Followers

Wednesday 2 January 2019

मुख्यमंत्र्यांनी लोकसंवादाच्या माध्यमातून लातूर जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांशी साधला थेट संवाद



* शासनाकडून बेघरांचे स्वत:च घराचं स्वप्न पूर्ण
* लोकसंवाद हया उपक्रमातून हृदयस्पर्शी संवाद

लातूर, दि.2:- राज्यातील सर्व जिल्हयातील घरकुल योजनांच्या विविध लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  थेट संवाद साधून  लाभार्थ्यांना घरकुल योजनांतर्गत मिळालेल्या लाभाची तसेच आलेल्या अडीअडचणींची  माहिती जाणून घेतली.
याअंतर्गत  मुख्यमंत्री  श्री. फडणवीस यांनी  लातूर जिल्हयातील लातूर रोड येथील रमाई घरकुल योजनेचे  श्री. बाबूराव कांबळे व त्यांच्या सौभाग्यवती यांच्याशी प्रत्यक्ष त्यांच्या योजनेत तयार झालेल्या घरासमोरुन थेट संवाद साधला. श्री. कांबळे यांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कोणत्या अडचणी  आल्या होत्या का? याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती घेतली. तसेच  घरासाठी वाळू उपलब्ध्‍ झाली का ? व घरकूल पूर्ण झाल्याचे समाधान आहे का ? याची माहिती घेतली.
        तर लातूर मुख्यालयातील व्हीसी रुम मधून श्रीमती मंगलबाई भाऊसाहेब जाधव (शिवणी बु.ता.औसा ) ,शंकर सोमला राठोड (केळगाव ता. निलंगा ) , पंढरी मारुती कत्तलवार (अहमदपूर, ) मनोज मोहनराव कदम (अहमदपूर), सौ. भाग्यश्री आदमाने (लातूर शहर), बालाजी कांबळे ( हिप्पर सोगा ता.औसा ) या घरकूल योजनांच्या विविध लाभार्थ्यांनी  मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधून या शासनानं आपलं घराचं स्वप्न पूर्ण केल्याने फार मोठं समाधान झाल्याचे त्यांनी  सांगितले.
       यावेळी लाभार्थी मनोज कदम म्हणाले की, घरकुल योजनेचा लाभ मिळण्यात  कोणतीही अडचण आलेली नव्हती. घरकुल योजनेतून आमचं स्वत:चा निवारा असण्याचं स्वप्न पूर्ण झालेले असून हया शासनाच्या काळात अत्यंत पारदर्शी कारभार सुरु असून हे शासन लोकांसोबत असल्याची जाणीव होत असून हा लोकसंवाद उपक्रम तर माझ्यासाठी  हृदयस्पर्शी ठरला असल्याचे त्यांनी म्हटले. श्रीमती भाग्यश्री आदमाने यांनी  शिक्षणाचं माहेर घर असल्याचे लातूर शहरात स्वत:चं घर असल्याचं स्वप्न फक्त शासनाच्या घरकुल योजनेतूनच पूर्ण झाल्यानं शासनाचं त्यांनी शतश: आभार व्यक्त केले.
     मुख्यमंत्री फडवणीस यांनी लातूर येथील लाभार्थ्यांकडुन घरकुल मंजूरीत येणाऱ्या अडचणी मंजुरीसाठी चुकीच्या पध्दतीचा वापर, लोकांची अपेक्षा ,मुलांचे शिक्षण, रस्ता, वीज, पाणी, आदी पायाभूत सुविधांची माहिती घेऊन घरकुल पूर्ण झाल्याबद्दल लाभार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या.
        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व बेघरांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना सुरू केली असून महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत ही योजना राज्यात सुरू राहणार असल्याचे सांगून प्रत्येक बेघर व्यक्तींचं स्वतःच्या घराचं स्वप्न शासन साकार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडवणीस यांनी सांगितले
      सर्वसामान्य बेघर लोकांचे स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण  करण्यात ग्रामविकास विभाग व सर्व स्थानिक प्रशासन चांगले काम करत असल्याचं आजच्या लोकसंवादातून दिसून येत असल्याचे सांगून त्यांनी ग्रामविकास विभाग व प्रशासनाचे कौतुक करून घरकुल योजनेसोबतच  शासनाच्या इतर योजनांचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याच्या  सूचना श्री.फडणवीस यांनी दिल्या.
       यावेळी लातूर रोड येथील फिल्डवर जिल्हाधिकारी जी श्रीकांत, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी श्री गोडबोले, तर लातूर मुख्यालयाची विविध लाभार्थ्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटणकर, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प संचालक सुधीर भातलवंडे, जिल्हा प्रशासन अधिकारी (न.पा.) सतीश शिवणे आदी उपस्थित होते.यावेळी लातूर जिल्हयातील विविध घरकुल योजनांचे 18 लाभार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment