Followers

Monday 6 April 2020

जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी आपली माहिती स्वेच्छेने कळवावी - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे जाहीर आवाहन



उस्मानाबाद, दि. 6 (जिमाका) :- कोविड -19 च्या अनुषंगाने कोरोना या विषाणूचा प्रसार व संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी निजामोद्दीन मर्कज दिल्ली, जिल्हा पानिपत हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर भागात झालेल्या जमात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी आपण आपली माहिती स्वेच्छेने खाली दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधून कळवावी, असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.
प्रशासनातर्फे आपणास योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल. कोरोना विषाणूस प्रतिबंध हाच कोविड-19  यावर उपाय असल्याने आपण, आपले कुटुंब, आपले प्रियजन, आपला समाज, आपला गाव हे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी पुढाकार घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. तसेच आपण जमात या कार्यक्रमास सामील झाल्याची माहिती प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवल्यास  व त्यातून पुढे भविष्यात आपण कोरोना बाधित आढळून आल्यास जाणीवपूर्वक कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग केल्याबद्दल आपणाविरुध्द  भारतीय दंड विधान-1860 च्या कलम 269, 270, 188 व 34 अन्वये कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
          तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याव्दारे सुचित करण्यात येते की, त्यांच्याकडे  वरील विषयी  कांही  माहिती असेल वर दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधून प्रशासनास माहिती देवून सहकार्य करावे.
 संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. श्री. संदीप पालवे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक,उस्मानाबाद (भ्रमणध्वनी क्रमांक :- 9545531234), श्री. एम. एस. कांबळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नोडल अधिकारी (कोवीड-19) जिल्हाधिकारी कार्यालय,  उस्मानाबाद  (भ्रमणध्वनी क्रमांक :- 9960425870 आणि रोहयो विभाग,  जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद  येथील दूरध्वनी क्र. (02472) 222279  या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती कळवावी. 

No comments:

Post a Comment