Followers

Monday 30 March 2020

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना उभारण्यासाठी २ कोटी १७ लाखाचा निधी



पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून करोना उपाययोजनांसाठी आकस्मित निधीच्या खर्चास मंजुरी
लातूर,दि.30:- करोना संकटावर मात करण्यासाठी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तातडीने निर्माण करण्यात येत असलेल्या सोयीसुविधांसाठी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सुचने नुसार आपत्कालीन आकस्मित निधीमधून 2 कोटी १७ लाख रुपये खर्चास जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
करोना विषाणूने सध्या जगभरात थैमान घातले आहे. आपल्या देशात आणि राज्यात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्याची लागण झाल्यास रुग्णावर उपचार करण्यासाठी म्हणून तातडीने सोयी , सुविधा उभारण्यात येत आहेत संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करता यावा म्हणून लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत युद्धपातळीवर उपाययोजना आखण्यात येत आहेत. या कामासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता पडणार नाही असे जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जाहीर केलेले आहे. त्यांच्या सूचनेनुसारच या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या सोयीसुविधाच्या   कोटी १७ लाख खर्चासाठी   आकस्मित निधीतून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकिय मंजुरी दिली आहे
या निधीमधून करोना विषाणू बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारणे, तात्पुरती निवास व्यवस्था तयार करणे, रूग्णांसाठी अन्न कपडे याची व्यवस्था करणे, प्रयोगशाळा उभारणे त्याचबरोबर या आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे यावर हा निधी खर्च होणार असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत हा खर्च होणार आहे.

No comments:

Post a Comment