Followers

Wednesday, 18 December 2024

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

 






Ø नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान

Ø आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त


नागपूर : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’  ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्यात्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहेत्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहेअसे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह  यांनी केले.


नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्यावतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


 ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्रमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळेमाहिती संचालक किशोर गांगुर्डेदयानंद कांबळे उपस्थित होते.

   
श्री. ब्रिजेश सिंह म्हणालेकोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतीलअशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाहीतर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईलत्या माहितीला अधिक पडताळून घेणेत्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणेअशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणेयाचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजेअसा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.


आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागतेयाची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणूनमाणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतोत्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेलअसे त्यांनी सांगितले.


अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणालेआपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रीम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाहीयासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावेअशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णीधमेंद्र झोरेभुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकारमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.

००००००


महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

 



 नागपूर: राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले.        विधानभवनातील समिती सभागृहात या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धनसंरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठीगोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.  

          राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. 'गो टेनअंतर्गत गो संगोपनगो संवर्धनगो संरक्षणगोमय मूल्यवर्धनगोशाळागोरक्षकगोपालकगो आधारीत शेतीगो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा (डेअरी) निर्माण करण्यात येतील, असेही श्री. मुंदडा यांनी सांगितले.

          आयोगामार्फत देशी गोवंशाचे संवर्धनसंरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण केले जात आहे. गोशाळागोसदनपांजरपोळ व गोवंश संस्थांची नोंदणीगोवर्धन गोवंश सेवा केन्द्र योजना व इतर योजना अंतर्भुत करणे व त्याची अंमलबजावणी करणे,  पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणेदुर्बलवयस्क व रोगग्रस्त पशुंचे व्यवस्थापनकाळजी व उपचार यांची सुनिश्चितीपशुंची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात असून त्याबाबतची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनता आणि गोवंश संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून दिली आहे.

संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी मुख्य सचिव सुजाता सौनिकगोसेवा आयोगाचे सदस्य सर्वश्री संजय भोसलेडॉ. नितीन मार्कंडेयउद्धव नेरकरसुनील सूर्यवंशीसनत कुमार गुप्तादीपक भगत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

 

 



नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकगृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आ. एस. चहलपोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच अन्य विविध विभागांचे अतिरिक्त सचिवप्रधान सचिव तसेच गृह विभागपोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

हे नवीन संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी सुलभ करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विविध जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र कारागृह विभागमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क (ऑनलाईन सेवा)आपले सरकारमहाराष्ट्र राज्य पोलीसबृहन्मुंबई पोलीस,महाराष्ट्र सागरी मंडळमहाराष्ट्र शासनमोटार वाहन विभागलाचलुचपत प्रतिबंधक विभागसरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीकेंद्रीय अन्वेषण ब्युरोपोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर) पुणेगुन्हे अन्वेषण विभाग पुणेमहाराष्ट्र सुरक्षा दलमुंबई वाहतूक पोलीएनजेडीजी राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिडदेशाच्या सेवेत भारतीय पोलीसराष्ट्रीय तुरुंग माहिती पोर्टलई-प्रोसिक्युशन आदी विभागांचे जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


Sunday, 13 October 2024

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे अविस्मरणीय आनंद मेळाव्यात लाभार्थ्यांच्या भावना

 







नांदेड : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आज नांदेड जिल्ह्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

आज नांदेड येथील नवा मोंढा, कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर महिला सशक्तीकरण अभियानातील नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या निवडक सन्मानार्थी लाभार्थ्यांच्या अशा आहेत प्रतिक्रिया...

“मुलींना मोफत उच्च शिक्षण योजने”मुळे मुलीच्या पंखांना बळ

नांदेड जिल्ह्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालय, ग्रामीण येथे बीएडच्या द्वितीय वर्षात शिकत असलेली कविता मोकळे विद्यार्थिनी सांगते की, पूर्वी मुलींना उच्च शिक्षणात 50 टक्के  फी माफ होती. असे असूनही राहिलेली 50 टक्के फी भरणेही माझ्या शेतकरी आई वडिलांसाठी मोठे अडचणीचे होते. परंतू  आत्ता शासनाने मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी माफ करून  मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना सुरू केली. त्यामुळे  मला आत्ता  माझे शिक्षण पूर्ण करता येणार असून शिक्षिका होण्याचे माझे स्वप्न सत्यात उतरणार आहे. 

              या योजनेची लाभार्थी म्हणून माझा व माझ्या सहकारी विद्यार्थिनींचा मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सन्मानही झाला, हा सन्मान माझ्यासाठी खूप अविश्वसनीय आहे. मुलींना उच्च शिक्षणासाठी संपूर्ण फी माफ केल्याने कुटुंबातही मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून शासनाने  मुलींना उच्च शिक्षण घेऊन आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण केल्याची भावना ही कविताने बोलून दाखविली.


मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातूनदि व्यांगही स्वतः च्या पायावर उभे

          राज्यात मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेतून उच्च शिक्षित तरुणांना रोजगार मिळत आहे. त्यातही नांदेड येथील आर.आर. मालपाणी  मतिमंद आणि मूकबधीर विद्यालय व किनवट सारख्या आदिवासी भागातील  निवासी मूकबधीर विद्यालयातील  संगणक तज्ञ, आयटीआय, डीएड  विद्यार्थ्यांना मिळालेला रोजगार विशेष आहे.

    कारण मालपाणी विद्यालयातील अभिषेक शेळके, समिउल्ला खान आसर पठाण, प्रदीप लोंढे तर निवासी मूकबधीर विद्यालयातील अक्षय तकलवार हे  विद्यार्थी कर्णबधीर, मूकबधीर असले तरी त्यांना आपल्या ज्ञानाच्या जोरावर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगाराची संधी मिळाली आहे. याआधी त्यांना कुठलाच रोजगार नव्हता, त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांतर्फे विद्यालयाचे प्राचार्य नितीन निर्मल यांनी शासनाचे आभार मानले आहे.                      

श्री.निर्मल यांच्या प्रतिक्रियेचे द्विभाषिक शिक्षक साईनाथ इप्तेकर यांनी मुलांच्या भाषेत भाषांतरित करूनही सांगितले. रोजगार मिळाल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर  झळकत होता.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आदिवासी पाड्यावरील महिला झाल्या आर्थिक सक्षम

      किनवट तालुक्यातील घोगरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत शिवशक्तिनगर येथील पाड्यावर राहणाऱ्या जिजाबाई धुरवे व शशिकला आत्राम या 50 वर्षावरील वयाच्या आदिवासी  महिलांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. शेती आणि पशूपालन करणाऱ्या, स्वतःचे अर्जही भरता न येणाऱ्या या महिलांचे अंगणवाडी पर्यवेक्षिका चंद्रकला पोले यांनी परिपूर्ण अर्ज सादर केल्याने आजपर्यत 7 हजार 500 रू. चा लाभ त्यांना मिळाला आणि इतर महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाल्याने गावातील महिलांमध्ये आर्थिक सक्षमता आल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. तसेच आज मुख्यमंत्र्यांच्या हस्तेही सन्मान होत असल्याने आनंद होत असल्याचे सांगत त्यांनी शासनाचे आभार मानले.

बचत गटातील महिला आर्थिक मदतीतून स्वयंपूर्ण

महिला आर्थिक विकास महामंडळ आणि बँकेमार्फत 10 महिला असलेल्या आम्रपाली बचत गटास सात लाखांचे कर्ज मंजूर झाले. त्यातून आम्ही बांधकाम साहित्य विकत घेऊन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून आम्हाला चांगले उत्पन्नही मिळत आहे. आज मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते आमचा सन्मानही  झाला असून आम्हाला खूप आनंद होत असल्याच्या भावना आम्रपाली बचत गटातील लक्ष्मी धडेकर, चंद्रकला धडेकर यांनी व्यक्त केल्या. 

लाडाची योजना लेक लाडकी

महिलांचे सक्षमीकरण करण्याचा मुख्य पाया म्हणजे मुलींच्या जन्मापासून त्यांचे आरोग्य, पोषण यांची काळजी घेणे. यासाठी मुख्यमंत्री लेक लाडकी योजना गरीब कुटुंबासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. नांदेड येथील पौर्णिमा दापशेंडे यांना 10 महिन्यापूर्वी मुलीच्या जन्मावेळी पाच हजार रूपयांचे अनुदान व बेबी किट चा लाभ देण्यात आला. तसेच संघमित्रा कांबळे यांनाही एक वर्षापूर्वी मुलीच्या जन्मावेळी  पाच हजार रूपये व बेबी किट चा लाभ देण्यात आला.  मुलींच्या जन्मावेळी लेक लाडकी योजनेचा लाभ मिळाल्याने मुलींची चांगल्या पध्दतीने काळजी घेता आली, असे त्यांनी यावेळी सांगत शासनाचे आभार मानले.

  यावेळी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांचाही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्या सर्वांनी शासनाचे आभार मानले.

****

मुख्यमंत्र्यांनी केले गोमातेचे पूजन

 




नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथील महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच गोमातेला पुष्पहार घालून पूजन केले. महाराष्ट्र शासनाने गोमातेला नुकतीच राज्य मान्यता दिली आहे.   


या पूजन कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी गाय या गोमातेचे पूजन केले. यावेळी लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील परसराम सापनर यांची लाल कंधारी, किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथील संतोष पेळे यांची मथुरा लभाण व नांदेड येथील श्रीरंग डोईफोडे यांच्या देवणी गायीचा समावेश आहे. 


यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आदी उपस्थित होते. 

0000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामे व प्रकल्पांचे भूमिपूजन

 





नांदेड- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रकल्पांचे आज भूमिपूजन केले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुख्य कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष विकासकामांच्या ठिकाणी उपस्थित राहून भूमिपूजन केले.


 याप्रसंगी कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर,जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती.


यामध्ये हनुमान गड परिसरातील राजमाता जिजाऊ सृष्टीचे लोकार्पण. कुसुम सभागृहासमोर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमीपूजन. पावडे वाडी नाका परिसरातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन.


  नांदेड येथील वाडी उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचे तसेच परिचारिका वसतिगृहाचे भूमीपूजन. पिपल्स व सायन्स कॉलेज परिसरातील कै. नरहर कुरूंदकर यांचे नांदेड येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या बांधकामाचे भूमीपूजन. यासह लेबर कॉलनीतील पाणी पुरवठा सक्षमीकरण व बळकटीकरणाचे भूमीपूजन यासह शहरातील शेतकरी चौक, तरोडा नाका येथे विविध रस्त्यांसाठी भूसंपादनासह सुधारणा आदी कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांनी केले.

महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे





• मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना सुरूच राहणार

• महिलांच्या प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध 

• नवा मोंढा मैदानावर महिला सक्षमीकरणाचा शानदार सोहळा 

नांदेड : राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना देशभरात सुपर हिट झाली. या योजनेसह इतर योजनांमधूनही महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम राज्य शासन करत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा, हेच शासनाचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या योजनेसह शासनाच्या सर्व योजना ‘पर्मनंट’ सुरू राहतील, असा विश्वासही  त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींसमोर व्यक्त केला. 

नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, डॉ. तुषार राठोड, श्यामसुंदर शिंदे, राजेश पवार, माजी खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,  नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनाच्यवतीने मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रशासनाच्यावतीने स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.   

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील दहा लाख भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ मिळतो आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देऊन सुरु केलेली ही योजना आहे. आता महिनाभरात भाऊबीज पण येईल. आमची भगिनींसाठी ही ओवाळणी थांबणार नाही. ती सतत सुरूच राहीन. योजना सुरु होऊन तीन महिने झालेत, जवळपास 2 कोटी 30 लाख भगिनींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या योजनेसाठी शासनाने 33 हजार कोटींची तरतूद केली आहे. तर 17 हजार कोटी रूपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर 2024 या दोन महिन्यांचे आगाऊ हप्तेही खात्यात जमा केले आहेत. सध्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रूपये जमा होताहेत. तर यापुढे यामध्ये योजनेच्या रक्कमेत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे प्रत्येक महिलेला अधिक आर्थिक सक्षम बनविण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. छोटा, मोठा व्यवसाय उभारणीसाठी या रकमेचा पाठिंबा महिलांना मिळणार आहे. काही महिला या दिशेने पुढेही जात आहेत, त्याचे समाधान आहे. या महिला लखपती दिदी झाल्याचे पाहायचे आहे, असा आशावादही  मुख्यमंत्री यांनी व्यक्त करत महिलांना प्रेरित केले. आर्थिक सक्षम महिला या ध्येयाबरोबरच सुरक्षित महिला यालाही शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटात 50 टक्के सवलतीचा लाभही देण्यात येत आहे. या योजनांबरोबरच सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना आदी योजनाही सुरूच राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. गान सम्राज्ञी आशाताई भोसले यांनीही या योजनेचे कौतुक करत सरकारचे अभिनंदन केले आहे, हे विशेष. सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत ‘शासन आपल्या दारी’सारखा स्तुत्य उपक्रम राबवून पाच कोटी जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या आजच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून अतिशय समाधान होत आहे. बहिणींच्या डोळ्यातील आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर अखेरपर्यंत रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळते. 

तत्पूर्वी आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्र्यांनी वेळातवेळ काढून दोनवेळा पुढे ढकलेल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली याबद्दल आभार व्यक्त केले. त्यासोबतच मोठ्याप्रमाणात विकासासाठी निधी दिल्याबद्दलही आभार व्यक्त केले. राजर्षी पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. महिलांच्या आयुष्यात या नव्या आर्थिक क्रांतीने भर घातल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालय येथे 200 हून 500 खाटांची संख्या वाढवून श्रेणी वाढ केल्याबद्दल तसेच नरहर कुरूंदकर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात विकासाचा मार्ग प्रशस्त झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

महाराष्ट्र अव्वल

लाडक्या बहिणीला रक्कम दिली, मग लाडक्या भावांचे काय ? असा विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता.  तर भावांसाठीही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दरमहा 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार प्रशिक्षण भत्ता देऊन प्रशिक्षण योजना आपण राबवली, अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही गौरवोद्गार मुख्यमंत्री यांनी काढले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, लेक लाडकी योजना, महाराष्ट्र ग्रामीण जीवनज्योती अभियानासह इतर योजनांच्या महिला, युवा, ज्येष्ठ लाभार्थ्यांना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, आमदार कल्याणकर, जिल्हाधिकारी राऊत  यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांनी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

 प्रारंभी लाडक्या बहिणींचे स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी *अभिजित* राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  सूत्रसंचालन स्म‍िता मोहरीर यांनी केले. आभार शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती.

गोमातांचे पूजन, ‘खेळ पैठणी’ची रंगत

राज्यमाता म्हणून नुकताच गायीला सन्मान राज्याने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी या प्रजातीच्या गोमातांचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील कला, गितांनी कार्यक्रमाने रंगत आणली. तसेच उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर ‘खेळ पैठणीचा’ हा प्रश्न मंजुषा कार्यक्रम पार पडला. यामध्ये विचारलेल्या प्रश्नाला बरोबर उत्तर देणाऱ्या प्रत्येक विजेत्या महिलेस मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, आमदार कल्याणकर, जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली.