Followers

Tuesday 11 September 2018

उज्वला गॅस योजनेत लातूरला उज्जवल यश



 ग्रामीण भागातील महिला आणि स्वयंपाकासाठी लागणारे इंधन म्हणून लाकूड-फाटा जमा करण्यात त्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ जात होता. तसेच पावसाळ्याच्या दिवसात भिजलेल्या सरपणामुळे चुलीवर स्वयंपाक बनवत असतांना धुरामुळे डोळे, फुफ्पुस, श्वसनाचे विकार या समस्याबरोबरच बऱ्याचदा सरपण जमा करत असताना विंचू , सर्पदंश अशा मोठ्या जिवघेण्या आपत्तीत महिलांना प्राणही गमवावा लागत होता. या सर्वापासून मुक्ती मिळण्यासाठी सप्टेंबर 2016 मध्ये पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उज्वल गॅस योजनेचा शुभारंभ झाला. गरीब, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील अनुसूचित जाती  व जमाती मधील सामान्य कुटुंबातील महिलांना गॅस घेण्याची क्षमता नव्हती, पण या उज्वला गॅस योजनेमुळे आम्हाला स्वंयपाक करताना धुराच्या त्रासाने फुफ्पुस, श्वसन व डोळ्याचे आजारापासून मुक्ती मिळाली,अशी प्रतिक्रिया सोजराबाई शिंदे रा. शिवपूर ता. शिरुर अनंतपाळ तसेच उर्मिला राजेंद्र कोरे रा. थेरगाव ता. शिरुर अनंतपाळ या ग्रामीण भागातील महिलांनी व्यक्त केल्या .

 लातूर जिल्हा पुरवठा विभागाने मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. या योजनेचे 88 हजार 933 लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात आजपर्यंतचे उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. या योजनेअतंर्गत गरीब कुटुंबातील महिलेच्या नावाने गॅसजोडणी (कनेक्शन) अगदी 100 रुपयात दिले जाते. लातूर जिल्हयाचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखली जिल्हा प्रशासनाने डिसेंबर, 2018 अखेर संपूर्ण जिल्हा धूरमुक्त करण्याचा निश्चय केला आहे .

उज्वला गॅस जोडणीअंतर्गत सध्या चाकूर तालुक्यातील अलगरवाडी, लातूर तालुक्यामधील ताडकी, खाडगाव, सारसा, अहमदपूर मधील वैरागड, कोळवाडी, गिलेवाडी, नांदूरा बुजूर्ग, उदगीर केरोसीनची मागणी होत नाही. सध्या जवळपास 75 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. गॅस जोडणीदारास गॅस वापर करण्यासाठी देखील प्रवृत्त केले जात आहे, असे पुरवठा अधिकारी शोभा जाधव यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितले.  

                                                     -- मीरा ढास
                                                        सहायक संचालक (माहिती)
                                                        विभागीय माहिती कार्यालय, लातूर

No comments:

Post a Comment