Followers

Monday, 3 June 2019

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचे गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





                बीड (जिमाका)दि,3 विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडयाचा सर्वांगिण विकास आणि दुष्काळमुक्तीचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करुअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी येथील गोपीनाथ गड येथे केले.
          गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगड परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडेकेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेपालकमंत्री पंकजा मुंडेराज्याचे दुग्ध विकासमंत्री महादेव जानकरराष्ट्रीय कृषि आयोगाचे उपाध्यक्ष पाशा पटेलमराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराडखासदार डॉ. प्रितम मुंडेखासदार सर्वश्री सुजय राधाकृष्ण विखे पाटीलसंजय ( बंडू ) जाधव,सुधाकर श्रृंगारेप्रताप पाटील चिखलीकरजय सिध्देश्वर स्वामीरणजित नाईक निंबाळकरओमराजे निंबाळकरहेमंत पाटील यासह आमदारपदाधिकारीशासकीय अधिकारी आणि मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. 
          यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेगोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व होते. गरीब आणि वंचिताच्या विकासासाठी ते शेवटपर्यंत झटले. मराठवाड्याच्या विकासाबरोबरच हा भाग दुष्काळमुक्त व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासन सर्वोत्वपरी प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्याने पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी समुद्रात जावू नये यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याशिवाय मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत मराठवाडयात पाण्याचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी इस्राईल सोबत करार करण्यात आला असून पाच विकास आराखडयांना मान्यता देण्यात आली आहे. याकरिता 20 हजार कोटी खर्च लागणार आहे. बंद पाईपद्वारे हे पाणी  गावागावात शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करुन दिले जाईल.
          बीड जिल्ह्याच्या विकासाबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीकृष्णा खोऱ्यातील 25 टी.एम.सी. पाणी मराठवाड्याला मिळण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. याचा लाभ बीड जिल्हयाला होणार आहे. बीड जिल्हयातील जनतेच्या जिव्हाळ्याचा रेल्वेचा प्रश्न लवकरच सुटणार असून नगर-बीड-परळी रेल्वे लाईनचे काम वेगाने सुरु आहे.
          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी कामकाज करतांना अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्यात येत आहे. राज्यात विविध भागातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजनांची सध्या अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यात आल्या आहेत. दुष्काळनिवारण्यासाठी केंद्र सरकारकडून 1300 कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान प्राप्त झाले आहे. या शिवाय निधी लागल्यास शासनाच्या तिजोरीतून दिला जाईल त्यामुळे जनतेने कुठल्याही प्रकारची काळजी करु नयेशासन आपल्या पाठीशी आहेअसे मुख्यमंत्री म्हणाले.
          प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण घडल्याचा उल्‍लेख करीत ते म्हणाले कीगोपीनाथराव मुंडे यांचे व्यक्तीमत्वनेतृत्व क्षमता अफाट होती. त्यांच्या परिसस्पर्शामुळे राज्यात अनेक नेते घडले. मुंडे साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आम्ही निश्चितपणे उभा करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
          विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या सोबत अनुभवलेल्या क्षणांचा उलेख करुन त्यांच्या आठवणी सांगितल्या.
          पंकजा मुंडे म्हणाल्या कीगोपीनाथराव मुंडे हे अखेरच्या श्वासापर्यंत वचितांच्या विकासासाठी झटले. त्यांचे कार्य आजही विसरण्यासारखे नाही. वंचितांसाठी हा दिवस उर्जा देणारा आहे. या दिवसाचे महत्व पाहता गरीब बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून प्रतिष्ठान आणि दिनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी असलेल्या योजना पोहचविण्याचा या मेळाव्याचा व प्रदर्शनाचा उददेश होता असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
          मुख्यमंत्र्यांनी पांगरी येथे आल्यानंतर प्रथम चाराछावणीस भेट दिली व शेतकरीजनावरांचे मालक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. त्यानंतर गोपीनाथगड येथील गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी दर्शन घेवून श्रध्दांजली वाहिली. त्यांनी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याचे आणि या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन केले.
          व्यासपीठावर उपस्थित नवनिर्वाचित सर्व खासदारांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खा. प्रितम मुंडे यांनी केले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना खा. विखे पाटीलनाईक निंबाळकरश्री. जाधवश्री. चिखलीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
          याप्रसंगी आमदार सर्वश्री सुरेश धसभीमराव धोंडेआर. टी. देशमुखसुजितसिंग ठाकूरतानाजी मुरकुटेलक्ष्मण पवारमोहन फडअतुल सावेतुषार राठोडश्रीमती संगिता ठोंबरेस्नेहलता कोल्हेमोनिका राजळेमाधुरी मिसाळ आदीसह भारतभूषण क्षीरसागरस्वरुप हजारीजिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेयमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.             

आपत्ती व्यवस्थापनात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची - महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव







नांदेड, दि. 3 :- प्रगत देशांमध्ये सामाजिक शिस्त, देशाप्रतीचे प्रेम, आदर नागरी कर्तव्यांचे काटेकोर पालन आणि आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी या तीन गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले जाते आणि त्याला अनुसरूनच आपली जीवनशैलीही पाळली जाते. प्रगत देश या सर्व गोष्टींसाठी अत्यंत जागरुक असतात आणि आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन याविषयीची जनजागृती यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते, असे प्रतिपादन महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत मंच येथे दि. 3 जून ते 12 जून या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर, आव्हान-2019 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख तसेच विशेष कार्य अधिकारी डॉ. अतुल साळुंके, महामहीम राज्यपाल महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बी. वेणूगोपाल रेड्डी, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी हे उपस्थित होते.  
राज्यपाल चे. विद्यासागर राव पुढे म्हणाले ,सध्याच्या काळात प्रत्येक राष्ट्राने आपत्ती व्यवस्थापनाकरिता नेहमीच सज्ज राहायला हवे. खरे तर आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक धडे शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच देणे,  ही काळाची गरज आहे.  भारत देश हा विकसनशील देशांमधील अग्रेसर देश आहे.  एकविसाव्या शतकातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे सबंध जग पहात आहे.  अशा या टप्प्यावर भारताकडे असलेल्या युवा शक्तीचा वापर राष्ट्रहितासाठी प्रगतीसाठी योग्य मार्गाने होणे गरजेचे आहे.  
महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष कौतुक करताना म्हणाले की,  राष्ट्रउभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका अत्यंत आवश्यक व मोलाची आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशन अभियानामध्ये या विद्यार्थ्यांचा खूप चांगला उपयोग होणार आहे. हेच युवक - युवती उद्याचे देशाचे भविष्य आहे. या विद्यार्थ्यांना या वयात दिले जाणारे प्रशिक्षण त्यांच्या पुढील आयुष्यभरासाठी उपयुक्त व दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथका तर्फे अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात यावीत, मात्र त्याचबरोबरीने दरवर्षी सुरक्षा कवायतही (Security Drill) आयोजित करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षण शिबिरात राज्याच्या विविध महाविद्यालयांमधून आलेल्या 800 मुले व 600 मुलींचे राज्यपाल श्री. राव यांनी विशेष अभिनंदन केले आणि त्यांना आवाहनही केले की,  या प्रशिक्षणाचा सर्वार्थाने लाभ घ्या आणि समाजाला उपयोगी पडेल असे काम करा. जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांची निश्चितच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमापूजनाने व तद्नंतर दीपप्रज्वलनाने या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात झाली.  त्याचबरोबर एनएसएसच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत गाऊन येथील वातावरण अधिक उत्साही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. अतुल साळुंखे यांनी केले. या प्रास्ताविकात त्यांनी राज्यभरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या विविध कामगिरीबाबतचा विस्तृत अहवाल महामहीम राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव , उपस्थित मान्यवर तसेच विद्यार्थ्यांना सादर केला.
शेवटी आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठातील संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी केले.
विद्यापीठ परिसरात महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते
विविध कार्यक्रम संपन्न
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या या भेटीदरम्यान महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसही भेट दिली. त्याचप्रमाणे त्यांनी एनडीआरएफच्या आपत्ती व्यवस्थापन प्रदर्शनास भेट दिली. त्यानंतर त्यांच्या हस्ते श्री. गुरू गोविंद सिंघजी अध्यासन संकुलाच्या इमारतीचे भूमीपूजन संपन्न झाले. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर व प्राणी संग्रहालयाच्या नूतन इमारतीचेही उद्घाटन महामहीम राज्यपाल श्री. चे . विद्यासागर राव यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे ,विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, अध्यासन केंद्राचे समन्वयक                    डॉ. दीपक शिंदे, तसेच श्री. गुरू गोविंदसिंघजी अध्यासन व संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष लड्डू सिंघजी महाजन प्रा. भगवंत सिंघजी गुलाटी,  निरंजन रवींद्र सिंघजी, सरदार रणवीर सिंग, प्रा. गुरुबच्चन सिंग विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता अरुण पाटील, अभियंता कनिष्ठ अभियंता हिरामण वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.

श्री गुरु गोविंदसिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र इमारतीचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते संपन्न





नांदेड, दि. 3 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिसरातील श्री गुरू गोविंदसिंघजी अध्यासन  संकुल व संशोधन केंद्र इमारतीचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल                   चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले.  तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिसरात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.  
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे ,विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, अध्यासन केंद्राचे समन्वयक                    डॉ. दीपक शिंदे, तसेच श्री. गुरू गोविंदसिंघजी अध्यासन व संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष लड्डू सिंघजी महाजन प्रा. भगवंत सिंघजी गुलाटी,  निरंजन रवींद्र सिंघजी, सरदार रणवीर सिंग, प्रा. गुरुबच्चन सिंग विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता अरुण पाटील, अभियंता कनिष्ठ अभियंता हिरामण वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.

महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे स्वागत


नांदेड, दि. 3 :- महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे  आज सकाळी येथील  श्री. गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले.  जिल्हा प्रशासनाच्या वतीने महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  
यावेळी त्यांच्या समवेत नांदेड  महापौर श्रीमती  दीक्षा धबाले,  विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, महानगरपालिका आयुक्त लहूराज माळी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांची उपस्थिती होती.

Thursday, 9 May 2019

मुख्यमंत्र्यांनी साधला उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद



आचारसंहितेचे कारण सांगून
दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 9 : दुष्काळी भागातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत. प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनासंदर्भात तक्रारी अथवा सूचनांची प्रशासनामार्फत तातडीने दखल घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान येथून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी टँकर पुरवठा, चारा छावणी, रोहयोची कामे आदीसंदर्भातील स्थानिक तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
सरपंचांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची नोंद घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुष्काळ निवारणाच्या या उपाय योजनांची अंमलबजावणी योग्यरितीने होते की नाही, त्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत का, यासंबंधी माहिती घेण्यासाठी सरपंचांशी संवाद साधला जात आहे. दुष्काळ उपाय योजनासंदर्भात आलेल्या तातडीच्या तक्रारींवर 48 तासात कार्यवाही करण्यात येईल. तसेच दीर्घकालीन उपाय योजनांवर धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. 
उस्मानाबाद जिल्ह्यात 139 टँकर सुरू आहेत. त्यामध्ये भूम तालुक्यात सर्वाधिक 34 तर लोहारामध्ये सर्वात कमी 1 टँकर सुरू आहे. जिल्ह्यातील 30 विंधन विहिरी, 1 तात्पुरती नळ पाणी पुरवठा योजना, 742 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित विहिरींची देयके ही पाणी भरलेल्या टँकरच्या क्षमतेनुसार देण्यात येणार आहेत. वीज बिलाअभावी बंद पडलेल्या जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी 436.41 लाख इतकी रक्कम देण्यात आली आहे. जिल्ह्यात 85 शासकीय चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये 55 हजार 247 मोठी व 6 हजार 558 लहान अशी 61 हजार 805 पशुधन दाखल आहेत. छावण्यातील मोठ्या जनावरांसाठी प्रत्येकी 90 रुपये तर लहान जनावरांसाठी 45 रुपये अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचा विचार सुरू आहे. केंद्र शासनाच्या निकषापेक्षाही राज्य शासन अधिक निधी छावण्यांसाठी देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्री. फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यातील 640 गावांमधील 3 लाख 79 हजार 147 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 236.17 कोटी दुष्काळ निधी जमा करण्यात आला आहे. पीक विमा योजनेत नोंदणी केलेल्या 10 लाख 40 हजार 49 शेतकऱ्यांपैकी 4 लाख 75 हजार 82 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 168.96 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील 1.71 लाख शेतकऱ्यांपैकी 60 हजार शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यातील 11.98 कोटी रुपये देण्यात आले असून ऊर्वरित शेतकऱ्यांना ही रक्कम देण्याची कार्यवाही सुरू आहे.
रोहयोतून 703 कामे सुरू असून त्यावर 7 हजार 359 मजूर काम करत आहेत. जिल्ह्यात 10 हजार 173 कामे शेल्फवर असून आवश्यकता असल्यास व मागणी केल्यास आणखीन कामे सुरू करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सरपंचाच्या तक्रारींची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; प्रशासनास कार्यवाहीचे निर्देश
एका सरपंचाने गावात पाणी पुरवठा योजना नादुरुस्ती अभावी बंद असल्याची तक्रार यावेळी केली. त्यावर, पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी विशेष तरतूद केली असून श्रीमती हलगुडे यांच्या गावातील पाणीपुरवठा योजनेची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
सरपंच अशोक काटे व उस्मानाबाद तालुक्यातील सरपंचाच्या तक्रारीवर, नागरिकांनी मागणी केल्यास गट विकास अधिकाऱ्यांनी रोहयोतून कामे सुरू करावीत. तसेच 2018 च्या लोकसंख्येनुसार आणि माणसांबरोबरच जनावरांची संख्या गृहित धरून टँकर व पाणी पुरविण्याचे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
विविध सरपंचांनी टँकर, चारा छावणी आदींचे प्रस्ताव पडून असल्याची तक्रार केली. यावर टँकर मंजुरीचे व चारा छावण्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदारांना यावेळी दिले व या संबंधीचा अहवाल देण्याचे सांगितले.
ऑडिओ संवादद्वारे आलेल्या तक्रारींची नोंद प्रशासनाने घेतली असून त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच व्हॉटसअपवर आलेल्या तक्रारींचे शिघ्रगतीने निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Wednesday, 8 May 2019

सरपंच, ग्रामसेवकांचा ऑडीओ ब्रीज सिस्ट‍िमद्वारे मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद


जनावरांसाठी टँकरच्या पाण्यात वाढ करा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई, दि. ८ : जनावरांनाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गावातील जनावरांची संख्या लक्षात घेऊन त्याआधारे टँकरच्या पाण्यात वाढ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सुमारे ५०० हून अधिक सरपंच तसेच ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ऑडीओ ब्रीज सिस्ट‍िमद्वारे मोबाईलवरुन थेट संवाद साधून दुष्काळी उपाय योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ग्रामसेवकांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.  सरपंच तसेच ग्रामसेवकांनी यावेळी त्यांच्या गावांमधील टँकर, पाण्याच्या टाक्या, चारा छावण्या, प्रलंबीत पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, जनावरांसाठी पाणी, रोहयोची कामे, जलसंधारणाची कामे, पाणी पुरवठा योजनांसाठी विजेचा प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून गावातील परिस्थिती त्यांना विशद केली. या मुद्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, बीडीओ यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
चारा छावणी उपलब्ध होण्यासाठीच्या अटी शिथील करण्यात याव्यात अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंचांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मागच्या काळात चारा छावण्यांच्या बाबतीत अनियमीतता झाल्याने कॅगच्या अहवालानुसार काही अटी टाकण्यात आल्या आहेत. पण तरीही विचार करुन त्यातील काही अटी शिथील करु, असे ते म्हणाले.
टँकरच्या फेऱ्यांबाबत तहसीलदरांना सूचना
औरंगाबाद जिल्ह्यातील अमोल डकाले यांनी त्यांच्या गावासाठी टँकरच्या 2 फेऱ्या मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात टँकरची एकच फेरी गावात येते असे सांगितले. त्याची दखल घेत तहसीलदारांनी याची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.         
मनरेगातून ‘मागेल त्याला रोजगार’
सिल्लोड तालुक्यातील सरपंच म्हणाले, गावात रोजगाराची वाणवा आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मनरेगा योजनेंतर्गत ‘मागेल त्याला रोजगार’ देण्यात येत आहे. मनरेगा योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली असून ती गावात राबवून लोकांना रोजगार मिळवून द्यावा. मनरेगाअंतर्गत विविध २८ प्रकारची कामे वाढविण्यात आली आहेत. यामध्ये शाळेच्या कंपाऊंडपासून विविध कामे करता येतात. याचा लाभ घेऊन लोकांना रोजगार देण्याबरोबर गावात पायाभूत सुविधांची शाश्वत कामे तयार करण्यात यावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
रमजानचा पवित्र महिना चालू असून त्यासाठी टँकरच्या पाण्यात तसेच त्यांच्या फेऱ्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील सरपंचांनी केली. त्याची दखल घेत याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली.   
औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंचांनी लोकवर्गणीतून गावातील पाणीटंचाई दूर केल्याचे सांगतानाच गावासाठी पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मिळावी अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करत योजनेच्या मंजुरीसाठी प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कन्नड तालुक्यातील वैशाली भोसले यांनी गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून विहीर मंजूर झाल्याचे सांगितले. पण शेजारच्या गावाच्या विरोधामुळे विहीर खोदता येत नाही, असा प्रश्न मांडला. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालून दोन्ही गावांना सोबत घेऊन पाणी प्रश्न सोडवावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
गावात पाणी आहे, पण ती साठवण्यासाठी टाकी नाही, असा प्रश्न औरंगाबाद जिल्ह्यातील जगदीश राजपूत यांनी मांडला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालून दुरुस्ती योजनेतून गावाचा पाणी प्रश्न तातडीने सोडवावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.  

*दुष्काळ निवारण तातडीच्या बाबींचे ४८ तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश*


•          औरंगाबाद आणि जालना दोन जिल्ह्यांसाठी. ८८७९७३४०४५ हा व्हॉटस्ॲप क्रमांक

•          दुष्काळ निवारणाच्या तक्रारी, सूचना आणि मागण्या या व्हॉटस् ॲप क्रमांकावर नोंदवा.

 मुंबई,  दि. ८ : राज्यातील दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे ४८ तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनास आज आदेश दिले.
मुख्यमंत्र्यांनी आज जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी साधलेल्या संवादात मुख्य सचिव यु पी एस मदान यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, यांच्यासह जवळपास ५०० जण सहभागी झाले होते. 
राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करू आणि दुष्काळावर मात करू असे आवाहन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद आणि जालना  या दोन जिल्ह्यासाठी ८८७९७३४०४५ हा व्हॉटस्ॲप  क्रमांक जाहीर केला.  टँकर, चारा छावण्यांची मागणी, रोहयो कामाविषयक स्थिती, जनावरांना चारा, पाणी, दुष्काळी अनुदान, पीक विमा यासारख्या दुष्काळाशी संबंधित बाबी, तक्रारी, मागण्या आणि अडचणी या क्रमांकावर  पाठवाव्यात त्या थेट माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार या सर्व प्रशासकीय यंत्रणेने संवादात तसेच व्हॉटस्ॲप क्रमांकावर नोंदवल्या जाणाऱ्या बाबींची नोंद घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करावी तसेच त्याचा अहवाल आपल्याला पाठवावा.
मुख्यमंत्री म्हणाले, टँकरने पाणी पुरवठा करताना २०१८ ची लोकसंख्या विचारात घेऊन टँकरची संख्या निश्चित करण्यात यावी अशा सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.  अधिग्रहित विहिरींसाठी पूर्वी फिक्स रक्कम दिली जात होती आता त्या विहीरीतून टँकरमध्ये किती पाणी भरले यावर निधी देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.  गरजेनुसार चारा छावण्यांच्या अटी  शिथील करण्यात येतील, असे ही मुख्यमंत्र्यांनी या संवादादरम्यान सांगितले.
रस्त्याची कामे करताना तलावांना क्षती पोहोचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, सर्व दुष्काळग्रस्त गावातील सरपंचांनी त्यांच्या गावात जलसंधारणाची अधिकाधिक कामे घ्यावीत, त्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध आहे. नरेगाअंतर्गत २८ प्रकारची कामे कन्व्हर्जन करून करता येणार आहेत. त्यातूनही ग्रामसेवक-सरपंचांनी गावात जास्तीत जास्त कामे करावीत, त्यातून रोजगार निर्माण होताना मत्ताही उभी राहील, असेही ते म्हणाले.
ज्या ठिकाणी अतिरिक्त चारा छावण्यांची, टँकरची गरज आहे तिथली मागणी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून नोंदवली जावी असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात टँकरने पाणी पुरवठा करताना त्यावर जीपीएस सिस्टिम बसवण्यात आली आहे, त्यामुळे कोणत्या टँकरच्या कुठे आणि किती फेऱ्या झाल्या हे लक्षात येऊ शकेल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करत असून त्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जात आहे, यात काही अडचणी असल्यास त्याचे निकष तपासून मदतीचे काम ही वेगाने केले जाईल.
ज्या गावात पाणी पुरवठ्याची योजना बंद पडली आहे पण तिथून गावाला पाणी मिळू शकते, अशा योजनेच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात यावेत, ती योजना दुरुस्त करून गावांना पाणी पुरवठा सुरु केला जाईल. चारा छावण्यांमध्ये मोठ्या जनावरांसाठी  प्रती जनावर ९० रुपये आणि लहान जनावरांसाठी प्रती जनावर ४५ रुपये  दिले जातात. मुख्यमंत्र्यांनी चारा छावण्यांमधील जनावरांना टॅग करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे चारा छावण्यांमध्ये किती जनावरे आहेत याची माहिती मिळू शकेल असेही ते म्हणाले.
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना- जिल्हा औरंगाबाद

•          सर्व ९ तालुक्यात दुष्काळ जाहीर

•          जिल्ह्यात १०५४ टॅकर्सनी पाणी पुरवठा

•          १५६ विंधन विहिरी, ५२ नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, १४ तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना, ५०१ विहिरींचे अधिग्रहण, ८ राष्ट्रीय पेयजल योजना तर ४ मुख्यमंत्री पेयजल योजनांचे काम पूर्ण. उर्वंरित योजना प्रगतीपथावर

•          पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची १०० लाख रुपयांची थकित वीज देयके भरली.

•          चार तालुक्यात ६ शासकीय जनावरांच्या छावण्या. ६७३३ मोठी, ९३६ लहान अशी मिळून ७६६९ जनावरे चारा छावणीत दाखल

•          १३५५ गावातील ५ लाख ४० हजार २३६ शेतकऱ्यांना ३७६ कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात

•          महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ७७४ कामे सुरु त्यावर ९३५३ मजूरांची उपस्थिती. ६४ हजार ७६७ कामे शेल्फवर.

•          जिल्ह्यात ४ लाख, ८७ हजार ०६९ शेतकऱ्यांची १६३ कोटी रुपयांची पीक विम्यासाठी नोंदणी. त्यापैकी ४ लाख ८७ हजार ०६८  शेतकऱ्यांना  २६५ .६० कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित

•          प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात १.७४ लाख शेतकऱ्यांची नोंदणी, त्यापैकी १.२३ लाख शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी  २४. ७३ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित.

•          उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु.

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना- जिल्हा जालना

•          जिल्हयातील ८ पैकी ७ तालुक्यात दुष्काळ घोषित

•          एकूण ५३२ टँकर्सद्वारे जिल्ह्यात पाणी पुरवठा

•          १९४ नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, ३९ तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना, ६३० विहिरींचे अधिग्रहण, ४ राष्ट्रीय तर १३ मुख्यमंत्री पेयजल योजनांचे काम पूर्ण. उर्वरित कामे प्रगतीपथावर

•          पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची २३७.९७ लाख रुपयांची थकित वीज देयके भरली.

•          ११ शासकीय छावण्यांमध्ये जिल्ह्यात ४९९२ मोठी, ९९७ लहान अशी मिळून ५९८९ जनावरे दाखल

•          ८५४ गावातील ४ लाख ७३ हजार ८७६ शेतकऱ्यांना ३३०.३९ कोटी रुपयांची दुष्काळी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात.

•          मग्रारोहयोअंतर्गत २६३ कामे.  त्यावर ७३६८ मजूरांची उपस्थिती. २३४१० कामे शेल्फवर

•          २ लाख ६४ हजार ६३७ शेतकऱ्यांची ६३ कोटी रुपयांची पीक विम्याची  नोंदणी, पैकी ३७.२७ कोटी रुपयांची रक्कम अदा

•          प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत १.६२ लाख शेतकऱ्यांची नोंदणी. त्यापैकी५९ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ११.७६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु.