Followers

Wednesday 29 August 2018

गणेशमंडळाकडून लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करुन नवीन पॅटर्न निर्माण करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन


     लातूर दि. 29- लातूर  जिल्हा हा पॅटर्न  निर्माण करणारा  जिल्हा म्हणून ओळखला जातो.गेल्या दोन वर्षात जिल्हयातील नागरिकांनी लातूरला टॅकरमुक्त  करण्यासाठी केलेल्या  परिश्रमामुळे आज लातूर जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. या प्रमाणे जर जिल्हयातील जवळपास 1800 गणेश मंडळानी लातूर जिल्हा दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प केला तर हा पुन्हा एक नवीन पॅटर्न निर्माण होईल.आपल्या गावात , भागात,प्रभागत गणेश मंडळाने शोश खड्डे ,विहीर पुर्नभरण छतावरील पाणी जल पुर्नभरण   कामे केली तर लातूर जिल्हा कायमाचा दुष्काळमुक्त होईल असे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री  संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
     लातूर येथे  कस्तुराई मंगल कार्यालय येथे लातूर पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत आयोजित सार्वजनिक  गणेश उत्सव  पूर्व तयारी बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री अध्यक्षीय भाषणात बोलत होते.या कार्यक्रमात खासदार सुनिल गायकवाड ,जिल्हाधिकारी जी.श्रीकांत,पोलिस अधिक्षक राजेंद्र माने,जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी,विपीन ईटनकर,जि.प.अध्यक्ष मिलींद लातूरे,महापौर सुरेश पवार, जिल्हयातील गणेश मंडळाचे अध्यक्ष  व पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
     पालकमंत्री म्हणाले की, गणेशोत्सव  हा सामाजिक बांधिलकी आणि सलोख्याचा सण आहे.या सणाला शांततेत पार पाडावे तसेच पोलीस प्रशासनाला बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यास मंडळानी मदत करावी आणि हा उत्सव डिजे मुक्त साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
    यावर्षी लातूर जिल्हयातील गणेशोत्सवाची  थीम पाणी आणि झाड असे ठेवण्याचेही त्यांनी आवाहन त्यांनी केले.या बरोबरच त्यांनी प्रत्येक तालुक्यातील जी गणेश मंडळे वृक्षारोपण,जलपुर्नभरणाची कामे शंभर टक्के करतील अशा प्रत्येक तालुक्यास प्रथम ,व्दितीय,आणि तृतीय पारितोषीक देण्याचे घोषणाही केले.
या वेळी खासदार सुनिल गायकवाड,जिल्हाधिकारी जी.श्रीकांत ,पोलीस अधिक्षक राजेंद्र माने आणि विविध गणेश मंडळाचे अध्यक्षांनीही मनोगत व्यक्त केले ,तत्पुर्वी पालकमंत्री यांचा गणेशोत्सव काळात जलपूर्नभरण आणि वृक्षारोपणास प्रोत्साहन देणारा व्हिडीओ संदेशही दाखवीण्यात आला.

No comments:

Post a Comment