Followers

Friday 31 August 2018

पाणंद रस्ते योजनेचा निधी जलयुक्तचे कामे करणाऱ्या गावांनाच देणार -पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर


लातूर,दि:31:- जलसंधारणाची कामे शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या गावांनाच पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतर्गत्‍ निधी प्रदान करण्यात येईल. त्यामुळे गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक आणि शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील कामांचा आराखडा येत्या आठ दिवसात सादर करावेत असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. 
जलयुक्त शिवार अभियान मृद व जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्या सामंजस्य कराराप्रमाणे जलसंधारण कामे अंमलबजावणी आयोजित कार्यशाळेच्या निमित्ताने जळकोट,अहमदपूर व चाकूर येथे बोलत होते. या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तिरुके,जिल्हाधिकारी जी.श्रीकांत आदि मान्यवर उपस्थित होते. 
पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की दुष्काळाचा आजार मुळासकट नष्ट करण्यासाठी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक, प्रगतशील शेतकरी व सर्व ग्रामस्थांनी आपल्या गावातील जलयुक्तशिवार संबंधी जलसंधारणाच्या सर्व अपूर्ण कामांचा आराखडा तयार करुन सादर करणे आवश्यक आहे. या साठी गावपातळीवरुन बैठका घेऊन एकमेकांना गावातील प्रश्ना बाबत अवगत करावे आणि आपल्या गावाला सुजलाम सुफलाम करण्याच्या दिशेने हातभार लावणे गरजेचे आहे. 
लातूर जिल्हयाला कायम स्वरुपी दुष्काळमुक्त करण्याचा अभियानाचा शुभारंभ 30 सप्टेंबर 2018 पासून या किल्लारी येथून होणार आहे. याच दिवशी जिल्हयातील कामांच्या अंतिम आराखडयाची घेाषणाही केली जाणार आहे. भारतीय जैन संघटनेच्या वतीने मिळणाऱ्या जे.सी.बी आणि पोकलेनला आधुनिक चिप जोडण्यात आल्याने कामांची गती आणि कुशलता वाढणार आहे. जलद गतीने कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने वाहनाच्या ठिकाणी इंधनाचा पुरवठा केला जाईल असे ही ते यावेळी म्हणाले.
गावातील गणेश मंडळांनी या गणेशोत्सवात प्रत्येक घराबाहेर एक शेाष खड्डा तयार करण्याच संकल्प करावा.शोष खड्डयामुळे भुगर्भातील पाणी पातळी वाढते आणि टंचाईला मात करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे.जलसंधारणाच्या या कामांना शंभर टक्के पूर्ण करुन लातूर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासश्न ,जिल्हा परिषद पंचायत समित्या , जलसंधारण विभाग आणि शासन पूर्ण ताकतीने ग्रामस्थांच्या पाठीशी उभे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी जी.श्रीकांत म्हणाले की लातूर जिल्हा वासियांना हरित लातूर करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.राज्यातील फक्त पाच जिल्हे भारतीय जैन संघटनेला जलसंधारणाच्या कामासाठी मिळाले आहेत. त्यामध्ये आपल्या जिल्हयाचा समाविष्ठ झाल्याने लातूर कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी ही सर्वात मोठी संधी आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे सर्व गावांनी वेळेत आपले आराखडे सादर करावेत असे त्यांनी सांगितले. जळकोट,अहमदपूर व चाकूर येथील कार्यशाळेस संबंधित नगराध्यक्ष,नगरपंचायतीचे आध्यक्ष,सभावती,तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.तिरुके,समाज कल्याण सभापती संजय दोरवे, संबंधित तालुक्याचे तहसिलदार, जिल्हा कृषि अधिक्षक श्री.आळसे,सरपंच,ग्रामसेवक,कृषि सहाय्यक, तलाठी मोठया संख्येने उपस्थित होते. या तिन्ही कार्यशाळेचे प्रास्ताविक प्र. उपविभागीय अधिकारी डॉ.लोखंडे यांनी केले.


No comments:

Post a Comment