Followers

Tuesday 17 May 2022

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचा पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आढावा

 



महानगरपालिका हद्दवाढीत येणाऱ्या गावांना आणि लगतच्या गावांना पाणी देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी,मनपा आयुक्त, म.जी.प्रा.यांनी समन्वयाने नियोजन करुन आराखडा सादर करावा -पालकमंत्री अमित देशमुख

लातूर, दि.16:- (जिमाका):-  जलजीवन मिशनंतर्गत महानगरपालिका हद्दवाढीत येणारे गावे तसेच धनेगाव डॅम माकणीवरुन पाणी देण्याचे नियोजन करण्याबाबतचे नियोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी एकत्रित समन्वयाने बैठक घेवून नियोजन करुन योजनेचा आराखडा सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

 जलजीववन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

    या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. कायंदे, कार्यकारी अभियंता श्री. शेलार, जलसंपदाचे उपविभागीय अभियंता सुनंदा जगताप, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी. गायकवाड आदी संबंधित विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्री मार्गदर्शन करतांना म्हणाले की, महानगरपालिका हद्द वाढविणार आहे. त्याच्या जवळच्या गावात वेगवेगळ्या योजना आखण्यात यावेत. मराठवाडा ग्रीड अंतर्गत जायकवाडी, माजलगाव, धनेगाव या डॅम इंटरकनेक्टेड करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.  सध्या स्थानिक स्त्रोतामधून पाणी देण्याचे नियोजन करावे , तो पाणीपुरवठा भविष्यात पुरणार नाही, त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड मधून पाणी आणण्याचे नियोजन कामी येईल.

मांजरा नदीच्या काठचे 186 गावाचे तलाव इंटर कनेक्ट करता येतात का  त्या संदर्भातील अभ्यास करावा. अशा सूचनाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या

No comments:

Post a Comment