Followers

Saturday 30 July 2016

पीक विम्यासाठी 2 ऑगस्टअंतिम मुदत
लातूर, दि. 30 : राष्ट्रीय पीक विमा योजना 2016-17 खरीप हंगामात भात, ज्वारी ,बाजरी, मका,नाचणि, उडीद, , मुग, तुर, भुईमुग, कारळ, तीळ , सोयाबीन,सुर्यफूल, कापुस व कांदा या पीकासाठी विमा प्रस्ताव बॅंकेत भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2016 होती. तथापि शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ व्हावा या हेतूने केंद्र शासनाने मुदत वाढ केली असुन आता अंतिम मुदत दिनांक 2 ऑगस्ट 2016  अशी करण्यात आली आहे.तरी शेतक-यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकानव्ये केले आहे.


कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा

लातूर, दि. 28 : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्हयात कृषी उन्नती  योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ही योजना राबविण्यात येत आहे.तरी लातूर कृषी विभागात येणा-या सर्व जिल्हयातिल शेतक-यांनी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन कृषी सहसंचालक अशोक किरनळ्ळी यांनी केले आहे.
या योजनेमध्ये शेतक-यांना अनुदानावर कृषि औजारांचा पुरवठा आणि भाडे तत्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा पुरवण्यासाठी कृषी औजारे बॅंक स्थापन करणे या दोन बाबी राबविण्यात येत आहेत.शेतक-यांना अनुदानावर कृषि औजारांचा पुरवठा त्यांच्या गरजेनुरूप आणि मागणी प्रमाणे करण्यात येणार असून सदर घटकासाठी औजारनिहाय व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी व महिला लाभार्थियांसाठी सरासरी 35 ते 60 टक्के त इतर लाभार्थ्यांना सरासरी 25 ते 50 टक्के अनुदान मर्यादा ठेवण्यात आली आहे.सदर बाबी अंतर्गत शेतक-यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलित औजारे, पीक संरक्षण उपकरणे, काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे इत्यादी घेता येतील.भाडे तत्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा पुरवण्यासाठी कृषी औजारे बॅंक स्थापन करणे या बाबी अंतर्गत कृषी औजारावरील एकुन उच्चतम रु 10 ते 40 लाख पर्यंत भांडवली गूंतवणुकीची केंद्र स्थापन करणे असून त्यासाठी कृषी औजारे किमतीच्या 40 टक्के किंवा प्रति केंद्र 4 ते 16 लाख उच्चतम अनुदान अनुज्ञेय राहील.यामध्ये जमीनीची पूर्व म्शागत ते पीक प्रक्रीया  यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व औजारांची निवड करता येईल.
सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर http://www.mahaagri.gov.in उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अधिक माहिती साठी संबंधित जिल्हयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.


चौकशी व प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांचे आवाहन


लातूर, दि. 27 : विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था  लातूर विभाग येथे चौकशी व प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले असून यासाठी सहकार खात्यतुन निवृत्त झालेले अधिकारी,निवृत्त न्यायाधीश , वकील , सनदी लेखापाल यांनी विभागीय सहनिबंधक ,सहकारी संस्था  कार्यालय लातूर तसेच जिल्हा सहनिबंधक ,सहकारी संस्था लातूर उस्मानाबाद  नांदेड आणि बीड या कार्यालयातुन विहीत नमून्यातील अर्ज दिनांक 1 ऑग्स्ट ते 31 ऑगस्ट 2016 प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत.याबाबतच्या अधिक माहितीसाठी उपरोक्त कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.


Wednesday 27 July 2016

मराठवाडा विभागात सरासरी 16.19 मि.मि. पाऊस

औरंगाबाद, दि. 27: मराठवाडा विभागात आज दि. 27 जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी  16.19  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत लातूर जिल्हयात सर्वाधिक 28.51  मि.मी. पाऊस झाला  तर परभणी जिल्हयात सर्वात कमी 6.91  मि.मि. पाऊस झाला.
            विभागात दि. 27 जुलै रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.

औरंगाबाद 10.07 (286.04 ) जालना 14.38 (362.18 ) परभणी  6.91 (320.78 ) हिंगोली 14.06  (472.14 ) नांदेड 24.85 (514.93 ) बीड 11.29 (260.88 ) लातूर 28.51 (337.51) उस्मानाबाद  19.48  (281.66 ). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या 111.5 तर वार्षिक सरासरीच्या 45.5 टक्के पाऊस झाला आहे.

Thursday 21 July 2016

मराठवाडा विभागात सरासरी 16.73 मि.मि. पाऊस

          
        औरंगाबाद, दि. 22: मराठवाडा विभागात आज दि. 22 जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी  16.73  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत लातूर जिल्हयात सर्वाधिक 39.88  मि.मी. पाऊस झाला  तर औरंगाबाद जिल्हयात सर्वात कमी  0.06  मि.मि. पाऊस झाला.
            विभागात दि. 22 जुलै रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.
औरंगाबाद 0.06 (242.79 ) जालना 1.34 (277.45 ) परभणी  16.53 (272.84 ) हिंगोली 1.88  (370.10 ) नांदेड 24.67 (433.81 ) बीड 25.09 (207.95 ) लातूर 39.88 (276.18) उस्मानाबाद  24.35  (236.79 ). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या 101.2  तर वार्षिक सरासरीच्या 37.2  टक्के पाऊस झाला आहे. 

Wednesday 13 July 2016

मराठवाडा विभागात सरासरी 0.35 मि.मि. पाऊस



        औरंगाबाद, दि. 14: मराठवाडा विभागात आज दि. 14 जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी  0.35  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत नांदेड जिल्हयात सर्वाधिक 1.32  मि.मी. पाऊस झाला. तर जालना, हिंगोली या जिल्ह्यात पावसाची नोंद झाली नाही.
            विभागात दि. 14 जुलै रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.

औरंगाबाद 0.14 (234.40 ) जालना निरंक (273.55 ) परभणी  0.56 (243.85 ) हिंगोली निरंक  (346.12 ) नांदेड 1.32 (393.19 ) बीड 0.18 (168.71 ) लातूर 0.14 (216.36) उस्मानाबाद  0.44  (174.39 ). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या 109.0  तर वार्षिक सरासरीच्या 32.9  टक्के पाऊस झाला आहे. 

Monday 11 July 2016

मराठवाडा विभागात सरासरी 23.75 मि.मि. पाऊस

मराठवाडा विभागात सरासरी
23.75 मि.मि. पाऊस

        औरंगाबाद, दि. 11: मराठवाडा विभागात आज दि. 11 जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी  23.75  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत औरंगाबाद जिल्हयात सर्वाधिक 64.62  मि.मी. पाऊस झाला. तर लातूर जिल्हयात सर्वात कमी  6.65  मि.मि. पाऊस झाला
            विभागात दि. 11 जुलै रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.

औरंगाबाद 64.62 (212.09 ) जालना 38.86 (238.63 ) परभणी  9.93 (199.19 ) हिंगोली 27.57 (302.28)  नांदेड 27.47 (310.00 ) बीड 6.89 (162.59) लातूर 6.65 (205.02) उस्मानाबाद 8.00  (170.42). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या  104.2 तर वार्षिक सरासरीच्या 28.9  टक्के पाऊस झाला आहे. 

Monday 4 July 2016

मराठवाडा विभागात सरासरी 0.61 मि.मि. पाऊस

मराठवाडा विभागात सरासरी
0.61 मि.मि. पाऊस
        औरंगाबाद, दि. 4 : मराठवाडा विभागात आज दि. 4 जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी 0.61 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत औरंगाबाद जिल्हयात सर्वाधिक 3.26 मि.मी. पाऊस झाला. तर नांदेड व  लातूर या जिल्ह्यात पावसाची नोंद झाली नाही.
            विभागात दि. 4 जुलै रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.
औरंगाबाद  3.26 (88.63 ) जालना 0.41 (127.60 ) परभणी  0.04 (125.78 ) हिंगोली 0.09 (201.96)  नांदेड निरंक (220.35 ) बीड 0.25 (119.08) लातूर निरंक (160.16 ) उस्मानाबाद 0.79  (128.39). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या  85.48 तर वार्षिक सरासरीच्या 18.81 टक्के पाऊस झाला आहे. 

Saturday 2 July 2016

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची उपसमिती जाहिरातींच्या मुद्यांबाबत माहिती घेणार


        मुंबई, दि. 1 : प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची उपसमिती जाहिरातींच्या मुद्यांबाबत तपासणी करण्यासाठी मुंबईत येत आहे. या उपसमितीमध्ये उपसमितीचे अध्यक्ष गुरींदर सिंग, सदस्य प्रभात कुमार दक्ष यांचा समावेश असणार आहे. ही उपसमिती मुंबई भेटीदरम्यान राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांकडून जाहिरात धोरणाबाबतची माहिती तसेच जाहिरातींचे विविध मुद्दे यांची माहिती घेणार आहे.
            सदर उपसमिती येत्या 4 जुलै 2016 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहातील वसंतदादा पाटील सभागृह, हॉल क्र. 4 येथे माध्यम क्षेत्रातील संबंधित मालक, मुद्रक, प्रकाशक, व्यवस्थापक यांचे सोबत या विषयासंदर्भात बैठक घेणार आहे. तर 5 जुलै 2016 रोजी याच ठिकाणी सकाळी 11 ते 1.30 या वेळेत राज्य शासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे.

            यावेळी वेगवेगळ्या माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींना सदर उपसमितीबरोबर चर्चा करता येणार असून आपल्या काही तक्रारी व सूचना असल्यास त्या मांडण्याची संधी मिळणार आहे.

Friday 1 July 2016

लातूरच्या पालक सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांच्या हस्ते शिंदाळवाडी येथे वृक्षारोपण


लातूरच्या पालक सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांच्या हस्ते शिंदाळवाडी येथे वृक्षारोपण  




        लातूर,दि.1:  1 जुलै या एकाच दिवशी 2 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत औसा तालूक्यातील शिंदाळवाडी येथे नगर विकास सचिव तथा लातूर जिल्हयाच्या पालक सचिव मनीषा म्हैसकर –पाटणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
            यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, उपवनरक्षक जी.एस.साबळे,उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, उप मुख्यकार्यकारी अधिकारी पटवारी, तहसिलदार अहिल्या गाठाळ आदिसह ग्रामस्थ व शालेय विदयार्थी उपस्थित होते.
            यावेळी श्रीमती म्हैसकर-पाटणकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विदयार्थ्याशी संवाद साधून वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. तसेच या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत लागवड करण्यात येत असलेल्या वृक्षाची पाहणी करण्यासाठी आपण पुन्हा येणार असल्याचे  सांगितले.

            शिंदाळवाडी येथील जमीन ही महसूल विभागाने वन विभागाला हस्तांतरीत केली असून यापैकी 30 हेक्टर क्षेत्रावर 33 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली.