Followers

Sunday 16 September 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात जी.श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण


         

      लातूर,दि.17:-मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त  नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या हस्ते सकळी 8-00 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तर जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सकाळी 8-20 वाजता अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
        यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे,उपजिल्हाधिकारी (सा) सुनील यादव,उपजिल्हाधिकारी (पुर्नवसन) प्रदीप मरवाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव,तहसिलदार श्री.पाटील,जिल्हा कोषागार अधिकारी श्री. राऊत,औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते,उत्पादन शुल्कचे अधिक्षक केशव राऊत,उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार मोरे,जिल्हा विशेष लेखा परिक्षक उमाकांत पवार यांच्यासह जिल्हधिकारी कार्यालय  मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील विभागप्रमुख,अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment