Followers

Thursday 31 October 2019

लातूर विभागात एकता दौड ला उर्त्स्फूत प्रतिसाद


        




लातूर :  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने 'रन फॉर युनिटी' ( एकता दौड) चे आयोजन करण्यात आले होते. या दौड ला लातूर विभागात उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला आहे.  हा दिवस देशभरात राष्ट्रीय एकता दिवस  म्हणून साजरा केला जातो.
लातूर येथे जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी एकता दौड  ला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. ही दौड जिल्हा क्रीडा संकुल येथून शिवाजी चौक (ब्रीज वरुन)  हुतात्मा स्मारक (टॉऊन हॉल)  मैदानावर आली. या दौड मध्ये शालेय, महाविद्यालयीन विदयार्थी, खेळाडू, नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनी  ऊस्फुर्त सहभाग घेतला . या दौड मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
हुतात्मा स्मारक मैदानावर सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची  पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित नागरिकांना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.या एकता दौड मध्ये लातूरकर नागरिक मोठया संख्येने सहभागी होऊन दौडला ऊस्फूर्त प्रतिसाद दिला. दौडचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला.
उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ-मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही दौड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून सुरु होवून बार्शी नाका-लेडीज क्लब-छ.शिवाजी हायस्कूल-त्रिशरण चौक-आंबेडकर पुतळा या मार्गाने जावून पोलीस मुख्यालय येथे संपन्न झाली व समारोप प्रसंगी उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. या संपूर्ण दौड दरम्यान सहभागी मान्यवरांनी  राष्ट्र प्रेम व्यक्त होणाऱ्या, देशाच्या एकात्मतेविषयी प्रोत्साहन देणाऱ्या घोषणा दिल्या.
 या राष्ट्रीय दौडमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, पोलीस उपअधीक्षक मोतीराम राठोड, श्रीमती शेख,कार्यकारी अभियंता अनिल सगर, उपअभियंता श्री. गपाट, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, आत्माचे प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे, उपसंचालक आत्माराम मलगुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, यांच्यासह उस्मानाबाद शहरातील युवा मंडळ,क्रीडा मंडळ, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
 नांदेड येथे एकता दौडच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर एकता दौडचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. 
दौडमध्ये महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, गुरुदिपसिंघ संधू, स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंघ परिहार, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, नेहरु युवा केंद्राचे कुलदिपसिंघ, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सुमित डोडल, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आदि सहभागी होते. तसेच पोलीस दलाच्या पथकाने वाद्य वृदांसह संचलन करत या दौडमध्ये सहभाग घेतला. महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा टॉवर या ठिकाणाहून एकता दौड मार्गक्रमण झाली. या दौडमध्ये सहभागी घटकांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा दिल्या. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीपर फलक घेवून दौडमध्ये सहभागी झाले.  
    हिंगोली येथे  एकता दौड ची सुरुवात अग्रसेन चौक - बसस्टँड - इंदिरा गांधी चौक - महात्मा गांधी चौक पर्यंत करण्यात आली. यावेळी एकता दौड ला हिंगोली शहराचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राज्य राखीव बलाचे समादेशक मंचक इप्पर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी हिरवी झेंडी दाखवून एकता दौडचा शुभारंभ केला. यावेळी राज्य राखीव बलाचे अतिरिक्त समादेशक आर.बी. जाधव, नायब तहसीलदार एम.जी खंडागळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन फारुकी, क्रीडा अधिकारी संजय बेतेवार, मारोती सोनकांबळे, शारीरिक शिक्षण संघटनेचे रमेश गंगावणे, योग विद्यालयाचे रत्नाकर महाजन, आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी  कलीमोद्दीन फारुकी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. या एकता दौड मध्ये राज्य राखीव बलाचे जवान, पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक, खेळाडु, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे, पत्रकार बंधू आदी सहभागी झाले होते.
                                                
                                                       000000

No comments:

Post a Comment