Followers

Wednesday 12 September 2018

जाऊ येथील निवासी शासकीय शाळेतील लोकराज्य मेळाव्यास विद्यार्थीनींचा उत्सर्फुत प्रतिसाद


                                                




लातूर,दि.12:- जिल्हयातील जाऊ ता. निलंगा येथील अनुसूचित जाती नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विद्यार्थींनी लोकराज्य अंकाचापरिचय माहिती देण्यासाठी लोकराज्य नवीन जुन्या अंकाचे  प्रदर्शन स्टॉल  वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विद्यार्थीनी लोकराज्याच्या अंकाचे कुतुहलाने वाचन करुन उत्सर्फुत प्रतिसाद दिला.
येथील वाचक मेळाव्यात बोलताना जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के म्हणाले की, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य अंकातील माहिती आकडेवारी पूरक आहे. प्रत्येक विद्यार्थीनी   आपल्या शालेय जीवनापासूनच लोकराज्य अंकाचे वाचन केल्यास त्यांना शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती होऊन त्यांचे सामान्यज्ञान ही  वृध्दीगत होईल. लोकराज्य अंकाची वार्षिक वर्गणी फक्त 100 रु. असून किरकोळ अंकाची प्रति अंक 10 रु. किंमत असून हे सर्व अंक वाचनीय  संग्रही ठेवावे, असे आहेत. त्याप्रमाणेच महाराष्ट्र  वार्षिकी महामानव या पुस्तकांची माहिती देऊन  लोकराज्यचे नवीन अंक महाराष्ट्र वार्षिकी महामानव हे पुस्तके शाळेच्या ग्रंथालयांसाठी भेट देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
 पुढील काळात इतर विषयांचे आवांतर वाचन करताना लोकराज्यचे वाचन विद्यार्थीनीनी  करावे, असे आवाहन सोनटक्के यांनी करुन या विद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता  अभियानातील पुरस्कार मिळाल्या बद्दल  शाळा प्रशासन विद्यार्थीनींचे  त्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 शालेय दशेपासूनच विद्यार्थीनीनी आपले ध्येय निश्चित करुन त्याकडे  मार्गक्रम केले पाहिजे लोकराज्य अंकातील माहिती आपलं ध्येय साध्य करण्यासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुखम यांनी व्यक्त केला. या शाळेमार्फत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असतात असे श्री. मुखम यांनी सांगून पुढील काळात ग्रंथालयात लोकराज्यचे अंक ठेवून विद्यार्थीनींचे ज्ञान वृध्दींगत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.
 प्रारंभी श्री. सोनटक्के ,श्री. मुखम यांनी क्रांती ज्योती  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करुन लोकराज्य वाचक मेळाव्याचा शुभारंभ केला. यावेळी शाळेचे शिक्षक बी.जी. चव्हाण यांनी शाळेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची शाळेला प्राप्त पुरस्कारा बाबत केलेल्या नियोजनाची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.
 यावेळी शाळेतील इयत्ता 6 वी ते 10 वी च्या वर्गात प्रथम क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनींचा सत्कार वृक्षरोप भेट देऊन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आला. या मेळाव्यास शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांनींनी शिक्षक वृंदानी सक्रीय सहभाग घेऊन हा मेळावा यशस्वी केला.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती. डी.आर.सावंत  यांनी केले तर आभार सहशिक्षक श्री. सुतार यांनी मानले.

No comments:

Post a Comment