Followers

Monday, 18 May 2026

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी

 


लातूर : भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार २५ मे २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ पर्यंत असून उमेदवारी अर्जांची छाननी २ जून २०२६ रोजी केली जाईल, तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. 

यानंतर गुरुवार, १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून सोमवार, २२ जून २०२६ रोजी मतमोजणी केली जाईल आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment