Followers

Monday, 11 August 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण






 

लातूर : लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

 

 याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेपर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेराज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलआमदार विक्रम काळेआमदार संभाजी पाटील निलंगेकरआमदार धनंजय मुंडेआमदार संजय बनसोडेआमदार अभिमन्यू पवारआमदार रमेश कराडआमदार संजय केणेकरपोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेपोलीस अधीक्षक अमोल तांबेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीनालातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती.

 

प्रारंभी कार्यक्रमस्थळी भारतीय संविधानाची प्रत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच पुतळ्याच्या नामफलकाचे अनावरण त्यांनी केले. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या जिल्हा परिषद परिसरातील पुतळ्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते  स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याची उंची १४ फूट असून कांस्य (ब्राँझ) धातुने बनविलेला हा पुतळा ९०० किलो वजनाचा आहे. ३४५१.५६  चौ.मी. जागेत पुतळा उभारण्यात आला आहे. या परिसरात सुशोभिकरण व आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शिल्पकार विजय बोंदर व अंबादास पायघन यांनी पुतळा तयार केला. कार्यक्रम प्रसंगी अधिकारीकर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment