Followers

Thursday 16 April 2020

रेशनकार्डची पोर्टबीलीटी शक्य आहे का ते तपासावे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांना टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे सुचना



लॉकडाऊनची गावपातळीवर काटेकोर अमंलबजावणी करून लातूर कोरोनामुक्त ठेवावे

           लातूर,दि.16:- लातूर जिल्हा आजवर कोवीड-19 मुक्त राहिला आहे यात सर्वांचेच योगदान आहेयापुढेही आपला जिल्हा सुखरूप ठेवायचा आहे त्यामुळे  लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगून या काळात कोणीही उपाशीपोटी राहू नये याची काळजीही घ्यावी लागणार आहे. एका गावातून दुसऱ्या गावात किंवा ग्रामिण भागांमधून शहरात आलेल्या लोकांसाठी रेशन कार्डची पोर्टेबिलिटी करता येते का? या दृष्टीने विचार करून शक्यता असेल तर तसा प्रस्ताव तयार करावा अशा सूचना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हातील  तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांना  दिल्या आहेत.
         पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दिनांक १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांचेशी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून कोवीड-१९चा प्रसार थांबविणे आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी तसेच त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. कोरोनाला जिल्ह्यात शिरकाव होणार नाही यासाठी दक्ष राहा.  लातूर जिल्हा आजवर कोवीड-19 मुक्त  राहिला आहे. त्याचा जिल्ह्यात शिरकाव होऊनये यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले आहेत. त्या बददल प्रारंभी पालकमंत्री देशमुख यांनी सर्वांचे कौतुक करून धन्यवाद दिले. यापुढेही जिल्ह्यात असेच काम सुरू ठेवण्यासाठी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.  
लॉकडाऊनचा कालावधी मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे काटेकोर पालन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. २० तारखेनंतर मे पर्यंत काही प्रमाणात यात शिथिलता दिली जाणार आहे, याची माहिती आपल्याला मिळणारच आहे. त्यासंबंधीच्या सूचनाचेही योग्य रीतीने आपल्याला पालन करावे लागणार आहे असे त्यांनी नमूद केले. लॉकउाऊनच्या काळात आपल्या जिल्ह्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. रेशन दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या अन्नधानन्याच्या बाबतीत बऱ्याच शंका-कुशंका लाभार्थ्यांमधू   व्यक्त केल्या जात आहेत. त्या दूर करून लाभार्थ्यांना धान्य मिळावे यांची दक्षता तहसिलदार मंडळीनी घेणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि त्यांचे इकेवायसी झाले आहे त्यांना धान्य मिळण्यात अडचन येण्याचे तर कारणच नाही, परंतु इकेवायसी नसलेल्यासाठी प्रक्रिया पूर्ण करून द्यावी त्यांच्यासाठी अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे असे सांगून ज्यांनी रेशन कार्डच काढलेले नाही ,त्या संदर्भात काय करता येईल यासाठी अभ्यास करून प्रस्ताव तयार करावा त्याचबरोबर जे एका गावातून दुसऱ्या गावात गेले आहेत किवा गावातून शहरात आले आहेत त्यांचे मुळ रेशनकार्डची पोर्टबिलीटी शक्य आहे का ? याचाही अभ्यास करून प्रस्ताव तयार करावा अशा सुचना पालकमंत्री  ना. देशमुख यांनी यावेळी दिल्या. 
 लॉकडाऊन संपताच टंचाईच्या कामांना प्राधान्य द्या
    सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लॉकडाऊन संपताच आपणाला टंचाई निवारणाची कामे सुरु करावी लागतील. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी असे प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घ्यावे. पाणीटंचाई,पाणंद रस्ते, ग्रामीण रुग्णालयांची दुरुस्ती, याला प्राधान्य द्यावे. शेतीशी निगडित कामे करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रात रोजगार हमीतून शेततळी, पाणंद रस्ते, गाळ काढण्याची कामे  याचे प्रस्ताव  करावेत, सद्यपरिस्थितीत काय करावे आणि काय करू नये यासंबंधी शेतकरी वर्गात गोंधळ उडाल्यची शक्यता आहे. त्यांनाही योग्य मार्गदर्शन करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सुचना पालकमंत्री ना. देशमुख यांनी दिल्या आहेत 

गावपातळीवरही नाकेबंदी करून बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या लोकापासून जिल्हयातील नागरिकांना  कोविड१९ पासून आजवर सुरक्षित  ठेवले आहे. जनजागृतीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. गावागावात प्रतिबंधत्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी  माहिती तहसिलदार गटविकास अधिकारी यांनी यवेळी दिली
 खत टंचाई होऊ नये याची काळजी घेऊ
लॉकडाऊन मुळे सध्या सर्वत्र वाहतूक बंद आहे त्यामुळे खरीपासाठी  येणारा खत पुरवठा सध्या बंद आहे. त्यामुळे जूनमध्ये खताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी माहिती निलंगा तहसीलदार यांनी दिली, तेव्हा ही महत्वाची बाब आहे त्यामुळे त्या दृष्टीने विचार कार्यवाही केली जाईल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment