Followers

Monday 3 September 2018

‘लोकराज्य’ महत्वाचा संदर्भ ग्रंथ -अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार


        हिंगोली,दि.03 : प्रशासकीय सेवेच्या स्पर्धा परीक्षांची तयार करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात लोकराज्यमासिकाचा महत्वाचा वाटा राहिला आहे. ‘लोकराज्यहे केवळ मासिक नसून ते महत्वाचा संदर्भ ग्रंथ असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लोकराज्यवाचक अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आदर्श महाविद्यालय येथील सभागृहात लोकराज्यवाचक अभियान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी.डी वाघमारे, स्पर्धा परिक्षा केंद्राचे संचालक प्रा. गौतम सुर्यतळ, उप प्राचार्य प्रा. एल. एम. सामलेटी, पर्यवेक्षक प्रा. . एस. इंदाणी आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
            यावेळी श्री. मिनियार म्हणाले की, शासनाच्या विविध योजना आणि विविध माहितीची प्रचार आणि प्रसिध्दी करण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत होते. त्याचाच एक भाग म्हणून महासंचालनालयातर्फे शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्यहे मासिक प्रकाशित केले जाते. या मासिकाचा अभ्यास करुनच आपण प्रशासकीय सेवेत आलो आहोत. ‘लोकराज्यमासिकात राज्य शासनाची अधिकृत माहिती, आकडेवारीसह उपलब्ध होते. ही माहिती स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे लोकराज्यकेवळ मासिक नसून महत्वपूर्ण असा संदर्भग्रंथ आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातही लोकराज्यमासिक आवर्जून वाचले जाते. शासनाने अत्यंत अल्प दरात आपणांकरीता हे मासिक उपलब्ध करुन दिलेले आहे. या संधीचा आपण लाभ घेवून आता पासूनच आपणांस कोणत्या क्षेत्रात जायचे आहे याचे ध्येय निश्चित करुनच भविष्याची तयारी करावी, असेही श्री. मिनियार यावेळी म्हणाले.
            स्पर्धा परिक्षेचे संचालक श्री. सूर्यतळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपणांस कोणत्या क्षेत्रात जायचे आहे याची आताच निवड करुन करिअरची निवड करणे आवश्यक आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या लोकराज्यमासिकात सर्वंकष माहितीचा समावेश असतो. आणि सदर माहिती ही स्पर्धा परिक्षेच्या दृष्टिकोनातू खुप महत्वाची असते. आणि ही माहिती शासन लोकराज्यच्या माध्यमातून कमी खर्चात आपणांस उपलब्ध करुन देते. याकरीता प्रत्येकांन लोकराज्यमासिकाचा वाचन करावे.
            प्राचार्य प्रा. डॉ. बी.डी. वाघमारे यावेळी म्हणाले की, आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्याशिवाय पर्याय उपलब्ध राहिलेला नाही. कारण तुमचे स्वत:चे भविष्य घडविणे हे तुमच्याच हातात. आता वेळ तुमच्या हातात असून आतापासूनच आपले भविष्याकडे वाटचाल करत आपले आणि आपल्या महाविद्यालयाचे नांव उज्जवल करा.
            जिल्हा माहिती अधिकारी श्री. अरुण सुर्यवंशी यांनी प्रास्ताविकात प्रारंभी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यपध्दती विषयी माहिती दिली. तसेच 'लोकराज्य' या महाराष्ट्र शासनाच्या मुखपत्रास सुमारे 70 वर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. सन 1947 पासूनचे लोकराज्यचे अंक ऑनलाईन उपलब्ध आहेत. या मासिकाच्या दरमहा सुमारे  पाच लाख प्रती छापल्या जातात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारे अशा प्रकारचे हे राज्यातीलच नव्हे तर देशातील  एकमेव शासकीय मासिक असल्याचे सांगून या मासिकात ग्रामपंचायत ते मंत्रालय येथील कारभाराची माहिती प्रतिबिंबीत करणारी सदरे, शासनाने घेतलेले निर्णय, राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, शासन निर्णय, मंत्रीमंडळ निर्णय इत्यादी अधिकृत माहिती प्रसिध्द करण्यात येते. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या मासिकाचे वाचक वाढविण्याच्या उद्देशाने या वर्षी 'लोकराज्य वाचक अभियान' संपूर्ण राज्यात राबविण्यात येतअसून, या अभियानानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ही श्री. सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.
            यावेळी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत उभारण्यात आलेल्या लोकराज्य स्टॉलला मान्यवरांनी भेट दिली.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. महाजन यांनी केले तर यांनी श्री. लांडगे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्त्र कर्मचारी  यांची उपस्थिती होती.
            सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी वरिष्ठ लिपिक आशा बंडगर, लिपिक-नि-टंकलेखक अनिल चव्हाण, कैलास लांडगे, अशोक बोर्डे आणि श्री. सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment