Followers

Saturday 4 April 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील दस्त नोंदणी व्यवहार 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश


 उस्मानाबाद, दि. 3 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 उपाययोजना नियम 2020 प्रसिध्द केले असून यातील नियम क्र.3 नुसार कोरोना विषाणूमुळे (COVID-19) उद्वलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
          उस्मानाबाद जिल्ह्यातील  सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीकरिता नागरिकांची गर्दी मोठया प्रमाणात होते व याठिकाणी दस्त नोंदणीचे कामकाजासाठी बायोमेट्रीक यंत्रणेचा वापर केला जात असल्याने कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव होऊ  नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयांमध्ये होणारे दस्त नोंदणी व्यवहार दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेशित केले आहे.
          भारत सरकारने दि.14 एप्रिल 2020 पर्यंत संपूर्ण भारत देशभर लॉकडाऊन आदेश पारित केलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत.
          जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार कोरोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयांमध्ये होणारे दस्त नोंदणी व्यवहार दि. 14 एप्रिल 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
          या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करुन दैनंदिन अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे बाबत सह जिल्हा निबंधक, उस्मानाबाद यांना आदेशित करण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
     या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ लागू करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment