Followers

Friday 13 September 2019

राज्यात ८५६ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्याने - सुधीर मुनगंटीवार


विशेष वृत्त                                            




मुंबई, दि. 12:  राज्यात ८५६.७१ हेक्टर क्षेत्रावर ६८  वन उद्यानांची निर्मिती प्रगतीपथावर असून यासाठी १३४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
स्व. उत्तमराव पाटील वन उद्यान योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात २ वन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. उद्यानांचे काम प्रगतीपथावर असले तरी ही सर्व उद्याने नागरिकांसाठी खुली आहेत. उद्यानाच्या माध्यमातून फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदनवृक्ष वन, चरक वन, लता वन, सारिका वन मगृसंचार वन, अतिथीवन यासारखी विविध प्रकारची उपवने, प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून स्मृतिवने निर्माण केली जात आहेत.
वन उद्याने
माजीवाडा, कानविंदे(ठाणे), कार्लेखिंड, चौल(रायगड), तेन, पापडखिंड(पालघर), खाणू, चिखली (रत्नागिरी), रानभाबूली, मुळदे(सिंधुदूर्ग), नऱ्हे, रामलिंग (पुणे), गुरेघर, पारगाव (सातारा), बोलवाड, खामबेले (सांगली) कुंभारी, मळोली (सोलापूर), कागल, पेठ वडगाव (कोल्हापूर), पठारी(औरंगाबाद), माणकेश्वर, गंगाखेड (परभणी), बोंदर, वदेपुरी (नांदेड), तीर्थ, ढोकी (उस्मानाबाद), जालना ट्रेनिंग सेंटर, दहीपुरी(जालना), एसआरपीएफ, पोतरा (हिंगोली), नारायणगड, सेलुम्बा (बीड), तांबरवाडी, नागझरी (लातूर), कुडवा, नवाटोला, मोरगाव, गराडा(गोंदिया), वर्धा एमआयडीसी, रांजणी (वर्धा), वेण्णा (नागपूर), डोंगराला (भंडारा), चंद्रपूर, गोंदेडा, गोंडपिंपरी (चंद्रपूर), धानोरा (गडचिरोली), पारेगाव, माणिकपुंज, कांदाने (नाशिक), जामखेळ (धुळे), कुंभारखोरी, बिलाखेड(जळगाव), नांदुरखी, आठवाड (अहमदनगर), कोथाडा, होल (नंदूरबार), उपटखेडा, मदलाबाद (अमरावती), वाशिम्बा, कुरुम, कटीबटी(अकोला), पिंपळखुटा, जानुना(बुलढाणा), आंबेवन, जोंधळणी (यवतमाळ), तपोवन, रामनगर(वाशिम) या जैवविविधता वन उद्यानाचा यात समावेश आहे.
            शहरांमधील नागरिकांमध्ये विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रजाती आणि वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे यासाठी त्यांना या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा-व्यायाम आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. वृक्ष-लतांचे महत्व आणि उपयोगिता सांगणारे पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही यात नियोजित आहे.

No comments:

Post a Comment