Followers

Tuesday 21 April 2020

जिल्हयाची अर्थव्यवस्था चालू राहण्यासाठी उद्योग सुरु झाले पाहीजेत-पालकमंत्री अमित देशमुख




*सामाजीक अंतर पाळणारे उद्योग तात्काळ बंद करावेत
*आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत
*प्रशासनाने जेष्ठ नागरिकांना मास्क पुरवावेत
*जिल्हयाच्या सीमेवरच नागरिकांची तपासणी करुन संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठवावेत
*अँटी कोरोना फोर्सचा पालकमंत्र्यांकडून कौतूक

        लातूर, दि.21:- जिल्हयाची अर्थव्यवस्था सुरळीतपणे चालू राहण्यासाठी उद्योग सुरू झाले पाहीजेत. त्यामुळे शासनाच्या निर्देशांनुसार जेवढे उद्योग सुरु करता येतील तेवढे उद्योग सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी. परंतु हया उद्योगांनी कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रशासनाने दिलेले मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे,असे निर्देश वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते.यावेळी संसदीय कार्य, सार्वजनिक बांधकाम पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय ढगे,जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञानसंस्थेचे अधिष्ठता डॉ.गिरीश ठाकूर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात बहुतांश उद्योग परवानगी घेऊन सुरु ठेवता येणार आहेत. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे त्यांना बंधनकारक आहे. अत्यावश्यक अत्यावश्यक सेवेत नसलेले जिल्हयातील उद्योग सुरु झाले पाहीजेत. अशा आपत्तकालीन परिस्थितीमध्ये उद्योगांनी पुन्हा उभारी घेण्यासाठी शासन-प्रशासनाने सहकार्य करावे. त्यातून जिल्हयाची  अर्थव्यवस्था ही पुन्हा सुरु होईल, असे त्यांनी सूचित केले.
जिल्हयातील उद्योग शासनाच्या नियमांप्रमाणे सुरु होण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कामगारांसाठी राहण्याची जेवणाची व्यवस्था उद्योजकांनी त्याच ठिकाणी करावी. तसेच कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उद्योगाच्या ठिकाणी कामगारांनी सामाजीक अंतर पाळले पाहीजे.अन्यथा असे उद्योग तात्काळ बंद करावेत. त्यासाठी एमआयडीसीने एक पथक तयार करण्याचे  निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञानसंस्थेच्या रुग्णालयात काल अचानक 20 ते 25 लोक तपासणीसाठी दाखल झाले. ते पुणे, मुंबई हैदराबाद येथून आल्याची माहिती मिळाली. जिल्हयाच्या सीमा कडेकोट बंद असतानाही असे लोक जिल्हयात प्रवेश करत आहेत.यावर पोलीस प्रशासनाने अधिक सजग रहावे, असे निर्देश श्री. देशमुख यांनी देऊन अशा लोकांना चेक पोस्टवर तपासणी करुन संस्थात्मक विलगीकरण कक्षात 14 दिवस ठेवल्यानंतरच घरी पाठवावे, असे त्यांनी निर्देशित केले.
जिल्हयातील सर्व जेष्ठ नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने मास्क पुरवठा करण्याबाबत धोरण निश्चित करावे याकरिता महिला बचत गटांकडून एकाच स्टँडर्ड क्वॉलिटीच्या मास्कचे उत्पादन करुन घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यानी  केले. आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व रिक्त पदे भरुन घ्यावीत. त्याप्रमाणेच विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ही सर्व पदे भरण्याचा प्रस्ताव अधिष्ठता यांनी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हयातील सर्व कामगारांची यादी कामगार विभागांनी सादर करावी. शासनाने आपतकालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक कामगाराला 2 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार एक ही अधिकृत कामगार या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
लातूर जिल्हा प्रशासनाने जिल्हयाच्या प्रत्येक गावांत कोरोनाच्या प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या अँटी कोरोना फोर्सचे कौतुक पालकमंत्री देशमुख यांनी करुन बाभळगाव येथे जात असताना ACF च्या चेक पोस्टवर थांबावे लागल्याची माहिती  पालकमंत्री देशमुख यांनी देऊन हा फोर्स अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी म्हटले.तसेच रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रशासनाने काम करावे, असे त्यांनी सूचित केले.
उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून रुग्ण्लातूरकडे पाठविले जाऊ नयेत. अत्यावश्यक असेल तरच रेफर करावे. अन्यथा सर्व सुविधा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध्असल्याने डॉक्टर्सनी येथेच रुग्णांची तपासणी करण्याची सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी केली.
जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या विविध उपाय योजनांची सविस्तर माहिती देऊन कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अँटी कोरोना फोर्स हा ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही स्थापन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही सूचना मांडल्या. तर पोलीस अधिक्षक माने यांनी पोलीस विभागाच्या सज्जतेची माहिती देऊन लातूर शहराच्या मुख्य रस्त्यावर बॅरेकेड लावल्यावर बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर अधिक नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे सांगितले.
लातूर जिल्हयाला पालकमंत्री देशमुख यांच्या प्रयत्नामुळे 22 व्हेंटीलेटर मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिली. तसेच विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील लॅब ही शुक्रवार पर्यंत कार्यांन्वीत होईल, असे अधिष्ठता डॉ. ठाकूर यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यातील शासनाच्या सूचनांच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

No comments:

Post a Comment