Followers

Tuesday, 9 January 2024

महा मुंबईच्या विकासात खारकोपर ते उरण उपनगरीय रेल्वे सेवा होणार दाखल - डॉ. स्वप्नील नीला

 



दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विशेष मुलाखत

 

             मुंबईदि. 9 : नवी मुंबई परिसरात महामुंबई विकसित होत आहे. या महामुंबईच्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण होणार असून त्यातील खारकोपर ते उरण ही उपनगरीय सेवा येथील नागरिकांना मुंबईशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. महामुंबईच्या विकासात या रेल्वे सेवेचे महत्व अनन्य साधारण असणार आहेअशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील नीला यांनी  दिलखुलासजय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 जानेवारीला मुंबई व नवी मुंबईसह राज्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये रेल्वे प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आलेल्या प्रकल्पांचाही समावेश आहे. महामुंबईच्या विकासाच्या दृष्टीने खारकोपर ते उरण या उपनगरीय रेल्वे मार्गाचे त्याचबरोबर बेलापूर उरण प्रकल्प मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचेही लोकार्पण यावेळी होणार आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव या सहाव्या मार्गिकेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. याचबरोबर वर्धायवतमाळनांदेड या प्रकल्पांतर्गत असलेला वर्धा-कळंब नवीन ब्रॉडगेज प्रकल्पअहमदनगर-बीड-परळी या नव्या मार्गावरील न्यू आष्टी ते अमळनेर प्रकल्पांमुळे राज्यातील नागरिकांना होणारा लाभ, दळण-वळणाची सुविधा कशाप्रकारे विस्तारीत होणार याबाबतची माहिती डॉ. नीला यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

            डॉ. नीला यांची मुलाखत दिलखुलास कार्यक्रमात शनिवार दि. 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवारदि. 11 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://x.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महिला सशक्तीकरण अभियानातून 38 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 




 गडचिरोली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ

 149 कोटी 75 लाख रुपयांच्या 30 कामांचे ऑनलाईन भूमीपूजन

            गडचिरोली, दि. 9 : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे. महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे. या अभियानातून शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील 38 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. यापुढील काळात देखील महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            गडचिरोली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्रामखासदार अशोक नेतेआमदार डॉ. देवराव होळीकृष्णा गजबेपोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटीलजिल्हाधिकारी संजय मीनामुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंहजिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  राज्य शासनाने लेक लाडकी’ योजना सुरू केली असून बचतगटाच्या अर्थसहाय्यात दुप्पट वाढ केली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर प्रथमच गडचिरोलीमध्ये ऐवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. राज्याला कर्तृत्ववान महिलांचा वारसा आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या एक पाऊल पुढे आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

            गडचिरोली जिल्ह्यासाठी आतापर्यंत वापरण्यात येणारा मागास हा शब्द पुसून टाकला असून मुख्य प्रवाहाकडे गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. सुरजागडच्या माध्यमातून 10 हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या उद्योगाचे विस्तारीकरण लवकरच होणार असून आणखी 10 ते 15 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना ट्रॅक्टरटिलरड्रोजरहार्वेस्टर, तर शालेय मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. भविष्यात गडचिरोलीतील 10 हजार शालेय मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येईल.

            शासन आपल्या दारी’ योजनेतून राज्यातील जवळपास 2 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त जणांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच येथे उभारण्यात आलेल्या स्कील सेंटरमधून दरवर्षी 5 हजार तरुण- तरुणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल. राज्यातील 1 कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न असून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावीतसेच ब्रँडिंगमार्केटिंग आदी बाबींकरीता जिल्हा प्रशासनाला सूचना करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महिला बचत गटांना 7 हजार कोटींचे कर्ज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            एकूण लोकसंख्येमध्ये 50 टक्के वाटा असलेल्या महिलांचे जोपर्यंत सशक्तीकरण होत नाहीतोपर्यंत भारत विकसीत होऊ शकत नाहीही संकल्पना घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांचे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्य शासनही महिलांच्या विकासासाठी कटिबध्द असून प्रत्येक बचतगट सक्षम होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. महिलांना कर्ज दिले, तर त्याची परतफेड करण्याचे प्रमाण 100 टक्के आहे. गतवर्षी म्हणजे सन 2023 मध्ये राज्य शासनाने 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटाला उपलब्ध करून दिलेअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी उज्ज्वला गॅस जोडणीहर घर जलहर घर बिजली आदी योजना सुरू केल्या. तसेच स्टार्ट अप योजनेतून नव उद्योजकांना 25 कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले असून यापैकी महिलांना 13 कोटी रुपये कर्ज देऊन स्वत:च्या पायावर उभे केले आहे. लेक लाडकी’ योजनेतून मुलीच्या जन्माचे स्वागत तसेच 18 वर्षापर्यंत राज्य शासन 1 लाख रुपये देणार आहे. तसेच मुलींचे मोफत शिक्षण राज्य सरकार करीत असून एस.टी.च्या तिकीट दरामध्ये महिलांना 50 टक्के सवलत आहे.

            मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून गडचिरोलीतील महिलांना मदत मिळत आहे. हे अभियान 365 दिवस सुरू राहणार आहे. भविष्यात गडचिराली ही देशाची स्टील सीटी होऊ शकते. येथे येणा-या कोणत्याही प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याची राज्य शासनाने अट ठेवली आहे. जलजमीनजंगल हा आदिवासींचा अधिकार असून पर्यावरणाचे रक्षण करूनच गडचिरोलीचा विकास केला जाईल. राज्यातील पुढारलेल्या जिल्ह्यात गडचिरोलीचे नाव होईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

            मंत्री श्री. आत्राम म्हणाले कीखनिकर्म उद्योगातून जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच विकास कामांमधून जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी शासन कटिबध्द आहे, यावेळी खासदार श्री. नेते यांनी मनोगत व्यक्त केले.

            जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी प्रास्ताविक केले.

            विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या नवरत्न महिलांचा सत्कार : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नवरत्न महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात सुलोचना मडावी (पेसा अंतर्गत ग्रामसभेसाठी विशेष पुढाकार)मनीषा मडावी (फॅशन डिझायनिंग व व्यक्तिमत्व विकास)संगीता युरोजवार (कोरोनामध्ये 100 टक्के लसीकरण)सविता भोयर (रंगभूमीत योगदान)रुपाली मोहुर्ले (दारुबंदीसाठी लढा)किरण कुमावार (शिक्षण क्षेत्र)जमुना देहारी (बचतगटाची चळवळ,) पोलिस उपनिरीक्षक कल्याणी पुट्टेवार (दुर्गम भागात स्वतंत्र पोलिस स्टेशनचा प्रभार) आणि टेबू उसेंडी (शिवणकाम प्रशिक्षक) यांचा समावेश होता. याशिवाय कविता मेहक्षेत्री आणि ज्योती कुंडारकर यांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.   

            149 कोटी 75 लक्ष रुपयांच्या 30 विकासकामांचे भूमिपूजन : यावेळी मान्यवरांच्या हस्ते 100 मोबाईल टॉवरप्राथमिक आरोग्य पथक (ग्यारापत्ती)मानव विकास मिशन अंतर्गत 8 एकल गोडाऊन,  एकल सेंटरआदिवासी विभागाचे शाळा व वसतिगृहतलाव सौदर्यींकरणनगर परिषद व नगर पंचायत प्रशासकीय इमारततालुका क्रीडांगणवघाडा-सायगाव-शिवणी-डोंगरगाव मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (ता. आरमोरी)चोप-तमाशीटोला ते वडसा मोठ्या पुलाचे बांधकाम करणे. (ता. वडसा) सानगडी-गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (ता. धानोरा)सानगडी- गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-ची सुधारणा करणे (ता. कुरखेडा)मौशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे (ता. वडसा),  मोशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता सुधारणा करणे कुरखेडा-वैरागड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (ता. आरमोरी),  मार्कण्डा देवस्थान नुतनीकरणचपराळा देवस्थान अशा एकूण 149 कोटी 75 लक्ष रुपयांच्या 30 कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

            लाभार्थ्यांना धनादेश वाटप : अझिमा अब्दुल अझीझ पंजवानीक्रितिका खोब्रागडेमनीषा भोयररत्नमाला बावणेगीता वाघाडेपल्लवी कोसरेवर्षा चौधरीकिर्ती भुरसेपायल झंझाळमाधुरी देवगीरकरकल्पना म्हशाखेत्रीकनक नैतामसृष्टी खोब्रागडेवैशाली खोब्रागडेजानव्ही मेहेरेरागिणी मेहेरेडॉली महानंदे यांच्यासह बेरोजगार अंध समितीचे संध्या दादगायेशुभांगी गेडामवर्षा दुर्गे व इतर लाभार्थ्यांना विविध योजनांच्या आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

            पारंपरिक पद्धतीने स्वागत : मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पारंपरिक आदिवासी टोप घालून तसेच रेला नृत्याने स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानच्या थीम साँगचे उद्घाटन करण्यात आले. 

००००

Sunday, 31 December 2023

स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



मुंबई, दि. ३१ : प्रदूषण कमी करण्यासाठी  पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार राज पुरोहित, उद्योगपती नादीर गोदरेज, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

महास्वच्छता अभियान राज्यभर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवले. या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे. त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानासाठी एक कार्य प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात यावे.

स्वच्छता अभियान लोकचळवळ झाली

मुंबई शहरात सुरू केलेल्या या अभियानात शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध प्रतिष्ठान सहभागी होत आहेत. यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येत आहे. मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविणार

विकास प्रकल्पामुळे तोडाव्या लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. मुंबईत रिकाम्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत. मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्यासाठी विचार सुरू आहे. ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुख पर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.


स्वच्छता कर्मचारी मुंबईचा खरा हिरो


मुंबई शहरातील स्वच्छता कर्मचारी खरा हिरो आहे. कारण ते सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात. मुंबई स्वच्छ ठेवतात. या कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सफाई कर्मचारी यांना विमा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.


स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवा, लोकप्रतिनिधींना सूचना

मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र नेले जाणार आहे. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध लोकप्रतिनिधींना केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणाली व्दारे आमदार विद्या ठाकूर, आशिष शेलार, यामिनी जाधव, भारती लव्हेकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, कालिदास कोळंबकर यांच्याशी संवाद साधला. 

तत्पूर्वी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मुंबई शहरात राबवल्या जात असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हबाबत माहिती दिली. यावेळी स्वच्छता कर्मचारी संदीप पवार, शीला जाधव, मच्छिंद्र सावंत, स्वप्नील शिरवाळे, अर्चना मोरे यांचा सत्कार करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. स्वच्छता कामात उपयोगी ठरणाऱ्या वाहनांच्या संचलनास हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली.

*****

Friday, 8 December 2023

‘विकसित भारत संकल्प यात्रा’मुळे गावोगावी शासकीय योजनांचा जागर





·        जिल्ह्यात 786 ग्रामपंचायतींमध्ये उपक्रमाचे नियोजन

·        5 डिसेंबरपर्यंत 221 गावांमध्ये पोहचला संकल्प यात्रा रथ

लातूर : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 786 ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जात असून लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 5 डिसेंबरपर्यंत 221 गावांमध्ये ही संकल्प यात्रा पोहचली असून 1 लाख 1 हजार 774 नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.

ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आणि शहरी भागासाठी नगर विकास विभाग ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ समन्वयक म्हणून काम करीत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यात्रेच्या स्वागतासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेचे 15 डिसेंबरपर्यंतचे गावनिहाय नियोजन

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. अहमदपूर तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी शिंदगी बु., दुपारी किणी कदु, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी सावरगांव थोटदुपारी हंगरगा, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी उन्नी जांबदुपारी हाडोळती, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी आनंदवाडी, दुपारी सय्येदपूर खु.,  12 डिसेंबर2023 सकाळी बोडकादुपारी आंबेगाव, 13 डिसेंबर2023 सकाळी कुमठा बु.दुपारी कौडगाव, 14 डिसेंबर2023 सकाळी बाबळदरा, दुपारी शिवणखेड, 15 डिसेंबर2023 सकाळी वायगाव आणि दुपारी गादेवाडी येथे ही यात्रा जाईल.

औसा तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी जयनगर,  दुपारी आपचूंदा, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी किनीथोटदुपारी येळी, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी भंगेवाडीदुपारी सारोळा, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी एरंडी, दुपारी आलमला, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी सततधरवाडीदुपारी उंबडगा बु., 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी उंबडगा खु.दुपारी उटी, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी लखनगाव, दुपारी काळमाथा, 15 डिसेंबर2023 रोजी सकाळी कवठा केज, दुपारी भेटा येथे भारत संकल्प यात्रा जाणार आहे.

चाकूर तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी उजळंब,  दुपारी भाटसांगवी, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी बनसावरगावदुपारी बोळेगाव, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी तिवटघाळदुपारी तीवघाळ,  11 डिसेंबर2023 रोजी सकाळी अजन्सोंडा, दुपारी जानवळ, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी रायवाडीदुपारी रामवाडी, 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी केंद्रेवाडी खु.दुपारी महाळंगी, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी झरी, दुपारी दापक्याळ, 15 डिसेंबर2023 रोजी सकाळी शिवणी म. केज आणि दुपारी हाडोळी येथे यात्रा जाणार आहे.

देवणी तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी गुरनाळ,  दुपारी गौडगाव, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी बटनपूरदुपारी लासोना, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी बोरोळदुपारी सिंध्दीकामठ, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी हंचनाळ, दुपारी वागदरी, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी अजनीदुपारी संगम, 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी सावरगावदुपारी होनाळी, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी भोपनी, दुपारी मानकी, 15 डिसेंबर2023 रोजी सकाळी डोंगरेवाडी, दुपारी नेकनाळ येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाईल.

जळकोट तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी रावणकोळादुपारी हळद वाढवणा, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी पाटोदा बु.दुपारी कोळनुर, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी सोनवळादुपारी कोनाळी डोंगर, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी मंगरुळ, दुपारी बोरगाव, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी लाळी खु.दुपारी बेळसांगवी, 13 डिसेंबर2023 सकाळी येवरीदुपारी लाळी बु., 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी ढोरसांगवी, दुपारी धामणगाव, 15 डिसेंबर2023 रोजी सकाळी हावरगा आणि दुपारी येलदरा येथे यात्रा जाणार आहे.

लातूर तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी भातखेडा,  दुपारी ममदापूर, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी भाडगावदुपारी रमजनापूर, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी उमरगादुपारी बोरी, 11 डिसेंबर2023  रोजी सकाळी शिवणी खु . दुपारी सेलू बु., 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी धनेगावदुपारी सोनवती, 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी बाभळगावदुपारी सिरसी, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी कातपूर, दुपारी सिंकदरपूर, 15 डिसेंबर2023  रोजी सकाळी मळवटी आणि दुपारी कोळपा येथे विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचणार आहे.

निलंगा तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी हंद्राळ व अंबुलगा,  दुपारी हालसी हा व शेंद, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी हणमंतवाडी व निटूरदुपारी वाडीकासारशिरसी व ताजपूर, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी कोराळी व डांगेवाडीदुपारी नेलवाड व ढोबळेवाडी, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी मिरगनहळही व कलांडी, दुपारी देवीहल्लाळी व बसपूर, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी ममतदापूर व केळगावदुपारी तांबाळा व खडकउमरगा,  13 डिसेंबर2023 रोजी सकाळी कासार बालकुंदा व दापका, दुपारी पिरुपटेलवाडी व लांबोटा, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी चिलवंतवाडी व गुऱ्हाळ, दुपारी मोळगाव क  आणि जाऊ, 15 डिसेंबर2023 रोजी सकाळी कलमुगळी  व जाजणूर, दुपारी टाकळी आणि तळीखेड येथे संकल्प यात्रेंतर्गत उपक्रम होतील.

रेणापूर तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी बिटरगाव,  दुपारी फरदपूर, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी गरसुळी, दुपारी वाला, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी तत्तापूरदुपारी कामखेडा, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी कोळगाव, दुपारी निवाडा, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी शेरादुपारी कुंभारी, 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी सुमठाणादुपारी समसापूर, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी गव्हाण दुपारी हरवाडी,   15 डिसेंबर2023 रोजी सकाळी सेलू, दुपारी जवळगा विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचणार आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी अजनी बु.,  दुपारी कळमगाव, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी होनमाळ,  दुपारी बेवनाळ, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी हालकीदुपारी तळेगाव बोरी, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी उमरदरा, दुपारी वांजरखेडा, 12 डिसेंबर2023 सकाळी हिसामाबाददुपारी डोंगरगाव बोरी, 13 डिसेंबर2023 सकाळी अंकुलगा सय्यददुपारी तुरुकवाडी, 14 डिसेंबर2023 सकाळी हाणमंतवाडी, दुपारी कांबळगाव, 15 डिसेंबर2023 सकाळी आनंदवाडी, दुपारी हिप्पळगाव येथे यात्रा जाईल.

उदगीर तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी दिग्रस,  दुपारी करडखेल, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी हेरदुपारी कुमठा, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी लोहारादुपारी मलकापूर, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी तिवटग्याळ, दुपारी हैबतपूर, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी तोंडारदुपारी लोणी, 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी सोमनाथपूरदुपारी क्षेत्रफळ, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी हंगरगा, दुपारी होणीहिप्परगा, 15 डिसेंबर2023 सकाळी डाऊळ आणि दुपारी डोंगरशेळकी येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.

**

Monday, 4 December 2023

मालवण येथे आयोजित नौदल दिन 2023 कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती भारतीय नौदलाची जहाजे आणि विशेष दलांच्या प्रात्यक्षिकांचे केले निरीक्षण

 


"आपल्या नौदलातील जवानांच्या समर्पणाला भारत वंदन करतो"

"सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो"

वीर छत्रपती महाराज बळकट नौदलाचे महत्त्व जाणून होते

"नौदल अधिकाऱ्यांच्या गणवेशावरील नवीन मानचिन्ह शिवाजी महाराजांचा वारसा प्रतिबिंबित करतील "

सशस्त्र दलांमध्ये आपल्या नारी शक्तीचे सामर्थ्य वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत

"भारताकडे विजयशौर्यज्ञानविज्ञानकौशल्य आणि आपल्या नौदल सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास आहे"

"किनारपट्टी भागातील लोकांचेजीवनमान सुधारण्याला प्राधान्य"

"कोकण हा अभूतपूर्व संधी असलेला प्रदेश आहे"

"वारसा आणि विकास हाच आपला विकसित भारताचा मार्ग आहे"

नौदल दिनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरणभारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा वापर हे तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद - मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग, दि. 4 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग येथे आयोजित नौदल दिन 2023’ च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजेपाणबुड्याविमाने आणि विशेष दलांची थरारक प्रात्यक्षिके ’ यांचे त्यांनी निरीक्षण केले. मोदी यांनीगार्ड ऑफ ऑनर सोहळ्याची पाहणी केली.

            यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले कीमालवणतारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि 4 डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.

सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर नौदल दिन साजरा करणे हा खरोखरच अभूतपूर्व अभिमानाचा क्षण आहे असे पंतप्रधान म्हणाले. सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत सांगितले की कोणत्याही देशासाठी नौदल क्षमतेचे महत्त्व ते जाणून होते. ज्यांचे समुद्रावर नियंत्रण आहे त्यांच्याकडे अंतिम सत्ता आहे या शिवाजी महाराजांच्या घोषणेचा पुनरुच्चार करत पंतप्रधान म्हणाले कीत्यांनी शक्तिशाली नौदलाची उभारणी केली. कान्होजी आंग्रेमायाजी नाईक भाटकरहिरोजी इंदुलकर या योद्ध्यांपुढे नतमस्तक होत ते आजही प्रेरणास्थान असल्याचे पंतप्रधानानी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आजचा भारत गुलामगिरीची मानसिकता झुगारून पुढे मार्गक्रमण करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. नौदल अधिकार्‍यांच्या गणवेशावरील मानचिन्ह (इपॉलेट्स) आता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि ठेवा अधोरेखित करतील कारण हे नवीन मानचिन्ह नौदलाच्या प्रतीक चिन्हाशी साधर्म्य साधते याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी गेल्या वर्षी नौदलाच्या ध्वजाचे अनावरण केल्याची आठवण सांगितली. आपल्या वारशाचा अभिमान बाळगत पंतप्रधानांनी घोषणा केली की भारतीय नौदल आता भारतीय परंपरेनुसार आपल्या पदांचे (रँक) नामकरण करणार आहे. सशस्त्र दलांमध्ये नारी शक्ती मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला. नौदलाच्या जहाजात भारताच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरच्या नियुक्तीबद्दल मोदी यांनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.

140 कोटी भारतीयांचा विश्वास ही सर्वात मोठी शक्ती आहे कारण भारत मोठी उद्दिष्टे निश्चित करत आहे आणि पूर्ण दृढनिश्चयाने ती साध्य करण्यासाठी झटत आहे असे पंतप्रधान म्हणाले. विविध राज्यांतील लोक ‘ राष्ट्र प्रथम’ या भावनेने प्रेरित होत असल्यामुळे संकल्पभावना आणि आकांक्षा यांच्या एकत्रित सकारात्मक परिणामांची झलक दिसून येत आहे असे पंतप्रधान म्हणाले. आज देशाने इतिहासातून प्रेरणा घेतली आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार केला जात आहे. नकारात्मकतेच्या राजकारणावर मात करून प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा संकल्प जनतेने केला आहे. हा संकल्प आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल असे ते म्हणाले.

भारताच्या व्यापक इतिहासाबाबत व्यक्त होताना पंतप्रधान म्हणाले कीहा इतिहास केवळ गुलामगिरीपराभव आणि निराशेबद्दलचा नसूनत्यामध्ये भारताचे विजयधैर्यज्ञान आणि विज्ञानकला आणि सृजनशीलताकौशल्ये आणि भारताच्या सागरी क्षमतांच्या गौरवशाली अध्यायांचाही समावेश आहे. तंत्रज्ञान आणि साधन सामुग्रीची उपलब्धता जवळजवळ नाहीचअशा काळात उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्गसारख्या किल्ल्याचे उदाहरण देऊन त्यांनी भारताच्या या क्षमतांवर प्रकाश टाकला. त्यांनी गुजरातमधील लोथल येथे सापडलेले सिंधू संस्कृतीमधील बंदरआणि सुरत येथील 80 पेक्षा जास्त जहाजे नांगरण्याची क्षमता असलेल्या बंदराच्या वारशाचा उल्लेख केला. चोल साम्राज्याने आग्नेय आशियाई देशांपर्यंत आपला व्यापार वाढवला होतात्याचे श्रेय पंतप्रधानांनी भारताच्या सागरी सामर्थ्याला दिले. परकीय शक्तींच्या आक्रमणामुळे सर्वात प्रथम भारताची सागरी क्षमता बाधित झाल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले कीजो भारत नौका आणि जहाजे बनवण्यासाठी प्रसिद्ध होतात्याने समुद्रावरील आपले नियंत्रण गमावले आणि त्यामुळे सामरिक-आर्थिक ताकदही गमावली. भारत विकासाकडे वाटचाल करत असतानाआपण आपले गमावलेले वैभव परत मिळवायला हवेयावर भर देत पंतप्रधानांनी ब्लू इकॉनॉमीअर्थात नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी 'सागरमालाप्रकल्पाअंतर्गत बंदराच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाचा उल्लेख केला आणि सांगितले की भारत 'मेरिटाइम व्हिजन', अर्थात सागरी दृष्टीकोना अंतर्गत आपल्या महासागरांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी माहिती दिली की सरकारने व्यापारी मालवाहतुकीला चालना देण्यासाठी नवीन नियम बनवले आहेतत्यामुळे गेल्या 9 वर्षांमध्ये भारतातील सागरी व्यापाऱ्यांची संख्या 140 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. सध्याच्या काळाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, "हा भारताच्या इतिहासाचा असा काळ आहेजो केवळ 5-10 वर्षांचा नव्हेतर येणाऱ्या अनेक शतकांचे भविष्य लिहिणार आहे." ते म्हणाले की गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये दहाव्या स्थानावरून झेप घेततो पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहेआणि तिसऱ्या स्थानाच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. जग भारताचा विश्व मित्र (जगाचा मित्र)’ म्हणून उदय होताना पाहत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले कीइंडिया मिडल ईस्ट युरोपियन कॉरिडॉर सारख्या उपायांमुळे हरवलेला मसाल्याचा मार्ग पुन्हा निर्माण होईल. त्यांनी मेड इन इंडियाचे सामर्थ्य स्पष्ट करतानातेजसकिसान ड्रोनयूपीआय प्रणाली आणि चांद्रयान-3 यांचा उल्लेख केला.

परिवहन विमानेविमानवाहू जहाज INS विक्रांतच्या उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता देखील दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

देशाच्या किनारपट्टी आणि सीमावर्ती भागातील गावांनादेशातील शेवटचे गावअसे संबोधण्या ऐवजी, ‘देशातील पहिले गाव’ समजण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करताना मोदी म्हणाले, "आजकिनारपट्टी भागातील प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान सुधारणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे." 2019 मध्ये स्वतंत्र मत्स्यव्यवसाय मंत्रालयाची निर्मिती आणि या क्षेत्रात 40 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा उल्लेख करून, 2014 नंतर मत्स्य उत्पादनात 8 टक्के आणि निर्यातीत 110 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्याशिवायशेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण 2 लाखावरून वरून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आले असून त्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळत आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मूल्य साखळीच्या विकासाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की सागरमाला योजना किनारपट्टी भागातील आधुनिक कनेक्टिव्हिटी (संपर्क यंत्रणा) मजबूत करत आहे. यावर लाखो कोटी रुपये खर्च होत असून त्यामुळे किनारपट्टी भागात नवे व्यापार आणि उद्योग सुरु होतील. मत्स्य प्रक्रियेशी संबंधित उद्योग आणि मासेमारी नौकांचे आधुनिकीकरणही हाती घेतले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

कोकण हा अभूतपूर्व संधींचा प्रदेश आहेअसे पंतप्रधान म्हणाले. या राज्याच्या विकासासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सिंधुदुर्गरत्नागिरीअलिबागपरभणी आणि धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनचिपी विमानतळाचे कार्यान्वयन आणि माणगावपर्यंत जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा उल्लेख केला.काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तयार केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. समुद्रकिनारी असलेल्या निवासी भागांचे रक्षण करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रयत्नात त्यांनी खारफुटीची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जात असल्याचा उल्लेख केला. खारफुटी व्यवस्थापनासाठी मालवणआचरा-रत्नागिरी आणि देवगड-विजयदुर्गसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची निवड करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

वारसा आणि विकासहाच आपला विकसित भारताचा मार्ग आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले कीकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात या वास्तूंच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले गड-किल्ले जतन करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा निर्धार आहे. यामुळे या भागातील पर्यटन वाढून नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतीलअसे पंतप्रधानांनी नमूद केले.

संबोधनाचा समारोप करतानापंतप्रधानांनी दिल्लीबाहेर लष्कर दिननौदल दिन इत्यादीसारखे सशस्त्र सेना दिन आयोजित करण्याच्या नवीन परंपरेबद्दल सांगितले कारण यामुळे या सोहोळ्याची व्याप्ती भारतभर वाढते आणि नवीन ठिकाणे आकर्षणाचे नवीन केंद्र ठरतात.

नौदल दिनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरणभारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा वापर हे तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ही बाब आपल्या सर्वांच्या गौरवाची आहे. भारतीय नौदलाच्या ध्वजामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रेचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले व तमाम महाराष्ट्रासाठी गौरवाची अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. शिवपराक्रमाने पावन झालेल्या शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.

आज संपूर्ण महाराष्ट्रच नाहीतर राष्ट्र शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहे. या ऐतिहासिक पूर्वसंध्येला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यावेळी महाराष्ट्राची पहिली नौदल अधिकारी म्हणून श्रीमती देवस्थळी यांची नेमणूक झाली आहे याचाही तमाम महाराष्ट्राला अभिमान असल्याचे सांगून ते म्हणाले देशातील महिलांच्या आत्मनिर्भरतेच प्रतीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालं आहे. आत्मनिर्भरतेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा आणि वसा आपण सर्वजण पुढे घेऊन जात आहे. आत्मनिर्भर भारत आणि आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास आलाय. आता आपल्या सामर्थ्याची नोंद संपूर्ण जगाने घेतलेली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैसमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसंरक्षण मंत्री राजनाथ सिंहकेंद्रीय सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारसंरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहाननौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदुर्ग येथील नौदल दिन 2023’ सोहोळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करतोज्यांच्या राजमुद्रेद्वारे नवीन नौदल चिन्हाची प्रेरणा मिळालीज्याचा स्वीकार गत वर्षी पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या जलावतरणावेळी करण्यात आला.

दरवर्षीनौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाची जहाजेपाणबुड्याविमाने आणि विशेष दले यांच्याद्वारे कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-डोमेन कार्यान्वयनाच्या विविध पैलूंचे साक्षीदार बनण्याची संधी देतात. असे राष्ट्रीय सुरक्षेतील नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकतात आणि नागरिकांमध्ये सागर विषयक जाणीव-जागृती करतात.

पंतप्रधानांनी अनुभवलेल्या क्रियात्मक प्रात्यक्षिकांमध्ये कॉम्बॅट फ्री फॉलहाय स्पीड रन्सस्लिदरिंग ऑप्स ऑन जेमिनी अँड बीच असॉल्टएसएआर डेमोव्हीईआरटीआरईपी आणि एसएसएम लाँच डिलसीकिंग ऑप्सडंक डेमो आणि सबमरीन ट्रान्झिटकामोव्ह ऑप्सन्यूट्रलायझिंग एनिमी पोस्टस्मॉल टीम इन्सर्शन - एक्स्ट्रॅक्शन (एसटीआयई ऑप्स)फ्लाय पास्टनेव्हल सेंट्रल बँड डिस्प्लेकंटिन्युटी ड्रिलहॉम्पाइप डान्सलाइट टॅटू ड्रमर्स कॉल आणि सेरेमोनिअल सनसेट यांचा समावेश होता. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Sunday, 3 December 2023

अण्णासाहेब पाटील महामंडळामुळे दिनेशचा शेती, कॉलेज ते मेडीकल व्यवसाय

 यशोगाथा :



धाराशिव : कोणतेही काम करण्याची इच्छाशक्ती असली आणि त्याला परिश्रम करण्याची जोड मिळाली की कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते. हे धाराशिव तालुक्यातील येडशी येथील रहिवासी असलेल्या दिनेश पाटीलने सिध्द करुन दाखविले आहे. घरच्या शेतीत वडीलांना मदत करुन शिक्षण घेतांना पुढे त्या शिक्षणातूनच व्यवसाय थाटून युवा वर्गापुढे आदर्श निर्माण केला आहे. मेडीकल स्टोअर्स सुरु करुन स्वत: स्वावलंबी होवून तीन जणांना रोजगारदेखील दिनेशने उपलब्ध करुन दिला आहे.
दिनेशने सन २००८ ते 20१२ या कालावधीत शिक्षण घेत असतांना घरच्या शेतीच्या कामांमध्ये वडिलांना मदत केली. शेती करत असतांना दिनेशच्या असे लक्षात आले की, शेतीला पुरक व्यवसायाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण शिक्षण घेतलेल्या फार्मसी अभ्यासक्रमाचा उपयोग केला पाहिजे. हे लक्षात घेऊन दिनेशने सन 2013 मध्ये धाराशिव येथील आनंदनगर पोलीस स्टेशनसमोर मेडिकल व्यवसाय सुरू केला. कुठलाही व्यवसाय म्हटले की, अडचणी हया आल्याच. त्या अडचणींना सामोरे जाऊन दिनेशने काही काळ व्यवसाय सुरळीत व चांगला सुरु ठेवला. या कालावधीमध्ये व्यवसायात वाढ होत गेली. सन २०१८ ते 2023 या पाच वर्षांमध्ये व्यवसायाचा आलेख वाढतच गेला.
वाढत्या व्यवसायाला आवश्यकता होती ती अत्याधुनिक होण्याची. त्यासाठी लागणाऱ्या गुंतवणूकीसाठी पैसा उभारायचा कोठून याबाबत एके दिवशी दिनेशने वडीलांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान व्यवसाय उभारण्यासाठी लागणारी रक्कम आणायची तर कोठून हा प्रश्न निर्माण झाला. दिनेशला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबद्दल माहिती मिळाली. दिनेशने निश्चय केला, की या योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यावर जो काही कर्जाचा व्याज परतावा आहे, त्याचे व्याज महामंडळाकडून आपल्याला आपला बँकेचा हप्ता भरल्यानंतर परत मिळतो.
त्यासाठी दिनेशने थेट धाराशिव येथील अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कार्यालय गाठून महामंडळाच्या कर्जाविषयीची माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रशांत घुले यांना भेटून घेतली. श्री. घुले यांनी दिनेशला महामंडळाच्या कर्जाविषयी सविस्तर माहिती दिली. या महामंडळाचे कर्ज घेण्याचा निर्णय दिनेशने घेतला. त्यासाठी त्याने पुढील बँकेची कर्ज मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. सुरुवातीला महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र काढून घेतले. पंजाब नॅशनल बँकेत जाऊन कर्ज उपलब्धतेबाबत माहिती घेतली. बँकेकडून दिनेशला कर्ज उपलब्धतेबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पूर्वी बँकेबद्दल सगळीकडे नकारात्मक चर्चा ऐकून होता. पण तसे काहीच नसल्याचे दिनेशला बँकेच्या व्यवस्थापकाशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले. उलट बँकेच्या व्यवस्थापकाने दिनेशला कर्ज उपलब्ध करुन देण्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहित केले.
बँकेच्या व्यवस्थापकांनी दिनेशला महामंडळांतर्गत 9 लक्ष 75 हजार रुपयांचे 2018 ला कर्ज मंजूर केले. महामंडळाच्या धाराशिवमधील सुरुवातीचा काळातील लाभार्थ्यांपैकी दिनेशही एक लाभार्थी होता. मिळालेल्या कर्जामधून दिनेशला मेडिकल स्टोअर्स अत्याधुनिक पद्धतीचे करायचे होते. बदलत्या काळानुसार त्यासाठी दिनेशने घेतलेल्या कर्जातून फर्निचर, कॉम्प्युटर, फ्रीज, प्रिंटर व उपलब्ध होणाऱ्या विविध औषधी या गोष्टी खरेदी केल्या. त्यानंतरच्या काही काळातच व्यवसाय वाढतांना दिसला. सध्या दिनेशकडे तीन कामगार काम करतात. तीन कामगारांना 15 हजार रुपये देऊन महिन्याकाठी दिनेशला 35 हजार रुपये शिल्लक राहतात. या महामंडळाची एक चांगली गोष्ट अशी की, आपण बँकेला वेळेवर हप्ता भरायचा. भरलेला हप्ता महामंडळाकडे क्लेम करायचा. महामंडळ आपला क्लेम पाहून व चालू व्यवसायाचा फोटो पाहून आपल्याला त्या महिन्याचा व्याज परतावा करते.
दिनेशला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेबद्दल कळल्यापासून त्याचे मित्रमंडळी व नातेवाईकांमध्ये योजनेबद्दल दिनेशने माहिती दिली. त्यातील आज अनेक जण या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय करीत आहे. मराठा समाजातील तरुणांनी व्यवसायाकडे वळायला हवे. व्यवसायासाठी लागणारे जे काही भांडवल आहे, ते बँकेकडून उपलब्ध झाल्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याचा लाभ घेता येतो. त्यासाठी सर्वांनी आपल्या व्यवसायाचे आयटीआर सीबील व्यवस्थित ठेवणे आवश्यक असल्याचे दिनेशने सांगीतले.

Thursday, 16 November 2023

मराठा समाजातील युवकांना रोजगारातून स्वावलंबनाचा मार्ग दाखविणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

 विशेष लेख:



मराठा समाजातील बेरोजगार युवक युवतींना उद्योग/व्यवसाय उभारण्यास मदत करून त्यांना रोजगारातून स्वावलंबनाचा मार्ग दाखविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या कर्जाच्या व्याजाच्या रक्कमेचा परतावा महामंडळ करते.
मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासाला महामंडळाच्या योजनेअंतर्गत या घटकातील युवक-युवतीना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास कर्जदार युवका-युवतींनी उद्योगासाठी घेतलेले व्याज महामंडळ भरते.यामुळे व्यवसाय उभारणीसाठी युवक-युवतींना दिलासा मिळतो. मराठा समाजातील या युवक युवतींना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ काम करते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून मराठा समाजातील नागरिकांना उद्योग व व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झाली आहे.या कर्जाच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय,दुग्ध व्यवसाय,शेळीपालन,व्यवसायिक वाहने,मेडिकल,कृषी सेवा केंद्र,हॉटेल मालवाहतूक वाहने,ट्रॅक्टर,किराणा दुकान,फुटवेअर,टेलरिंग दूकान, मेडीकल असे विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केले आहे.
जिल्ह्यातील मराठा समाजातील युवक-युवतींनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन रोजगारातून स्वावलंबनाच्या मार्गाची कास धरावी.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, धाराशिव