लातूर, दिनांक 14 (विमाका)
: शासनाच्या माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाच्या लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा पदभार विभागीय माहिती
कार्यालय, लातूर येथे सुनिल कच्छवे यांनी आज स्वीकारला.
पदभार स्वीकारुन त्यांनी विभागीय माहिती कार्यालय, आणि
लातूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. विभागाच्यावतीने सहायक संचालक (माहिती) डॉ. श्याम टरके यांनी
त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी लातूरचे प्र.जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप,
सहायक अधीक्षक अशोक माळगे, वरिष्ठ लिपिक मनिषा कुरूलकर, कनिष्ठ लिपिक कैलास
लांडगे, शिपाई अशोक बोर्डे, शेख कलीम आदी उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागाने 08 जुलै 2026 रोजी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक (माहिती),
गट अ (वरिष्ठ) पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारशीने
त्यांची सरळसेवेने नियुक्ती केली आहे.
*****

No comments:
Post a Comment