Followers

Wednesday, 4 September 2024

आठ भाग्यवान लाडक्या बहिणींच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण

 




उदगीर,:- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित महिला सशक्तीकरण अभियानात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आठ लाभार्थ्यांचा साडी, गुलाबपुष्प आणि प्रतिकात्मक धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आपला सन्मान होत आहे, हे अविश्वसनीय आहे, अशा भावना लाभार्थींनी व्यक्त केल्या.                     

या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील श्रीमती शिल्पा संतोष राठोड, श्रीमती स्वाती कासले, श्रीमती कल्पना सोनकांबळे, श्रीमती प्रियंका भोसले, श्रीमती प्रियंका जगताप या पाच लाभार्थींना गुलाबपुष्प, साडी आणि प्रतिकात्मक धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.  

तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत श्रीमती नागमणी शिवाजी मलकापूरे यांना दोन मजली घराची प्रतीकात्मक चावी, साडी, गुलाब पुष्प व सुरेखा सुतार यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाअंतर्गत साडे चार लाखांचा प्रतिकात्मक धनादेश, साडी व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी श्रीमती गजराबाई अंधारे यांनाही  यावेळी सन्मानित करण्यात आले.

 आपण स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की, राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात येईल. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, आमचा राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते साडी धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. हे आमच्यासाठी अविश्वसनीय आहे. हे सर्व आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झाले आहे. आमच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण आहे. त्यामुळे आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार.   

संवाद व संबोधन कार्यक्रम आनंद सोहळा होतो तेंव्हा ... उखाणे स्पर्धा, पैठणी वाटप, रांगोळी आणि नवी उमेद






            उदगीर, (लातूर):  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संबोधनात काय ऐकायला मिळणार मुख्यमंत्री अर्थात लाडक्या बहिणींचा भाऊ नवीन काय संदेश देणार... तर देवेंद्र फडणवीस नवीन काय बोलणार अशा सर्व उत्सुकतांना घेऊन जिल्हाभरातील महिलांच्या उदगीर येथील हजारोंचा समुदाय आज सेलीब्रेशन मूडमध्ये होता. त्यामुळे पोस्टर, बॅनर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशी हस्तांदोलन तर कुठे रक्षा बंधन असा एकूणच आनंददायी माहौल उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर होता. त्यामुळे संवाद संबोधनाचा कार्यक्रम आनंद सोहळा झाला होता. 

            या आजच्या कार्यक्रमात महिलांच्या मनोरंजनासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उखाणे स्पर्धा, पैठणी वाटप, विविधांगी घोषवाक्य प्रत्येकाचा वेगळा ड्रेसकोड आणि महाराष्ट्राच्या वैभवाची सुरेल संगीत मैफील यामुळे आनंद मेळावा आणखी मजेदार झाला.   

या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महिला सरपंच पिवळ्या रंगाचे फेटे परिधान करून आल्या होत्या. त्यांच्या हाती राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री महोदयांचे छायाचित्र असलेले फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. या फलकांवर विशेषत्वाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांच्या फलकांचा समावेश होता.

आकर्षक व्यासपीठ

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह मान्यवरांच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख मार्गावर आकर्षक कमानी उभारण्यात आल्या होत्या. सोबतच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमासाठी मुख्य व्यासपीठ विविध रंगीबेरंगी पुष्पगुच्छांनी सजविण्यात आले होते. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आणि विशेषत्वाने देशाला महाराष्ट्राची महिला सशक्तीकरणाच्या योगदानातून नवी ओळख देणाऱ्या रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. तसेच व्यासपीठासमोरील जागेत कृषि विभागाच्यावतीने काढण्यात आलेली बाजरा, भगर आदी विविध धान्यापासून रांगोळी काढून मिलेट वर्ष साजरे करताना नागरिकांनी आपल्या आहारात कडधान्याचा वापर करण्याचा 'मिलेट हट'च्या माध्यमातून संदेश देण्यात आला होता.

आशयपूर्ण रांगोळ्या

साधारणत: रांगोळी हा कलात्मक प्रकार त्यातील रंग छटा आणि रेखाचित्रांवर असते. मात्र, आज आनंद मेळाव्यात काढण्यात आलेली रांगोळी आशयघन होती. रांगोळीला काही बोलायचे होते, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व तृणधान्यांचा वापर याचा संदेश या रांगोळीतून दिला जात होता.   

शहरात मान्यवरांचे आकर्षक कटआऊट्स

आजच्या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक नगरी उदगीर शहरात येणाऱ्या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचे लक्षवेधक कटआऊट्स शहरात तसेच कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते.

मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. संदीपान जगदाळे व सहकारी लातूर, जल्लोष ग्रूप नागपूर आणि येडवे व बिदरकर गुरुजी, सोलापूर यांच्या चमूने उपस्थितांसमोर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

लातूरच्या आगळ्यावेगळ्या येळवसचे आकर्षक दालन

लातूर-धाराशिव जिल्ह्यात आगळ्यावेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘येळवसअर्थात वेळ अमावस्याचे स्वतंत्र दालन स्टेजसमोर  तयार करण्यात आले होते. या दालनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमाच्या स्थळी राज्य शासनाच्या कृषी विभाग, रोजगार उद्योजकता व कौशल्य विकास विभाग, समाज कल्याण, सामाजिक न्याय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, जिल्हा आरोग्य विभाग यासह विविध विभागाच्या स्टॉल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली होती.  

**** 

आर्थिक पाठबळाने आत्मनिर्भरता आल्याचा महिला लाभार्थ्यांचा सूर

उदगीर(लातूर) , दि. 4 (जिमाका) :- राज्य शासन महिला सक्षमीकरणासाठी विविध उपयुक्त योजना राबवीत आहे. यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणारी लखपती दिदी योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, लेक लाडकी योजना यासारख्या योजनांद्वारे महिला सक्षमीकरण करण्याला चालना देण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीने लाडक्या बहिणींमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक भगिनींनी या योजनेमुळे आर्थिक निर्भरता आल्याचा सूर व्यक्त केला . 

या योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांमध्ये एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच इतर महिलाही त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती घेत स्वतः सक्षम होण्यासाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. स्वत:च्या खात्यामध्ये आलेले पैसे आणि त्याचे स्वामित्व स्वत:कडे असणे याबद्दलचा आनंद महिलांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त होत होता.  

आज उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व अन्य लाभांच्या योजनांच्या लाभार्थी महिला आनंद मेळाव्यात भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. शासनाच्या योजनेतून लाभ मिळाल्याने आत्मविश्वास निर्माण झाला आहेच, पण त्याचबरोबर आनंद सोहळ्यास स्वतः राष्ट्रपतींनी महिलांना प्रोत्साहित केल्याच्या भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या.

त्यातील काही निवडक बोलक्या प्रतिक्रिया

घरातल्या अर्थकारणाला कलाटणी....

श्रीमती रेश्मा युनुस अतार  (रा. कुमटा खु. ता. उदगीर) सध्या बन शेळकी रोड उदगीर येथे तीन मुले व पतीसह किरायाने राहते. रेशमाचे पती रंगकाम करतात. कधी काम मिळते तर कधी नाही. त्यामुळे घर भाडे मुलांच्या शाळेची फी आणि घर खर्च भागवणे अवघड होत होते. शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मी ऑनलाईन फॉर्म भरला आणि 15 ऑगस्ट रोजी माझ्या खात्यात तीन हजार रुपये आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आल्याने या पैशाने प्रथम मुलांची थकलेली शाळेची फी भरली. आता दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे. ही रक्कम माझ्या सारख्या गरिबांसाठी मोठी नसली तरी कमीही नाही. या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून माझ्या घरखर्चाला खूप मोठा आधार मिळाला आहे. माझ्यासारख्या इतर महिलांनाही या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी योजना कायम सुरू राहिली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याबाबत शासनाचे आभार.

कुटूंबांला आर्थिक हातभार

उदगीर तालुक्यातील वायगाव येथील मनीषा वाघमारे या ३५ वर्षीय अविवाहित असून त्या आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. परंतु आर्थिक अडचण ही कायमचीच. त्या म्हणतात की, ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यावर आले आणि मला खूप आनंद झाला. या योजनेतील आर्थिक सहाय्यामुळे माझ्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक हातभार लागला आहे. या रकमेतून आई-वडिलांच्या औषधोपचाराचा खर्च करणे सहाय्यक ठरणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून धन्यवाद.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मिळालेल्या रकमेतून मुलाची मागील दोन महिन्यांची फी भरली. त्यामुळे मुलगा रोज मोकळ्या मनाने शाळेत जाऊ लागला. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या योजनेसोबतच राज्य शासनाने मुलांसाठी अधिकच्या शाळा सुरू करण्याची भावना श्रीमती नीता बालाजी डाके, धामणगाव (ता. शिरूर अनंतपाळ) यांनी व्यक्त केली. 

बचत गटाला बळकटी

जळकोट तालुक्यातील सुल्लाळी गावच्या आम्रपाली सोनकांबळे या समता ग्रामसंघ बचत गटात काम करतात. या कामी त्यांना बचत गटाच्या माध्यमातून म्हैस व इतर जोडधंद्यांसाठी तीन लाख रुपये तसेच वंचित घटक निधी प्राप्त झाला आहे. त्याचा आरोग्य आणि स्वच्छतेसाठी उपयोग होतो. त्यातच लाडकी बहीण योजनेचा मला लाभ मिळाला आहे. या आर्थिक सहायतेमुळे मी आत्मनिर्भर झाले आहे. याचे श्रेय शासनास असून शासनाचे मनःपूर्वक आभार.  

आत्मनिर्भरतेत आनंद 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 15 ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये खात्यात आले. त्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. या रकमेचा उपयोग आम्ही मुलांचे शिक्षण, घर खर्चासाठी करणार आहोत. आता पैशांसाठी नवऱ्यापुढे हात पसरावे लागत नाहीत. त्यामुळे आम्ही स्वावलंबी झालो असून  आम्ही सर्व सहाजणी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानण्यासाठी या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलो असल्याचे उदगीर येथील लोणी एमआयडीसीतील श्रीमती शेख मौलन काझी, श्रीमती सोफिया बी मगदूम शेख, श्रीमती शबाना शेख मुस्तफा, श्रीमती इरफानाबी शेख, श्रीमती रबाना शेख हिदायत व श्रीमती संगीता बारसोळे यांनी सांगितले. तसेच ही योजना अशीच पुढे चालू ठेवण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन


 






नांदेड : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले.

 

यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा पारंपारिक पद्धतीने शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती महोदयांच्या कन्या इतीश्री याही उपस्थित होत्या. त्यांचाही यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सचखंड गुरुद्वाराचे प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंगजी, सल्लागार जसवंतसिंग बॉबी, अधिक्षक राज देविंदरसिंगजी, पुजारी बाबा ज्योतिदरसिंगजी जत्थेदार, संत बाबा बलविंदरसिंगजी आदींची उपस्थिती होती.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची लंगरला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुद्वारा येथील दर्शनानंतर तेथे असलेल्या लंगरला भेट देवून पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

 

पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लाभार्थी कटलरी व किचन्स, खेळणी व्यवसायिक केतन लक्ष्मण कळसकर व फळे आणि ज्यूस व्यवसायिक समशेरसिंग लालसिंग राठोड यांच्या स्टॉलला भेट देवून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर

 




राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; सर्व निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची ग्वाही

लातूर : जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पिक नुकसानीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. 

शेतकऱ्यांना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात नुसकान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. हा समारंभ झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोघेही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. २ सप्टेंबर रोजी उदगीर, जळकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना तातडीने नुकसान भरपाईबाबत आश्वस्त केले.

मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लातूर जिल्ह्यातही अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आज प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले. सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल. संकट काळात सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. यावेळीही शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभे राहील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला.

अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल. पंचनाम्याचे अहवाल येताच नुकसानभरपाईबाबत पुढील कार्यवाही तातडीने  केली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 







 सक्षमीकरण योजनांमुळे महिलांच्या स्वावलंबन व निर्णयशक्तीत वाढ

 राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप* 


 उदगीर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत सक्षमीकरण आनंद मेळावा संपन्न 

 उदगीर, (लातूर) : राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. त्याच राज्यात शासनाने आता महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावले उचलून त्यांच्या स्वावलंबन,  निर्णय शक्तीत वाढ केली आहे. महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, अशा शब्दांमध्ये देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सुरु असलेल्या आर्थिक विकासाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. 

उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे कौतुक करत महिला सक्षमीकरणाला राज्य शासन चालना देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. तर विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास आणि पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी त्यांनी उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित महिलांशी संवाद साधायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, मी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांसह महिलांच्या अन्य योजनांची माहिती घेतली. याशिवाय राज्यात लखपती दिदी योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादाचाही आढावा घेतला. या योजनांचे दृष्य परिणाम दिसत असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी ते सिंधुताई सपकाळांपर्यंत अनेक आदर्श महिलांपुढे आहेत. महिलांची लोकसंख्या देशाच्या अर्ध्या लोकसंख्येइतकी आहे. प्रत्येक कुटुंबात उदरनिर्वाह चालविण्यासाठी महिलांची मुख्य भूमिका असते. त्यामुळे महिलांनी आता राजकीय क्षेत्रातही पुढे येत देशाचे नेतृत्व करावे, असे आवाहनही त्यांनी याठिकाणी जमलेल्या महिला व युवतींना केले. 

  पुरुषांची उपस्थिती लक्षात घेऊन त्या म्हणाल्या, पुरुषांनी आता महिलांच्या क्षमतेला ओळखून त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी पाठबळ द्यावे. तसेच आमच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान करणे पुरुषार्थ मानला जातो. प्रत्येक कुटुंबामध्ये हा सन्मान दिसून आला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिलांनी सर्व आघाड्यांवर अग्रेसर राहताना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी वडीलकीच्या भूमिकेतून केली. 

 लाडकी बहीण योजना सुरुच राहील – मुख्यमंत्री

राष्ट्रपती महोदयांचे प्राचीन आणि ऐतिहासिक शहर असलेल्या उदगीर शहरात आल्याबद्दल स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनामार्फत सुरु असलेल्या महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच राष्ट्रपतींच्या जीवनातील संघर्ष हा सर्वसामान्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच आज त्या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्या आहेत. या ठिकाणी उपस्थित महिलांना राष्ट्रपती महोदयांच्या यशाचे कौतुक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 

  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत राज्य शासनाने केंद्र शासनाच्या लखपती दिदी योजनेसह मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना, अन्नपुर्णा योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांमुळे शासन सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती पुढेही चालूच राहणार आहे. माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि माता भगिनींचा आशीर्वाद कायम राहिल्यास दीड हजाराची रक्क्म वाढविली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आर्थिक महासत्ता बनण्याकडे अग्रेसर असून, अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आम्ही झेप घेतली आहे. महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत कायम आघाडीचे राज्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. संविधान बदलाच्या अफवेला त्यांनी फेटाळून लावले.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सामान्य कुटुंबातील एक संघर्षशील महिला आपल्यापुढे राष्ट्रपती म्हणून विराजमान आहेत. तर मागास वर्गीयाचे प्रतिनिधीत्व नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.  

स्थानिक आमदार व मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर जिल्हा करण्याची तसेच उदगीर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची मागणी आपल्या प्रास्ताविकात केली होती. त्याचा उल्लेख करताना त्यांनी सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे सांगितले.  

 संविधान बदलू शकणार नाही – रामदास आठवले

राज्य, देशाच्या विकासासाठी आणि संविधान मजबूत करण्यासाठी सर्वजण प्रयत्नरत असून, देशाचे कोणीही संविधान बदलू शकत नसल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच राज्याची विकासाची गाडी पुढे नेताना महिलांना आर्थिक ताकद देत त्यांनाही विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

 घटनारक्षण प्रथम कर्तव्य – देवेंद्र फडणवीस

उदगीर येथील विश्व शांती बौद्ध विहार निर्मिती व आज महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन केले. 

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारावर चालणारा जपानसह आशियातील अनेक देश विकसित झाले आहेत. जगातील सर्वात उत्तम संविधान हे भारताचे असून, ते कोणीही बदलू शकणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र व राज्य शासन संविधानानुसारच काम करत आहे. केंद्र शासनाच्या नेतृत्वात राज्य शासनाने केंद्र शासनाकडून चैत्यभूमीची जागा परत घेतली आहे. तसेच लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर लिलावात विकत घेतले आहे. शिवाय जपानमधील कोयासन विद्यापिठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला असल्याचे त्यांनी सांगितले.

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. या विकास प्रक्रियेत महिलांचाही तेवढाच महत्त्वपूर्ण सहभाग राहणार असल्यामुळे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला. त्यामध्ये मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांसह लखपती दिदींचा आवर्जून उल्लेख केला. या योजना बंद पडणार नाहीत, याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. 


 सक्षमीकरणात महाराष्ट्र प्रथम – श्रीमती तटकरे

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात 1 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिल्याचे सांगत लवकरच अडीच कोटीवर महिलांना लाभ मिळेल, असे महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांनी सांगितले.

अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेतून राज्यातील महिलांच्या विकासात मोठा बदल घडून येणार असून, महिलांच्या विकासात कोणतीही कसर राहणार नाही. महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. राज्यात बालकांच्या नावापुढे आईचे नाव लावणारे हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्याच्या सक्षम नेतृत्वात महिला व बालविकास विभागांतर्गंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


 जिल्हा व मेडिकल द्या - संजय बनसोडे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर येथील विश्वशांती बुद्धविहाराचे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले असून, बुद्धाच्या शांततेच्या विचार मार्गावरूनच जगाला पुढे जावे लागणार आहे. उदगीरातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जातो, असे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पुरोगामी महाराष्ट्रात नवा प्रकाशमार्ग निर्माण केला आहे. यावेळी त्यांनी उदगीर शहराच्या विकासकामांची उपस्थितांना माहिती देत त्यांच्या नेतृत्वात राज्य, जिल्ह्याचा विकास होतो आहे. त्यामुळे उदगीरमध्ये जिल्ह्याची क्षमता असून, उदगीरची जिल्हा निर्मिती करावी  तसेच येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्याची मागणी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी मागणी केली.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज उदगीर येथे ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाचे विमोचन झाले आणि त्याची पहिली प्रत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना भेट देण्यात आली. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू आणि राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज महिलांना लाभवाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला वेगवेगळ्या पेहरावात जिल्ह्यातील महिला आल्या होत्या. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि डोळे दीपवणाऱ्या आयोजनामुळे हा कार्यक्रम स्मरणीय ठरला. जिल्हा प्रशासन गेले अनेक दिवस या कार्यक्रमासाठी मंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या नेतृत्वात  झटत होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती अंबेकर यांनी केले. 

Sunday, 18 August 2024

प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून १०० वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहोचल्याचा आनंद-मुख्यमंत्री

 





प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून १०० वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहोचल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांनी केले. वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित प्रो गोविंदा लीगच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, आमदार प्रताप सरनाईक, मोहम्मद दुराणी, पूर्वेश सरनाईक आदींसह स्पर्धांचे आयोजक, संघ मालक, गोविंदा पथक उपस्थित होते.
खेळामध्ये स्पर्धा असली पाहिजे, पण ती जीवघेणी नसावी. त्यामुळे यंदा आपण सर्वांनी अपघातमुक्त गोविंदा उत्सव साजरा करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ सुरू आहे. या खेळाचा समावेश साहसी क्रीडा प्रकारामध्ये करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक गोविंदा उपस्थित आहेत. या गोविंदांच्या विमा संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. यंदाच्या वर्षी ७५ हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. भविष्यात हा खेळ ऑलिंपिकमध्ये सहभागी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा आपण ६० गोविंदांना स्पेनला पाठवतो आहोत असेही ते म्हणाले.
शासन युवक आणि युवतींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता लाडकी बहीण प्रमाणेच लाडका भाऊ योजना आणली आहे. कौशल्य विकासच्या माध्यमातून युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थींना मानधन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील पहिले सौरग्राम मान्याचीवाडीतील सौर ऊर्जीकरणाचे लोकार्पण

 


            सातारा: राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्यांना सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीजग्राहकांचे वीजबिल देखील शून्यवत होत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिली.


            पाटण तालुक्यातील (जि. सातारा) मान्याचीवाडी गावामध्ये महावितरणच्या वतीने 100 टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे. राज्यातील पहिले सौरग्राम’ झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. वीजक्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच पहिल्या सौरग्रामचे सरपंच  रवींद्र माने यांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसपालकमंत्री शंभूराज देसाईमहिला व बालविकास मंत्री  आदिती तटकरेमहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रमान्याचीवाडीचे सरपंच  रवींद्र माने आणि महावितरणचे संचालक (प्रकल्प)  प्रसाद रेशमे प्रमुख उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री  श्री. शिंदे म्हणाले कीसातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाने राज्यात पहिले सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाचे मी अभिनंदन करतो. सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य होत आहे. तसेच राज्य शासनाने मागेल त्यांना सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10 टक्के रक्कम तर अनुसूचित जातीजमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषिपंप व सौर पॅनेल्स मिळणार आहे. उर्वरित रक्कम राज्य शासन अनुदानातून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री.  शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणालेप्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध होत आहे. तर येत्या दीड वर्षांमध्ये राज्यात सौर ऊर्जेद्वारे 12 हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्री शेतात जाण्याची गरज राहणार नाही. राज्याने सौर ऊर्जेमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात पहिले सौर ग्राम म्हणून मान्याचीवाडीचे आज लोकार्पण झाले याचा आनंद आहे. या गावात पूर्वी 5 लाख 25 हजार रुपयांचे वीजबिल येत होते. ते सौर ग्राममुळे शून्य झाले आहे. आता राज्यातील 100 गावे 100 टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून त्यासाठी गावांची निवड झाल्याचे  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेआमदार महेश शिंदेआमदार जयकुमार गोरे महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकरपुणे प्रादेशिक संचालक  भुजंग खंदारेमुख्य अभियंता  अंकुश नाळे यांची उपस्थिती होती.