Followers

Wednesday 22 April 2020

अहमदपूर व चाकूर तालुक्यात लॉक डाउनच्या काळात रेशन मार्फत योग्य पद्धतीने धान्य वाटप झाले पाहिजे -राज्यमंत्री संजय बनसोडे



* नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नये
* शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे
लातूर दि. 22:- अहमदपूर- चाकूर तालुक्यातील  सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा तसेच लॉक डाउन च्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत योग्य पद्धतीने धान्य वाटप झाले पाहिजे. तसेच या भागातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही यासाठी संबंधित यंत्रणेने योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे संसदीय कार्य, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन व रोजगार हमी योजना व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
      कोरोना च्या पार्श्वभूमीवर लातूर चाकूर तालुक्यातील आरोग्यविषयक योजना, रेशन धान्य वाटप व शेतकऱ्याच्या अडचणीबाबत आयोजित आढावा बैठकीत राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी आहमदपुर विधानसभेचे आमदार बाबासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार शिवानंद बिडवे, उपविभागीय अधिकारी (पोलीस ) आश्विनी शेलार, पोलीस निरीक्षक पुजारी, मुख्याधिकारी  जाधवर, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक, महावितरण उपविभागीय अभियंता काळे ,माजी जि.  प. सभापती चंद्रकांत मदे, जि. प. सदस्य कल्याण पाटील,शहराध्यक्ष अजहर बागवान,एलियास सयद,नबी सय्यद,फेरोज शेख,चंद्रशेखर भालेराव, आशिष तोगरे,आदींची उपस्थिती होती .
राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, जनतेला आरोग्य विषयक सेवा , जीवनावश्यक वस्तू  व रोटेशन चालू असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत. शेती कामासाठी लागणारी साहित्याचे दुकाने शासनाने सांगितलेल्या नियमानुसार चालू करावे याबाबतच्या सूचना दिल्या.
    तसेच तालुक्यात किती लोकांना होम कोरंटाइन केले आहे , किती लोकांच्या टेस्ट झाल्या आहेत , रेशन वरील धान्य वाटप व्यवस्थित होत आहे का ? अशा विविध बाबीवर या बैठकीत चर्चा झाली तसेच रोटेशन चालू असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहे . याबाबत सर्व नियम पाळून शेतकऱ्यांना मदत करावी, असे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
    कोरोना विषाणूच्या अनुषंगाने शासन व प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे तरी नागरिकांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे व घरातच बसून राहावे, घराबाहेर पडू नये. तसेच इतर जिल्ह्यातून व परराज्यातून आपल्या गावात कुटुंबात कोणी आले त्याबाबतची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्यात यावी व आपले गाव, शहर व जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी सर्वांनी आपले सहकार्य करावे असे आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले.
           ***

No comments:

Post a Comment