Followers

Friday 16 September 2016

मराठवाडा विभागात सरासरी 32.14 मि.मि. पाऊस



        औरंगाबाद, दि. 16: मराठवाडा विभागात आज दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी  32.14  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत परभणी जिल्हयात सर्वाधिक 45.97  मि.मी. पाऊस झाला  तर नांदेड जिल्हयात सर्वात कमी  24.55  मि.मि. पाऊस झाला.
            विभागात दि. 16 सप्टेंबर रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.

औरंगाबाद 28.94 (463.23 ) जालना 27.68 (580.86 ) परभणी  45.97 (559.21 ) हिंगोली 25.59  (712.00 ) नांदेड 24.55 (775.09 ) बीड 33.84 (463.00 ) लातूर 38.82 (738.67) उस्मानाबाद  31.78  (524.41 ). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या 95.04  तर वार्षिक सरासरीच्या 77.29  टक्के पाऊस झाला आहे.