Followers

Friday 10 April 2020

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी श्रीकांत यांचे प्रत्येक कुटुंबातील लहान मुलांना आवाहन



जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या घरातील एसीपी शाश्वती

लातूर,दि.10:-कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत जिल्हा प्रशासन नागरिकांनी घरी बसावे व विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून नागरिकांना विविध मार्गदर्शक सूचना देत आहे. परंतु त्या सूचनांना आणखी ही शंभर टक्के प्रतिसाद मिळत नाही; म्हणुन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून ऑंटी कोरोना पोलीस(ACP) हे अभियान राबविण्याचे निश्चित झाले.
Anti Corona Police अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या घरापासूनच आज झाली. जिल्हाधिकारी श्रीकांत हे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडत होते त्याच वेळी घरचा अँटी कोरोना पोलीस म्हणजेच जिल्हाधिकारी महोदय यांची मुलगी शाश्वती बाहेर आली व आपल्या पप्पांना म्हणाली, पापा आपण कुठे जात आहात? घराबाहेर जाणे आपल्यासाठी आवश्यकच आहे का? अशी विचारणा केली. जर आपण ऑफिस मध्ये जात आहात तर प्रथम आपण तोंडाला रुमाल लावावा किंवा मास्क लावावा त्यानंतर हाताला सांनिटायझर लावावे मगच घराबाहेर पडावे.तसेच तुम्ही ज्या वेळेस ऑफिसमधुन घरी आल्यावर घरात येण्यापूर्वी  आपण प्रथम हात पाय स्वच्छ धुवावेत. हँड वॉश करताना किमान 20 सेकंड 8 पद्धतीने करावे. अशा सूचना शाशवती हिने जिल्हाधिकारी महोदयांना केल्यानंतर मी  घरातील ACP आहे, असे सांगितले.
    जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी ही मुलगी शाश्वती म्हणजे घरची ACP च्या सूचनेप्रमाणे कार्यवाही केली व ते कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले.
*आवाहन*
    लॉक डाउन जाहीर झाल्यापासून लातूर पोलीस विभाग दिवस-रात्र नागरिकांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी घरातच बसून राहावे यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु अनेक लोक कोणत्या ना कोणत्या कारनासाठी घराबाहेर पडत आहेत त्यामुळे सामाजिक अंतर व कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे घरातच घरचा पोलिसांनी टोकले व विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले व गरज असेल  तर घराबाहेर जावा त्यासाठी तोंडाला मास्क लावणे, हात सांनिटायझर करणे अन्यथा घरात बसूनच कोरोना चा प्रतिकार करू या सूचना घरच्या छोट्या एसीपी कडून ऐकल्यास याची प्रभावी अंमलबजावणी होईल याची शक्यता वाटल्याने हे आंटी कोरोना पोलीस अभियान लातूर जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत  पोहोचवून एक ही नागरिक घराबाहेर पडणार नाही यासाठी हे अभियान नक्कीच उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी व्यक्त केली. प्रत्येक कुटुंबात एक एसीपी असला पाहिजे असे सांगितले. ACP शी संवादचा एक व्हिडिओ करून सोशल मिडियाला वायरल करावा असेही आवाहन त्यांनी केले. यासाठी #AntiCoronaP olice हा हॅशटॅग वापरावा असे आवाहन त्यांनी केले.
          *****

No comments:

Post a Comment