Followers

Sunday 16 September 2018

रेल्वे कोच निर्मिती प्रकल्पाच्या कामास सप्टेंबर 2018 अखेर पासून सुरुवात होणार -पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर



* 1लाख 41 हजार शेतकऱ्यांना  386 कोटींची कर्जमाफी
* प्रधानमंत्री अवास योजना (ग्रामीण ) साठी मोबाईल ॲपवर 30 सप्टेंबर पर्यंत नोंदणी
* जिल्हयाचा सर्वांगीण विकासाला हुतात्म्यांच्या बलिदानाची उर्जा





        लातूर.दि.17:-  रेल्वे कोच निर्मिती  प्रकल्पांमुळे लातूर जिल्हयासह परिसरातील बेरोजगार युवकांना मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध्होवून त्यांच्या हाताला काम मिळणार आहे. या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली असून प्राथमिक स्तरावरील कामांसाठी  400 कोटीची  निविदा प्रसिध्द झाली असून  त्या अनुषंगाने पुढील कामे  प्रत्यक्षात माहे सप्टेंबर 2018  अखेर पासून सुरु होणार आहेत,असे प्रतिपादन कामगार कल्याण,कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 70 वा वर्धापन दिनानिमित्त्हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभाच्या  प्रांगणात पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर ,पोलिस अधिक्षक राजेंद्र माने,जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे,महापौर सुरेश पवार,जिल्हा परिषद उपाध्यक्ष  रामचंद्र तिरुके,अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे अदि सह स्वातंत्र्य सैनिक,जेष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी , अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी, पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
      पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019  अंतर्गत लातूर जिल्हयात जलयुक्त्  शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याने जिल्हा टँकर मुक्त झाला आहे.भूजल विभागामार्फत योजनेच्या  तीन टप्प्यात  121 गावांमध्ये 477 रिचार्ज शॉफ्टची कामे पूर्ण झाली असून  जिल्हयाच्या भूजल पातळीत  वाढ झालेली आहे. लातूर जिल्हा कायमस्वरुपी  दुष्काळमुक्त्करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन निलंगेकर यांनी केले.
         तसेच छत्रपती  शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत ऑगस्ट 2018  पर्यंत लातूर जिल्हयातील 1 लाख 41 हजार शेतकऱ्यांना सुमारे 386 कोटीची कर्जमाफी देण्यात आली आहे. तर माहे ऑक्टोंबर  ते डिसेंबर 2016 या कालावधीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 200 रूपये अनुदान देणे बाबतच्या योजनेत  जिल्हयातील सुमारे  56 हजार  पात्र शेतकऱ्यांना  18 कोटीचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. याप्रकारे आर्थिक विवंचनेत असलेल्या जिल्हातील शेतकऱ्यांना शासनामार्फत मोठा दिलासा मिळाला आहे,असे निलंगेकर यांनी म्हटले.
  विदर्भ मराठवाडा विकास प्रकल्प या योजनेअंतर्गत लातूर जिल्हयातील लातूर,औसा,अहमदपूर,रेणापूर चाकूर या पाच तालुक्यातील 349 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत पशुपालकांना अदयावत प्रशिक्षण देण्यात येते.या पशुपालकाकडील दुध हे केंद्र शासनाच्या मदर डेअरी मार्फत गोळा करण्यात येते. 3 हजार 16 दुध उत्पादकांसाठी मदर डेअरीचे 60 दुध संकलन केंद्र कार्यरत असून यामुळे या भागातील पशुपालकांना दुध उत्पादनातून आर्थिक स्वावलंबन प्राप्त होत आहे, अशी माहिती निलंगेकर यांनी दिली.  
       त्याप्रमाणेच  जिल्हयात सन 2016-17 ते सन 2018-19 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 6 हजार,रमाई आवास योजना 13 हजार 385, शबरी आवास योजना 130 असे सुमारे 19 हजार 500 घरकुलांना मंजुरी देऊन प्रत्येक घरकुलांसाठी संबंधीत लाभार्थ्यांना दीड लाखाचे अनुदान उपलब्ध्करुन देण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण ) मध्ये ज्या लोकांची नावे नाहीत परंतु ते बेघर असल्याचे ग्रामसभेने शिफारस केली असल्यास त्या लोकांनी मोबाईल ॲपवर 30 सप्टेंबर 2018 पर्यंत माहिती भरुन नोंदणी करण्याचे आवाहन निलंगेकर यांनी या प्रसंगी केले. 
       भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद,काश्मीर जुनागढ  संस्थानांतील जनता गुलामीतच होती. मराठवाडा निजामाच्या बंधनांतून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले यात लातूर जिल्हयाचे योगदान ही महत्वाचे असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले.
      मराठवाडा मुक्ती संग्राम सतत 13 महिने सुरु होता या लढयात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. निजाम शरण येण्यास तयार नव्हता त्यावेळी भारत सरकारने  पोलीस ॲक्शन सुरु केली. शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या जुलूमी राजवटीतून मुक्त्झाला. लढयामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर मराठवाडयाची लातूर जिल्हयासह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरु असल्याचे श्री. निलंगेकर यांनी म्हटले.
      लातूर जिल्हा सामाजिक, आर्थिक, औद्योगीक,शैक्षणिक  क्षेत्रात चांगली प्रगती करत असून आजच्या लातूर जिल्हयाच्या सर्वांगीण  विकासाला मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर हुतात्म्यांच्या  बलिदानाची ऊर्जा लाभली आहे,असे श्री.निलंगेकर यांनी सांगून या लढयात आपले जीवन समर्पीत करणाऱ्या  थोर हुतात्म्यांना अभिवादन केले.
   प्रारंभी पोलिस पथकाकडून हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभ येथे हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री निलंगेकर इतर मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर पोलिस शस्त्र दलाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना शस्त्र सलामी दिली.
     त्यानंतर पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री. निलंगेकर यांनी या समारंभास   उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ नागरिक, लोकप्रिनिधी यांची भेट घेऊन मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या समारंभाचे सूत्रसंचालन संवादतज्ञ उध्दव फड यांनी केले.

No comments:

Post a Comment