत आहोत. मागील काळात पंचायत समिती, लिंगायत भवन, बौद्ध विहार याचे बांधकाम सुरू आहे, याचप्रमाणे प्रशासकीय इमारतीचे बांधकामाचे शुभारंभ करण्यात येत आहे यामुळे तालुक्यातील नागरिकांची सोय होणार आहे. या इमारतीमध्ये कृषी, महसूल व वन, सहकार क्षेत्र तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालये या इमारतीमध्ये एकत्रित येणार आहेत. ही इमारत एक - दिड वर्षात ही इमारत पूर्णत्वाकडे घेवून जाणार आहोत.

Sunday 24 April 2022

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

 




95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोपात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिला दृकश्राव्य माध्यमातून दिल्या शुभेच्छा

दृष्टी दान करता येते दृष्टीकोन नाही; दृष्टीकोन साहित्याच्या वाचनातून निर्माण झालेला असतो - केंद्रीय रस्ता विकास मंत्री नितीन गडकरी


लातूर,दि.24 ( जिमाका )  दृष्टी दान करता येते, पण दृष्टीकोण  ( व्हिजन ) दान करता येत नाही. डोळे नष्ट करता येतात, पण डोळ्या मागचा विचार कोणी नष्ट करु शकत नाही. साहित्य, संगीत यातून माणूस समृद्ध होत असतो. त्यामुळे आपल्या मराठी भाषेचे वैभव अनन्य साधारण आहे. महाराष्ट्र आणि बंगाल या दोन संस्कृतीतले साहित्य आणि संगीत अत्यंत प्रगल्भ आहे. आपण ज्यावेळी महाराष्ट्र सोडून बाहेर जातो त्यावेळी आपली भाषा किती थोर आहे याची जाणीव होते असे हृद मनोगत केंद्रीय रस्ता विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिला दृकश्राव्य माध्यमातून दिल्या शुभेच्छा


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वनी चित्रफीतीद्वारे 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात रविवारी समारोप समारंभात रसिकांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या शुभसंदेशाची सुरुवात मराठी भाषेतून केली. संमेलन स्थळाला भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी नाव दिल्याबद्दल राष्ट्रपतींनी आयोजकांचे आभार मानले. त्याचबरोबर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी गेले ६० वर्षे शिक्षण देण्याचे काम करीत असल्याबद्दल आणि हिरक महोत्सवी वर्षानिमित सोसायटीच्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. 

उदयगिरी महाविद्यालयाची स्थापना शेतकरी आणि व्यापारी यांच्या आर्थिक योगदानातून करण्यात आली आहे. अशा लोकांच्या असामान्य योगदानातूनच समाज आणि राष्ट्र प्रगती करीत असतो. या योगदानाबद्दल महाविद्यालाच्या संस्थापक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. 

मला याचा आनंद होत आहे, की हे साहित्य संमेलन भारताच्या स्वातंत्रच्या अमृत महोत्सव वर्षात होत आहे. देशातील स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे मोठे योगदान दिले आहे. संमलेनाच्या मुख्य सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे नाव देऊन आयोजकांनी एकप्रकारे सामाजिक समतेचा संदेशच दिला आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हीच परंपरा पुढे चालू ठेवली. समता आणि शौर्य ही महाराष्ट्राची ओळख आहे. प्राकृत आणि अपभ्रंशातून निर्माण झालेली मराठी भाषा ही जेवढी प्राचीन आहे तेवढीच समृद्ध आहे. 

अनेक मराठी संतांचे मराठी भाषेला मोठे योगदान आहे. त्यांनी तुकारामांचे अभंग वाचून दाखविले. 

राष्ट्रपतींनी महाराष्ट्राच्या २२०० वर्षांपूर्वी असलेल्या सातवाहन राज्यातील राणी नागरीकाने दिलेल्या योगदानाची दखल घेत आतापर्यंत कर्तृत्व गाजविलेल्या महिलांच्या कार्याचा आढावा घेतला. सद्यस्थितीत इतर राज्यांच्या तुलनेत २०२१ जनगणनेनुसार महिलांचा जन्मदर आणि साक्षरता कमी असल्याचे नमूद करीत चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर या दोन विषयासंबंधी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन केले.


95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी या साहित्य मंचावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, विधानसभेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, राज्यमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील,खा. सुधाकर शृंगारे, सौ. कांचनताई गडकरी , आ. संभाजीराव पाटील निलंगेकर,आ. अभिमन्यू पवार,आ. रमेशअप्पा कराड,माजी आमदार गोविंद केंद्रे,सुधाकर भालेराव, महामंडळाच्या नुतन अध्यक्षा उषा तांबे,जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,बापूराव राठोड, इतिहासकार गो.ब.देगलूरकर, महामंडळाचे  कार्यवाह दादासाहेब गोरे,कोषाध्यक्ष रामचंद्र कालुंखे यांची उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून आपल्याला मूलभूत अधिकार दिलेत त्यात अभिव्यक्ती आणि बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पण अभिव्यक्त होताना समाजाला, राष्ट्राला पोषक होईल असेच लिहावे, बोलावे असे विचार नितीन गडकरी यांनी मांडले. कोणीही शंभर टक्के परिपूर्ण नाही, उत्तम गुणवत्तेवर कोणाचे पेटेन्टही नाही ही सगळी प्रक्रिया शिक्षण आणि प्रबोधनातून घडते. त्यामुळे साहित्याचे योगदान मोठे आहे. येणारा काळ नॉलेजचा आहे, त्या नॉलेजचे रूपांतर संपत्तीत करण्याची संधी आपल्याकडे देश म्हणून आहे. आपल्या देशाचे युवक जगभर उत्तम संगणक अभियंते म्हणून नावाजले जात आहेत. अमेरिका, ब्रिटन सारख्या देशात मूळ भारतीय असलेल्या डॉक्टरांवर लोकांचा विश्वास वाढतो आहे. हे सगळे संस्कार आपल्या साहित्य संस्कृतीने त्यांना दिले असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

साहित्याचे व्यासपीठ हे राजकारणाचे वरचे असून राष्ट्र घडविण्याचे सामर्थ्य साहित्यात असल्याची भावनाही गडकरी यांनी व्यक्त करून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने हे भव्य साहित्य संमेलन आयोजित केल्या बद्दल संस्थेचे कौतुक करून ग्रामपंचायत क्षेत्रात भरलेले हे आज पर्यंतच्या इतिहासातले पहिले साहित्य संमेलन असल्यामुळे संयोजकांनी हा साहित्याचा महामेळा उभा केल्याबद्दल अभिनंदन केले.

पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, हे साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर मध्ये झाले याचा आपल्याला खूप आनंद झाला. हे साहित्य संमेलन अतिशय उत्तम झाले, विषयांची निवड अत्यंत दर्जेदार होती, त्यामुळे संमेलन खूप ऐतिहासिक झाल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखविली. या संमेलनात महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावर चर्चाही महत्वाची ठरली असून केंद्रीय रस्ता विकास मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार आपण दोघांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न सुटू शकतो.

उदगीरचे आणि माझे ऋणानुबंध जुने असून उदगीरच्या विकासासाठी जे जे शक्य आहे ते सांगून उदगीर ला जिल्हा करण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न करणार अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती  निलम गोऱ्हे यांनी दिली.

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, उदगीर सारख्या शहरात असे साहित्य संमेलन घेऊन ते अत्यंत यशस्वी झाले. त्यामुळे हे साहित्य संमेलन  ऐतिहासीक झाले.

यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके यांनी मनोगत व्यक्त केले.


**

Tuesday 8 March 2022

जळकोट तालुक्यातील तिरु नदीवरील सात बॅरेजेसना प्रशासकीय मान्यता

 


शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा ऐतिहासिक निर्णय

सुमारे शंभर कोटी रुपये यावर होणारा खर्च

लातूर,दि.8(जिमाका):-  जळकोट तालुक्यातील तिरु नदीवरील सात बॅरेजेसना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिल्यामुळे 19 किलोमीटर अंतराच्या या तिरु नदीवरील व परिसरातील शेतकऱ्यांच्यासाठी  ऐतिहासिक व सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा हा निर्णय असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती निर्माण होणार असल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

          शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम होईल सुमारे 1 हजार 300 एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. सुमारे शंभर कोटी रुपये खर्च येणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येणार असून अशा आशयाचे पत्र जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी दिले. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्याने 8 मार्च महिला दिनी जळकोट तालुक्याला आनंद दिल्याची भावना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.

जळकोट तालुक्यातील तिरू नदीवर बॅरेजेस बांधण्यात येतील असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांनी एका शेतकरी मेळाव्यात दिले होते. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र पाणी पुरवठा राज्यमंत्री या नात्याने त्याबाबत शासन दरबारी  विशेषतः जलसंपदा विभागाकडे जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.  8 मार्च 2022 रोजी या सात बॅरेजेस ना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आल्याची माहिती बनसोडे यांनी दिली.

          तालुक्यातील बेल सांगवी या ठिकाणी 11 कोटी 25 लक्ष 2150 रुपये खर्च करून बॅरेज बांधण्यात येणार आहे. तर डोंगरगाव -1 या ठिकाणी 13 कोटी 96 लक्ष 23 हजार 967 रुपये डोंगरगाव-2 19 कोटी 8 लक्ष 8 हजार 315 बोरगाव येथे 12 कोटी 81 लक्ष 38000 292 रुपये तिरुका येथे 18 कोटी 70 लक्ष 90 हजार 255 तर सुल्लाळी येथे 12 कोटी 31 लक्ष 39 हजार 187 रुपये तर गव्हाण येथे 11 कोटी 47 लक्ष 60 हजार 164 असे एकूण शंभर कोटी या बॅरेजेस वर खर्च होणार असून यामुळे जळकोट तालुक्याचे डोंगरी तालुका हे नाव पुसले जाऊन आता एक सिंचनाचा तालुका म्हणून याची नवीन ओळख होणार आहे. 1 हजार 300 एकर जमिन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे जमीन अंतर्गत पाण्याची पातळी वाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहेत, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. 

 शेतकऱ्यांच्या जीवनात वरदान ठरून एक हरित क्रांती निर्माण होईल व या परिसरातील सुमारे बेलसांगवी, कोळनूर, मंगरूळ, एकुर्का, डोंगरगाव, माळीहिप्परगा, धनगरवाडी, सोनवळा, तिरुका, सुल्लाळी, आतनूर, गव्हाण, सांगवी याशिवाय इतर दहा ते पंधरा गावात ना या बेरजेचा फायदा होणार आहे सतत अवर्षणग्रस्त दुष्काळी व डोंगरी तालुका म्हणून यांची ओळख होती. तालुक्यातील केवळ एकमेव 19 किलोमीटर अंतराची तिरुका नदी असून त्या नदीवरील यापूर्वीचे कोल्हापुरी बंधारे मोडकळीस आल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य शासनाने त्याचे रूपांतर बॅरेजेस मध्ये करून जळकोट तालुक्यासाठी हा ऐतिहासिक केला असल्याची निर्णय केला असलयाची माहिती संजय बनसोडे यांनी सांगितले.