Followers

Thursday 16 April 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने 3 मे पर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे आदेश


उस्मानाबाद, दि. 16 (जिमाका) :- जिल्हयामध्ये दि.14 एप्रिल 2020 पर्यंत खालील नमूद अत्यावश्यक आस्थापना वगळता लॉकडाऊनचे आदेश पारित केले होते. महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत वाढविला आहे आणि भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 3 मे, 2020 पर्यंत वाढविला आहे.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार कोरोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खालील आस्थापना वगळून जिल्ह्यातील इतर सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 3 मे, 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
भारत सरकारने संरक्षण, केंद्रीय पोलीस सुरक्षा दल, आरोग्य व कुटुंब कल्याण, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय माहिती केंद्र, भारतीय अन्न महामंडळ, एनसीसी, नेहरु युवा केंद्र, कस्टम, डाक सेवा इत्यादी विभाग.
तसेच राज्य शासनाने पोलीस, होमगार्ड, नागरी सुरक्षा,अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन, तुरुंग व कारागृह आणि नगरपालिका सेवा, वन विभागाच्या आस्थापना, जिल्हा प्रशासन व कोषागार कार्यालये.
पिण्याचा पाणी पुरवठा, स्वच्छता, साफसफाई व सांडपाणी निचरा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था.सर्व बँका व विमा कंपन्या, सर्व एटीएम केंद्रे आणि दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना. जीवनावश्यक वस्तू अन्न, फळे, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ संकलन व विक्री केंद्रे, अंडी, मांस व मासे विक्रेते, कुक्कुटपालन व्यवसाय, पशुखाद्य विक्रेते, किराणा सामान दुकानदार, रास्तभाव दुकाने. दवाखाने, रुग्णालये, इस्पितळे व औषधी दुकाने, जनऔषधी केंद्रे, वैद्यकीय प्रयोगशाळा, पशुवैद्यकीय दवाखाने व चिकित्सालये,पशु औषध विक्री केंद्रे.विद्युत निर्मिती, विद्युत पुरवठा, विद्युत वहन व वितरण, ऑईल व गॅस वितरण, पेट्रेालियम पदार्थ व उत्पादने.प्रसार माध्यमे, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया, आय.टी.सेवा देणाऱ्या आस्थापना, कुरियर सेवा.कृषी व फळबागे संबंधीची कामे,  



कृषीमाल खरेदी विक्री केंद्रे, कृषी अवजारे विक्री केंद्र, खते, किटकनाशके, कृषी बि-बियाणे उत्पादक व विक्रेते, मत्स्यव्यवसाय उत्पादन व विक्री.शितगृहे, गोदाम साठवणूक केंद्रे, खाजगी सुरक्षा सेवा व सुविधा देणाऱ्या संस्था.या वरील आस्थापना व दुकाने वगळून उस्मानाबाद जिल्हयातील इतर सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 3 मे, 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
          या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. उस्मानाबाद, पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद, अधीक्षक, राज्य उत्पादक शुल्क, उस्मानाबाद,  सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा उस्मानाबाद, सहाय्यक आयुक्त, अन्न व  
औषध प्रशासन, उस्मानाबाद, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, सर्व सहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी जिल्हा उस्मानाबाद इत्यादींची असेल.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19  उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
     या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 15 एप्रिल 2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment