Followers

Thursday 16 April 2020

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये 3 मेपर्यंत बंद ठेवावेत-जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे



      उस्मानाबाद, दि. 16 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी  दि.30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविला आहे आणि भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 3 मे, 2020 पर्यत वाढविला आहे . त्यामुळे कोरोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायोजनेचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हयातील सर्व सरकारी व खाजगी शाळा, खाजगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस, अंगणवाडया तसेच महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, निवासी विद्यार्थी वसतिगृहे असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील सर्व मोठया शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा तसेच जिल्हयातील  सर्व क्रीडा संकुले दि. 3 मे, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत.
     या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ लागू करण्यात येत आहे.
     यापूर्वी कोरोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायोजनेचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हयातील सर्व सरकारी व खाजगी शाळा, खाजगी शिकवण्या,  कोचिंग क्लासेस, अंगणवाडया तसेच महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, निवासी विद्यार्थी वसतिगृहे असलेल्या सर्व  मोठया शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा तसेच  सर्व  क्रीडा संकुले दि. 14 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित केले होते.

No comments:

Post a Comment